शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

या एकोप्याला नेताही हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:08 IST

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाला देशातील ३१ टक्के मते मिळाली.

१९७५ ची अंतर्गत आणीबाणी मागे घेताच १९७७ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात देशातील सर्व काँग्रेसविरोधी पक्षांची जशी एकजूट दिल्लीच्या रामलीला मैदानावर दिसली, नेमकी तशीच सर्व भाजपविरोधी पक्षांची एकी परवा कर्नाटकात कुमारस्वामींनी घेतलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या वेळी आढळली. काँग्रेसच्या सोनिया गांधी, कम्युनिस्टांचे विजयन आणि येचुरी, उत्तर प्रदेशच्या मायावती व अखिलेश, बिहारचे तपस्वी यादव, राष्ट्रवादीचे शरद पवार, आंध्रचे चंद्राबाबू नायडू, बंगालच्या ममता बॅनर्जी हे सारेच विरोधी पक्षनेते यावेळी नुसते एकत्रच आले नाहीत तर त्यांच्यात भाजपविरोधी एकवाक्यता दिसून आली. पंजाबचे अमरिंदरसिंग यात दिसले नाहीत. मात्र ते काँग्रेसचेच नेते आहेत. आश्चर्य याचे की ‘पालघरमधील पोटनिवडणुकीत अडकलो नसतो तर आम्हीही आलो असतो’ हे रालोआतील शिवसेनेनेही या मेळाव्याला कळविलेले दिसले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला देशातील ३१ टक्के मते मिळाली. त्या हिशेबाने कर्नाटकात परवा जमलेल्या पक्षांच्या मतांची तेव्हाची एकूण बेरीज ६५ टक्क्यांच्या पुढे जाणारी आहे. ही मते या पक्षांना अशीच राखता आली तर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे पारडे जड होण्याची शक्यता मोठी आहे. तथापि या पक्षात अजून मतभेद शिल्लक आहेत. ममता बॅनर्जींचे डाव्यांशी जुळत नाही आणि मायावती व अखिलेश एकत्र असले तरी त्यांना काँग्रेसलाही सोबत घ्यावे लागणार आहे. झालेच तर व्यापक मतैक्यासाठी ज्या राज्यात ज्या पक्षाचे पारडे भारी, वा ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची मते अधिक ती राज्ये व ते संघ त्या पक्षांकडे सोपविण्याचे राजकीय औदार्यही या नेत्यांना दाखवावे लागेल. तसे समझोते होण्यात सध्या कोणत्या अडचणी मात्र नाहीत. यापैकी प्रत्येकच पक्षाला त्याची मर्यादा आता समजली आहे आणि ज्या भाजपाशी लढत द्यायची त्याचे राजकीय व आर्थिक बळही साऱ्यांच्या ध्यानात आहे. दुसरी महत्त्वाची अडचण केंद्रीय नेतृत्वाबाबतची आहे. मायावती, ममता आणि मुलायमसिंग यांच्याएवढेच पंतप्रधानपदाचे आकर्षण शरद पवारांनाही आहे. कधीकाळी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे मागे फारसे पाठबळ नसताना विरोधकांच्या मतांची बेरीज जुळवून त्या पदावर आले होते. तसेच काहीसे आपणही जमवू शकू असे पवारांसह अनेकांना वाटते. यातले वास्तव हे की हे सारे नेते व त्यांचे पक्ष प्रादेशिक आहेत. त्यांना त्याच मर्यादाही आहेत. या साºयात राष्टÑीय पातळीवर समर्थ असणारा व जनतेत पाठबळ असणारा पक्ष काँग्रेस हाच आहे. त्याचमुळे सोनिया गांधी या अजूनही संयुक्त पुरोगामी दलाच्या अध्यक्ष आहेत. त्या पक्षाने राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड केली आणि कर्नाटकातील निवडणुकीत सर्वाधिक परिश्रम केलेले नेतेही तेच आहेत. झालेच तर साºया देशात फिरून पक्षाची राष्टÑीय बांधणीही तेच करीत आहेत. त्यांनी पंजाब जिंकले, राजस्थानातील लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या आणि त्यांच्याखेरीज आपल्या राज्याबाहेर जाणारा दुसरा नेताही या पक्षांजवळ आज नाही. त्यामुळे आताच्या एकोप्यासोबतच राष्टÑीय नेतृत्वाबाबतही त्यांच्यात एकवाक्यता होणे अवघड नाही व ती तशी लवकर होणे आवश्यकही आहे. आपला देश व समाज प्रकृतीने मध्यममार्गी आहे आणि काँग्रेस पक्ष त्या मार्गाचा म्हणून ओळखला जाणारा आहे. शिवाय त्या पक्षात नेतृत्वाबाबत वाद नाही आणि अन्य नेत्यांशी राहुल गांधींचे संबंधही सलोख्याचे आहेत. सबब पक्षीय एकोप्याला नेतृत्वाबाबतच्या एकमताची जोड लवकर मिळाली तर सारेच पक्ष तात्काळ कामाला लागू शकतील. तसे होणे गरजेचे आहे कारण सार्वत्रिक निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. प्रादेशिक नेत्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षांना जरा आवर घातला तर हे राष्टÑीय ऐक्य साधता येणे सहज शक्यही आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी