शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

भाडेपट्टा जमिनींच्या मालकी हक्काचा घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 05:45 IST

निवडणुका जवळ येत आहेत, तसतसा शासनाकडून रोज नवनव्या घोषणांचा पाऊस पडत आहे.

- रमेश प्रभू (गृहनिर्माण क्षेत्राचे अभ्यासक)निवडणुका जवळ येत आहेत, तसतसा शासनाकडून रोज नवनव्या घोषणांचा पाऊस पडत आहे. आता नवी मुंबई, औरंगाबाद व नाशिकच्या सिडको क्षेत्रातील रहिवासी व वाणिज्य उपयोगासाठी दिलेले भूखंड एकरकमी हस्तांतर शुल्क घेऊन मालकी हक्काने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी भाडेपट्ट्याने दिलेल्या जागा प्रचलित बाजार भावाच्या २५ टक्के दराने हस्तांतर शुल्क घेऊन मालकी हक्काने देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नसतानाच, शासनाने सिडको क्षेत्रातील जमिनींच्या बाबतीत हा नवा निर्णय घेतला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जागा आणि सिडकोने वाटप केलेल्या जागा या बहुतांश गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या सभासदांसाठी निवासी घरे बांधण्यास दिलेल्या आहेत. पूर्वी हा भाडेपट्टा ९९ वर्षांसाठीचा असायचा; आता तो ३० वर्षे इतक्या कमी कालावधीसाठी देण्यात येतो. मुदत संपली की, तो पुन्हा नव्याने वाढवून दिला जातो. त्यासाठी शासनाकडून वर्षाला किरकोळ शुल्क आकारले जाते. या जमिनींवर बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांत बहुसंख्य मध्यमवर्गीय राहतात. आपण मुंबई उपनगर जिल्ह्याचा विचार केला, तर जिल्हाधिकारी जमिनींवर सुमारे तीन हजार गृहनिर्माण संस्था आहेत. साधारण तेवढ्याच गृहनिर्माण संस्था सिडको क्षेत्रातील जमिनींवर आहेत.जमिनींचे दोन प्रकार आहेत. भाडेपट्ट्याच्या जमिनी आणि मालकीच्या जमिनी. शासनाच्या ताब्यातील जमिनी शासन गृहनिर्माणासहित इतर सार्वजनिक, सामाजिक कारणांसाठी भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देते. नवी मुंबईत शासनाने संपादित केलेल्या जमिनींचा विकास करून, ते भूखंड सिडकोने भाडेपट्ट्याने वाटप केले आहेत. अशा वाटप केलेल्या जमिनींचा भाडेपट्टा कालावधी वाढविण्याचा ठराव सिडकोच्या संचालक मंडळाने संमत करून मंत्रालयात मान्यतेसाठी पाठविला होता. त्याआधारे शासनाने या जागा हस्तांतर शुल्क घेऊन मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेतला. तो फक्त निवासी आणि वाणिज्य प्रयोजनाच्या जमिनींनाच लागू होईल. धर्मदाय, इस्पितळ, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि जिमखाना यांना दिलेल्या जमिनींना हा निर्णय लागू होणार नाही.एकदा का जमीन लिझहोल्ड (भाडे पट्टा) मधून फ्रीहोल्ड (मालकी) झाली की, त्या जमिनीवरील घरांची विक्री, हस्तांतर, गहाण ठेवणे, नवीन सदस्य दाखल करून घेणे, इमारतीचा पुनर्विकास यासाठी सिडको प्राधिकरण/संबंधित जिल्हाधिकाºयांच्या परवानगीची गरज लागत नाही. खरे तर भाडेपट्ट्याच्या जमिनींवर उभ्या असलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांचीच मागणी होती की, त्यांच्या संस्थेच्या जमिनी फ्रीहोल्ड कराव्यात, परंतु शासनाने प्रचलित बाजारभावाच्या २५ टक्के दराने लावलेले अधिमूल्य हे कोट्यवधी रुपयांच्या घरात जात असल्याने सामान्यांना ते परवडणारे नाही. हे अधिमूल्य दोन टक्के करावे, अशी मागणी आहे. म्हणूनच जिल्हाधिकाºयांनी भाडेपट्ट्याने वाटलेल्या जमिनी अधिमूल्य घेऊन मालकी हक्काने देण्याबाबतचा निर्णयाला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही अजून कोणीही पुढे आलेले नाही. आता सिडकोच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी मालकी हक्काने घेण्यासाठी किती लोक पुढे येतील, याबाबत शंका आहे. कारण सिडकोने रहिवासी कारणांसाठी भूखंड मालकी हक्काने देताना एकरकमी हस्तांतर शुल्क भूखंडाच्या क्षेत्राप्रमाणे बाजार भावाच्या पाच टक्के ते २० टक्क्यांपर्यंत आहे आणि वाणिज्य वापराच्या भूखंडासाठी हे शुल्क बाजारभावाच्या २५ टक्के ते ३० टक्के आहे. त्यामुळे याला किती प्रतिसाद मिळेल, हे येणारा काळच ठरवेल.

 

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगMaharashtraमहाराष्ट्र