शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:07 IST

AI Emotional Support: वेळेचा अभाव, समाजातील मानसिक आरोग्याबाबत असलेली कुजलेली धारणा, आणि वैयक्तिक गोष्टी कोणाशी शेअर करायच्या या संकोचामुळे अनेकदा लोक मानसिक त्रास सहन करत राहतात.

-डॉ. अमेय पांगारकर, एआय तज्ज्ञआजच्या जगात  तंत्रज्ञान हे आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये प्रवेश करत आहे, मग ते शिक्षण असो, आरोग्य असो की मानसिक आधार. आजकाल नैराश्य, एकाकीपणा, चिंता, तणाव यासारख्या मानसिक आजारांबाबत जागरूकता वाढली असली, तरी अजूनही अनेक लोक मानसोपचारतज्ज्ञांपर्यंत पोहोचत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, दर एक लाख लोकांमागे ७५०  मानसोपचारतज्ज्ञ आहेत. 

वेळेचा अभाव, समाजातील मानसिक आरोग्याबाबत असलेली कुजलेली धारणा, आणि वैयक्तिक गोष्टी कोणाशी शेअर करायच्या या संकोचामुळे अनेकदा लोक मानसिक त्रास सहन करत राहतात. अशावेळी एक नवीन दिशा म्हणून लोक ‘एआय थेरपी’चा आधार घेऊ लागले आहेत. 

एआय थेरपी ही २०१६-१७ नंतर विशेष चर्चेत आली. आता एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यासारखे विचार करणारे, बोलणारे, आणि संवाद साधणारे सॉफ्टवेअर. ‘एआय थेरपी’ म्हणजे एआय आधारित सिस्टीम वापरून वापरकर्त्याचे संवाद घेणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे, भावनिक आधार देणे आणि शक्य असल्यास योग्य उपाय सुचवणे. 

चॅट-जीपीटी, वोबोट, व्यासा यासारखे एआय आधारित चॅटबॉट्ससारखी मॉडेल्स व्यक्तीच्या विचारांवर प्रतिक्रिया देतात, प्रश्न विचारतात, सल्ला देतात किंवा केवळ ऐकून घेतात – जसे एक मानसोपचारतज्ज्ञ करतात. ते संवाद साधतात, समजून घेतात, सल्ला देतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते “ऐकतात”. 

रात्री दोन- अडीच वाजता जागे आहात? कोणाशीतरी बोलावं वाटतंय? तुम्हाला वाटतं की तुम्ही कोणाला सांगू शकत नाही, अशावेळी कोणी नसेल तरी चॅट-जीपीटी आहेच. एआय हे तंत्रज्ञान २४/७ उपलब्ध असतं. 

कधीही, कुठेही, कोणत्याही अडचणीच्या क्षणी आपल्या सोयीनुसार त्याचा वापर करता येतो. बऱ्याचदा मानसोपचारकांची फी ही सर्वसामान्य माणसांना परवडणारी नसते आणि आपण काही शेअर केलं तर आपल्याला कोणी जज करेल, ही भीती असतेच! एआय कधीही जज करत नाही – त्यामुळे लोक मोकळेपणाने बोलू शकतात. 

खरंच एआय समजून घेतं का?

माणूस आणि एआय यामध्ये एक मूलभूत फरक आहे – ‘भावना’.  एआय काहीही, आपल्याला हव्या त्या वेळी समजून घेतो, पण तो ‘अनुभव’ करत नाही. त्यामुळे एखाद्याचं दुःख ‘समजून घेणं’ हे एआय करू शकत नाही. 

एआयचा ‘समजणं’ किंवा समजावून सांगणं हा तुम्ही दिलेल्या डेटावर आधारित प्रतिसाद आहे – अनुभवावर नाही. तो कधीच माणसासारखा तुमच्या आवाजातल्या कंपनातून, डोळ्यातल्या अश्रूंमधून भावना ओळखू शकत नाही. एआयचं ‘ऐकणं’ हे प्रभावी असलं, तरी त्यात माणसाची मायेची ऊब असणं शक्य नाही. 

एआय थेरपी ही कधीच मानसोपचारकांचा पर्याय होऊ शकत नाही. पण ती एखाद्या व्यक्तीला बोलतं करण्यासाठी सहायक माध्यम ठरू शकते. 

मानसिक आरोग्याची सुरुवात ही संवादातून होते, आणि चॅट-जीपीटी किंवा इतर एआय सिस्टीममुळे एखादी व्यक्ती पहिल्यांदा मोकळेपणाने बोलू लागली, तर ते सकारात्मक पाऊल नक्कीच ठरू शकतं. एआय थेरपी ही एक सकारात्मक पाऊल आहे; पण ती एकटी पुरेशी नाही. 

आपल्या भावनांना वाचा फोडण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि खरं ऐकण्यासाठी अजूनही ‘माणूसपण’च हवं असतं. म्हणूनच, एआय थेरपीला सहयात्रीसारखं म्हणून पाहायला हवं – अंतिम पर्याय म्हणून नव्हे. एआयला हाताशी धरून, पण माणुसकीला हृदयाशी धरून मानसिक आरोग्य उत्तम ठेवूया..!!

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सtechnologyतंत्रज्ञानMental Health Tipsमानसिक आरोग्यHealthआरोग्य