शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एबी’ नव्हे, ‘ए’ व ‘बी’ फॉर्म! नेमके कसे व कशासाठी असतात हे फॉर्म?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 05:28 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली की छापील तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये अमूक पक्षाने आपल्या उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप सुरू केले, अशा प्रकारचे उल्लेख सर्रासपणे केलेले दिसतात.

- अजित गोगटेविधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली की छापील तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये अमूक पक्षाने आपल्या उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप सुरू केले, अशा प्रकारचे उल्लेख सर्रासपणे केलेले दिसतात. एवढेच नव्हे तर सर्वच पक्षांचे नेते व उमेदवारही सराईतपणे ‘एबी फॉर्म’ असेच म्हणताना दिसते. निवडणुकीत वापरले जाणारे हे फॉर्म नेमके काय आणि कशासाठी आहेत. याविषयीचे अज्ञान किंवा अर्धवट माहितीमुळे असे होते.‘एबी’ असा कोणताही फॉर्म नाही. ‘ए’ व ‘बी’ असे दोन स्वतंत्र फॉर्म असून निवडणूक आयोगाने १९६८ मध्ये दिलेल्या निवडणूक चिन्हांचे आरक्षण आणि वाटप याविषयी दिलेल्या आदेशान्वये या फॉर्मचे ठराविक नमूने ठरवून देण्यात आले आहेत. तंतोतंत त्याच नमुन्यात हे फॉर्म भरून द्यावे लागतात. या फॉर्ममधील चुका किंवा त्रुटी यामुळेही उमेदवारी अर्ज फेटाळला जाऊ शकतो. हे फॉर्म मान्यताप्राप्त पक्षांतर्फे निवडणूक लढविणाºया उमेदवारांनाच फक्त लागू आहेत.अपक्ष उमेदवारांना हे फॉर्म द्यावे लागत नाहीत. राजकीय पक्षांनी कोणत्या मतदारसंघांतून कोणते उमेदवार उभे केले आहेत याची माहिती निवडणूक आयोगाला अधिकृतपणे देण्याची हे दोन फॉर्म माध्यम आहेत. प्रत्येक उमेदवारी अर्जासोबत हे दोन्ही फॉर्म जोडावे लागतात. या फॉर्ममध्ये दिलेली माहिती अंतिम मानली जाते व त्याच आधारे मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे, पक्षाचे नाव व चिन्ह छापले जाते.‘ए’ फॉर्म संबंधित पक्षाचा अध्यक्ष/सरचिटणीस यांनी स्वाक्षरी व पक्षाच्या शिक्क्यासह भरून द्यायचा असतो. पक्षातर्फे अधिकृत उमेदवारांची नावे कळविण्याचे अधिकार ज्यांना दिलेले असतील अशा पदाधिकाऱ्यांची नावे व त्यांच्या स्वाक्ष-यांचे प्रत्येकी तीन नमुने या फॉर्ममध्ये दिलेले असतात. या प्राधिकृत पदाधिका-यांच्या स्वाक्षरीने ‘बी’ फॉर्म दिला जातो व त्यात कोणत्या मतदारसंघात पक्षाने कोणाला उमेदवारी दिली आहे व त्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला किंवा काही कारणाने त्याने उमेदवारी मागे घेतली तर पर्यायी उमेदवार कोण याची संपूर्ण माहिती या फॉर्ममध्ये दिलेली असते. ‘बी’ फॉर्म प्रत्येक उमेदवारास स्वतंत्रपणे दिला जातो. ‘ए’ फॉर्म सर्व उमेदवारांसाठी दिला जाणारा सामुदायिक फॉर्म असतो. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण