लोकमत दीपोत्सव : फिक्सर्स
By Admin | Updated: October 18, 2016 14:21 IST2016-10-18T12:23:56+5:302016-10-18T14:21:00+5:30
ज्युलिआ रॉबर्ट्सला साडी नेसवण्यापासून मुंबई पावभाजीचं ' मसाला सिक्रेट' समजावण्यापर्यंत काय म्हणाल ते! एका सिक्रेट जगाचा फेरफटका ' 'लोकमत दीपोत्सव'च्या अंकातून...

लोकमत दीपोत्सव : फिक्सर्स
- शची मराठे
परदेशातून येणारे पर्यटक, हॉलिवूडचे चित्रपट आणि टीव्हीसाठीचे क्रू अशा उत्सुक नवख्यांना ‘भारत’ समजून देण्यासाठी दाम घेऊन काम करणाऱ्या एका सिक्रेट जगात...
कृष्णा पुजारी आणि राहुल खंदारे.
एरवी या भल्या प्रचंड मुंबईत त्यांना कोणी ओळखणारही नाही.
पण परदेशातून येणारे फिरंगी
त्यांच्या भरवशावर मुंबई नावाच्या अनोळखी मायानगरीत उतरण्याची हिंमत करतात.
कुणा टूरिस्टांना धारावीत भटकून तिथलं जगणं ‘अनुभवायचं’ असतं,
मुंबईचा अभ्यास करायला आलेल्या कुणा लेखक-पत्रकारांना दुभाषे हवे असतात,
बीबीसी नाहीतर नॅशनल जिआॅग्राफिकच्या कुणा चॅनलवाल्यांना
इंडियन स्ट्रीट फूडवरच्या एपिसोडसाठी मुंबईतली ‘पावभाजी’ शूट करायची असते,
कुणा डॅनी बोएलला त्याच्या ‘स्लमडॉग मिलिनियर’साठी
मुंबईच्या रेड लाइट एरियातला अस्सल ‘कोठा’ शोधून हवा असतो,
कुणा ज्युलिआ रॉबर्ट्सला साडी नेसवून देणारी बाई हवी असते;
तर आणखी कुणा हॉलिवूडवाल्याला त्याचं मुंबईतलं शूटिंग निर्विघ्न पार पडावं म्हणून
गल्लीतले दादा मॅनेज करायला मदत हवी असते...
हे सगळं चुटकीसरशी जमवून देणारी एक जमात मुंबईत राहते.
... त्यांच्या जगात!
दीपोत्सवची झलक बघण्यासाठी, तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इथे क्लिक करा...