शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘एलआयसी’ची निर्गुंतवणूक : कशासाठी? कोणासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 08:54 IST

जगामध्ये विश्वासार्हता गमावलेल्या विदेशी विमा कंपन्यांना भारतातील वाढती विम्याची बाजारपेठ हवी आहे... या कंपन्यांच्या दबावात सरकारने येऊ नये!

ॲड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासक -

आयुर्विमा महामंडळातील (एलआयसी) काही टक्के हिस्सा (साधारणत: ६.५ टक्के) विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. आयुर्विमा महामंडळाची निर्गुंतवणूक करण्यासाठी कोणतेही ठोस व संयुक्तिक कारण न देता प्रचंड वित्तीय ताकद असणाऱ्या, आयुर्विमा व्यवसायामध्ये नेत्रदीपक प्रगती करणाऱ्या, राष्ट्र उभारणीच्या कार्यात  मोलाचा आर्थिक सहभाग असणाऱ्या, देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व राष्ट्रीयीकरणाची सर्व उद्दिष्टे साध्य  करणाऱ्या आयुर्विमा महामंडळाची निर्गुंतवणूक करणे कोट्यवधी विमाधारक  तसेच देशाच्या हिताचे आहे का? - हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

आयुर्विमा महामंडळ स्थापनेच्या वेळी  सरकारने पाच कोटी रुपयांचे भांडवल गुंतविले होते. ३१ मार्च २०२५ रोजी महामंडळाची मालमत्ता ५४ लाख ५२ हजार २९७ कोटी रुपये असून जगातील सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमध्ये आयुर्विमा महामंडळाची मालमत्ता सर्वात जास्त आहे. १९५६-५७ मध्ये विमा हप्त्यांद्वारे मिळणारी रक्कम ८८.६५ कोटी रुपये होती. त्यावेळी महामंडळाकडे केवळ ९.४१ लाख विमा पॉलिसी होत्या. आता २७ कोटींहून अधिक  वैयक्तिक विमा पॉलिसी  असून ८.४८ कोटी गट विमा पॉलिसी आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात विमा हप्त्यांपोटी एकूण ४ लाख ८८ हजार १४८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले  आहे. महामंडळाने राष्ट्र उभारणीच्या कामासाठी तसेच पायाभूत सुविधांसाठी ३७ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक केलेली आहे. कर वजा जाता महामंडळाला २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४८,१५१ कोटी रुपयांचा नफा झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो १८.३८ टक्क्याने जास्त आहे.  

गेल्या ६९ वर्षात विमाधारकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच आयुर्विमा महामंडळाने  २४ विमा कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देऊन आपले निर्विवाद श्रेष्ठत्व व वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. परंतु  सरकार मात्र निर्गुंतवणुकीद्वारे आयुर्विमा महामंडळाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू करून महामंडळाचे नियंत्रण देशी व विदेशी उद्योगपतींच्या हाती सोपवू इच्छित आहे.   मुळात विमा क्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांसाठी खुले करा, महामंडळाची निर्गुंतवणूक करा,  अशी मागणी देशातील विमाधारकांनी सरकारकडे कधीच केलेली नव्हती. उलट देशात  सर्व स्तरातून त्याला तीव्र विरोध होत  होता. परंतु जगामध्ये विश्वासार्हता गमावून बसलेल्या विदेशी विमा कंपन्यांना भारतातील सतत वाढत असलेली विम्याची बाजारपेठ हवी असल्यामुळे विमा क्षेत्र विदेशी कंपन्यांसाठी खुले करा, अशी  अमेरिकेसह जगातील बड्या राष्ट्रांची सातत्याची  मागणी होती. त्या  दडपणाला बळी पडून वाजपेयी सरकारने विमा क्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांसाठी खुले केले होते. 

आयुर्विमा महामंडळाला  दुर्बल केल्याशिवाय आपल्या व्यवसायात वाढ करणे शक्य नाही, हा गेल्या २५ वर्षांतील देशी व विदेशी खासगी कंपन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे आयुर्विमा महामंडळाची  निर्गुंतवणूक करा, विमा क्षेत्रात  परकीय  थेट गुंतवणुकीची मर्यादा ७४ टक्क्यांवरून १०० टक्के करा तसेच  विमाधारकांना देण्यात येणारी ‘सार्वभौम हमी’ काढा, यासारख्या मागण्या त्या विमा कंपन्या करीत असून त्या दडपणाखाली सरकार विमाधारकांच्या हिताला बाधक असे  बदल करीत आहे. संसदेच्या  मान्सून अधिवेशनात सरकार विमा क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीची मर्यादा ७४ टक्क्यांवरून १०० टक्के करण्यासहित विमा क्षेत्रात अनेक व्यापक प्रमाणात  बदल सुचविणारे विमा कायदा (दुरुस्ती) विधेयक, २०२५ मांडले जाण्याची शक्यता असून आयुर्विमा महामंडळाची निर्गुंतवणूक करण्यासंबंधी सरकारने घेतलेला निर्णय हा त्याच धोरणाचा भाग आहे.

गैरप्रकाराने विकल्या जाणाऱ्या विमा पॉलिसीमुळे विमाधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच ‘आयआरडीएआय’ यांनी आठ महिन्यांपूर्वीच सांगितले होते. असे असतानाही सरकार  विमा क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ  करण्याचा व आयुर्विमा महामंडळाची निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत आहे. हे  विमाधारकांच्या हिताला बाधक आहे.    kantilaltated@gmail.com 

टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसी