लाजिरवाण्या घटनांचा महापूर
By Admin | Updated: November 27, 2014 23:22 IST2014-11-27T23:22:49+5:302014-11-27T23:22:49+5:30
गेल्या काही दिवसांत आपल्या देशात ज्या घटना घडल्या त्या पाहता भारत हा खरेच तारतम्य बाळगणारा देश आहे का, असा प्रश्न कुणालाही पडावा.

लाजिरवाण्या घटनांचा महापूर
गेल्या काही दिवसांत आपल्या देशात ज्या घटना घडल्या त्या पाहता भारत हा खरेच तारतम्य बाळगणारा देश आहे का, असा प्रश्न कुणालाही पडावा. या साध्या घटना भारताच्या प्रतिमेला काळिमा फासणा:या होत्या. या घटना लागोपाठ घडल्यामुळे सारे राष्ट्र सुन्न झाले आहे. त्या पैकी पहिली घटना हरियाणाचे पोलीस आणि स्वघोषित संत रामपाल यांच्या समर्थकांमध्ये झालेला संघर्ष ही होती. या घटनेनंतर ज्या गोष्टी प्रकाशात आल्या त्या सर्व धक्कादायक होत्या. रामपालचा आश्रम हा त्यांच्या समर्थकांनी बंदुकीच्या जोरावर वाचविण्याचे काम केले. अखेर पोलिसांनी आश्रमात घुसून या लोकांना बाहेर काढले आणि रामपालला अटक केली तेव्हाच हे नाटय़ संपले. रामपालच्या समर्थकांनी पोलिसांवर गोळीबार करायला कमी केले नाही. भारत हे मवाळ राष्ट्र असल्यामुळे अशा त:हेच्या घटना चटकन नियंत्रणात आणता येत नाहीत, अशी माहिती हरियाणाच्या निवृत्त महासंचालकांनी न्यायालयात दिली.
रामपालवर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले हे चांगले झाले. त्यामुळे देशातील संत आणि त्यांचा लोकमानसावर असलेला प्रभाव याविषयीची चर्चा बराच काळ सुरू राहील. देशाच्या कानाकोप:यांत असे संत पाहायला मिळतात आणि त्यांना लोकांचे समर्थनही मिळत असते. हे संतांचे समर्थक संतांना जमीनजुमला, दागिने, रोख पैसे देऊन श्रीमंत करीत असतात. त्यामुळे त्यांच्या आश्रमात सर्व त:हेच्या सुखसोयी पाहायला मिळतात. सध्या संपूर्ण देशात अशा त:हेचे सात संत तुरुंगवास भोगत आहेत. लोकांचा त्यांच्यावरील अंधविश्वास आणि राजकारणी लोकांकडून केला जाणारा वापर यातूूनच हे संत अशी गैरकृत्ये करतात. आपल्याला कोणतेही कायदे लागू नाहीत, असे त्यांना वाटू लागते. 2क्क्8 नंतरच्या काळात न्यायालयाने रामपालवर 42 समन्स बजावून त्याला कोर्टात उपस्थित राहायला सांगितले होते; पण तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्या पाठिंब्यामुळे या समन्सना केराची टोपली दाखवणो रामपालला शक्य झाले. रामपाल याच्या ट्रस्टवर हुडा यांच्या प}ी विश्वस्त आहेत.
रामपाल यांना अटक करण्याचे काम काँग्रेस सरकारला 1क् वर्षात करता आले नाही. ते काम भाजपाने 1क् दिवसांत केले, असे म्हणून भाजपा स्वत:ची पाठ थोपटत आहे; पण भाजपाने एका बंद लिफाफ्यात न्यायालयात शपथपत्र सादर करून, रामपालला सोडण्यात यावे; अन्यथा मोठा रक्तपात घडू शकतो, असे सांगितले. न्यायालयाने ते मान्य केले नाही. एकूणच सर्वच राजकीय पक्ष संतांच्या प्रभावाखाली येत असतात असे दिसून येते.
