शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

झुकोबाचे लिंकिंग...

By पवन देशपांडे | Updated: January 19, 2018 03:24 IST

काय चाल्लंय या जगात राव... माझ्या नावातला ‘ए’ गायब झालाय. काय राव एका ‘ए’ मुळे माझं अकाऊंटच बंद होण्याची भीती आहे.

काय चाल्लंय या जगात राव... माझ्या नावातला ‘ए’ गायब झालाय.काय राव एका ‘ए’ मुळे माझं अकाऊंटच बंद होण्याची भीती आहे.सकाळी दारावरचा पेपर काढताना शेजारच्या काकांनी मोठं आभाळ कोसळल्यागत चेहरा करून तक्रार नोंदवली.आम्ही म्हटलं, काका आज गुड मॉर्निंग सोडून, हे भलतंच काय? तर म्हणाले, अहो आता काय काय बघावं लागणार या वयात काय माहीत.पन्नाशीच्या पुढे पोहोचलेले काका एवढे वैतागलेले कधी पाहिले नव्हते. पेपर वाचायची उत्सुकता बाजूला ठेवून त्यांना खोलात जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला.म्हटलं, काका, झालं तरी काय?या एकाच प्रश्नावर त्यांची गाडी डायरेक्ट सरकारवर घसरली.‘‘या सरकारला काही कळत नाय, कोणकोणत्या गोष्टी कुठं कुठं लिंक करायच्या तुम्हीच सांगा. हे इथं जोडलं नाही, तर तिथं ते मिळणार नाही आणि तिथं जोडलं नाही तर तुमचं इथं हे चालणार नाही.’’त्यांचा वैताग सुरूच होता. म्हटलं आधारबद्दल बोलताय का तुम्ही? त्याची डेडलाईन वाढलीय आता, चिंता नका करू एवढी. त्यांना आपलं समजावण्याच्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा पारा काही सध्याच्या थंडीसारखा उतरत नव्हता.म्हणाले, अहो मोदी सरकारनं जिथं जिथं आधार लिंक करायला सांगितलं तिथं तिथं अगदी रांगेत उभं राहून मी ते केलं. बोटांचे ठसे जुळत नसतानाही पुन्हा पुन्हा करून घेतलं. पण, आता नवीनच टूम निघालीय. त्यामुळे गोची होणार.अस्मादिकांचा चेहरा ‘नोटाबंदी का केली?’ या प्रश्नानंतर जसा झाला होता, तशा मुद्रेत आपोआप गेला. त्याच मुद्रेतून त्यांना विचारलं, अहो नेमकं झालं तरी काय? आधारवर सगळेच घसरताहेत, पण एवढं वैतागलेलं कोणाला पाहिलं नाही.एवढ्या वैतागण्याच्या मूडमध्येही त्यांनी थेट सवाल केला? तुम्ही फेसबुकवर नाही का? आता तिथंही लिकिंग आलंय.फेसबुकनं नवीनच प्रयोग सुरू केलेत. म्हणे, तुमचं नाव जसं आधार कार्डवर आहे तसंच फेसबुकवर हवं. माझ्या फेसबुकच्या नावात अन् आधारवरच्या नावात ‘ए’चा फरक आहे. नावात एक ‘ए’ एक्स्ट्रॉ असला तर फेसबुकचं काय बिघडतंय. हीच समस्या कोट्यवधी फेसबुकवासीयांची झालीयं. मोदींनी यावर काही करावं राव.. बसं झालं लिंकिंग आता... लिंक करता करता आम्हीच इथून डी-लिंक होऊ बहुदा.पुन्हा नोटाबंदीवरून जीएसटीच्या मुद्रेत गेलो अन् कर कमी झाल्यावर जसं सर्वसामान्यांना काहीच फरक पडत नाही तशाच मूडमध्ये त्यांना म्हणालो, अहो काका ते नवीन लोकांसाठी आहे. तुम्ही झुकोबाचे ‘ओल्ड कस्टमर’ आहात. त्यामुळे तुम्हाला नाही तर नव्या लोकांना अकाऊंट ओपन करताना हे सारं करावं लागणारे.आमचं हे म्हणणं काकांना पटलं, अन् त्यांनी काठावर पूर्ण बहुमत मिळाल्यासारखा सुस्कारा सोडला.आम्ही मात्र, झुकोबा असे प्रयोग नेमके कुणासाठी करतोय, याच विचारात दिवसभर होतो...- पवन देशपांडे

टॅग्स :Facebookफेसबुक