आणखी एक धक्कादायक घटना या महिन्यात घडली. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकलेल्या लोकांना सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा हे खासगीरीत्या भेटल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत हस्तक्षेप करू नये, असे न्यायालयाने सिन्हा यांना बजावले आहे. या अगेादर सिन्हा यांनी विधिमंत्र्याच्या निर्देशावरून एक अहवाल केवळ न्यायालयासाठी म्हणून न्यायालयात सादर केला होता. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या संचालकाची गणना ‘पिंज:यातील पोपट’ अशी
केली होती. एकूणच ही तपास यंत्रणा वरपासून खालर्पयत बिघडलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तेव्हा सिन्हा यांच्या निवृत्तीला काही दिवस उरले होते. सीबीआयच्या संचालकांच्या
अशा त:हेच्या वागणुकीमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सीबीआय बरखास्त करून, त्या जागी नवी संस्था स्थापन करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
ममता बॅनज्रीचा सीबीआयवर रोष असण्याचे कारण शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी सीबीआय करीत आहे हे आहे. सीबीआयने तृणमूल काँग्रेसच्या दोघा खासदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सीबीआयच्या माध्यमातून भाजपाचे सरकार आपल्यावर सूड उगवत आहे, असे ममता बॅनर्जी यांचे म्हणणो आहे; पण त्यांचा हा युक्तिवाद अनेकांना मान्य नाही. बरव्दान येथे झालेले स्फोट हे बांगलादेशी मुजाहिदीनांनी स्थानिक मुस्लिमांच्या सहकार्याने केले असून, आपल्या सरकारला बदनाम करण्याचा हा कट आहे असे बॅनर्जी यांचे म्हणणो आहे. आपला पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संघर्ष युद्धाचे स्वरूप धारण करीत आहे, असे ममता बॅनर्जी यांचे म्हणणो आहे. या ज्वालामुखीचा स्फोट केव्हाही होऊ शकतो.
ममता बॅनर्जी आणि भाजपा यांच्यातील संघर्ष रंगत असतानाच उत्तर प्रदेशचे ‘नेताजी’ मुलायमसिंग यादव यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने अखिलेश यांनी जो उत्सव साजरा केला तो सध्या टीकेचा विषय बनला आहे. एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडील लगAसमारंभाला लाजवेल अशा त:हेचा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात उसळलेल्या गर्दीत चेंगरून एका महिलेचा मृत्यू झाला.
याशिवाय, दोन वेगळ्या घटना दिल्ली आणि बंगळुरू अशा दोन ठिकाणी घडल्या. दिल्लीतील घटनेत मणिपूरच्या एका युवकाला ठार करण्यात आले, तर बंगळुरूच्या घटनेत एका उत्तर भारतीय तरुणाला स्थानिक भाषा बोलता येत नाही म्हणून मारहाण करण्यात आली. मणिपूर हे राज्य अनेक वर्षापासून बंडखोरीला तोंड देत आहे. त्यामुळे
तेथील तरुण अन्यत्र राहून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा प्रय} करीत आहेत. हे तरुण शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी अन्य राज्यात जात आहेत.
त्यांना वांशिक भेदभावाला सामोरे जावे लागणो
हे देशासाठी लाजिरवाणो आहे. दिल्लीमध्ये एका मुलीने अन्य जातीतील तरुणाशी विवाह केल्याबद्दल तिच्या मातापित्यांनी ‘ऑनर किलिंग’च्या नावाखाली तिला मारून टाकण्याचा घृणास्पद प्रकार याच महिन्यात घडला. या सर्व घटनांकडे मोदीसरकारने गांभीर्याने लक्ष पुरवायला हवे. शिक्षणामध्ये संस्कृतचा समावेश करण्यापेक्षा या गोष्टीकडे लक्ष देणो अगत्याचे आहे.
इंदर मल्होत्र
ज्येष्ठ पत्रकार