शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

लॅण्ड बँक लावेल भूखंड घोटाळ्यांना चाप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 3:11 AM

अकोल्यात एकापाठोपाठ एक भूखंड घोटाळे उघडकीस येत असताना, अशा घोटाळ्यांना चाप लावण्यास सक्षम अशी, शेजारच्या वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्ड बँक प्रणाली, राज्य शासनाने संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी स्वीकारली आहे.

अकोल्यात एकापाठोपाठ एक भूखंड घोटाळे उघडकीस येत असताना, अशा घोटाळ्यांना चाप लावण्यास सक्षम अशी, शेजारच्या वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्ड बँक प्रणाली, राज्य शासनाने संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी स्वीकारली आहे.काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने अकोल्यात होऊ घातलेला तब्बल वीस कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा उघडकीस आणला होता. शासनाच्या मालकीचा सुमारे वीस कोटी रुपये किमतीचा भूखंड, भूमी अभिलेख विभागाच्या संगणकातील नोंदींमध्ये हेरफेर करून घशात घालण्याचा डाव रचण्यात आला होता. ‘लोकमत’ने तो चव्हाट्यावर आणल्यामुळे अखेर त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आणि सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीची हवा खात आहेत.अशाच आणखी एका प्रकरणात, अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि निवासी उप जिल्हाधिकाºयांच्या बनावट स्वाक्षरी करून, सुमारे सहा हजार चौरस फुटांचा शासकीय भूखंड बळकावण्यात आल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. उघडकीस आलेली ही प्रकरणे म्हणजे केवळ हिमनगाचे वरचे टोक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सरकारी मालकीच्या किती तरी जागा अशा रीतीने घशात घालण्यात आल्याची शंका आहे.हे प्रकार केवळ अकोल्यापुरते मर्यादित नक्कीच नसतील. संपूर्ण राज्यातच अशा प्रकारे शासकीय जमिनी गिळंकृत करणे सुरू असण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल, अशी लॅण्ड बँक प्रणाली वाशिमसारख्या मागास जिल्ह्याच्या प्रशासनाने विकसित करावी आणि ती शासनाने संपूर्ण राज्यासाठी स्वीकारावी, ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे.केंद्र व राज्य सरकारच्या अनेक विभागांकडे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी पडून आहेत. अनेकदा अशा जमिनींवर अतिक्रमणे होतात किंवा त्या घशात घालण्याचे प्रयत्न होतात. वाशिम जिल्हा प्रशासनाद्वारा विकसित लॅण्ड बँक प्रणालीमुळे अशा प्रकारांना आळा घालणे शक्य होईल. या प्रणालीमध्ये एक संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, त्यावर सर्व शासकीय जमिनी, भूदान चळवळीत जमा झालेल्या जमिनी, आदिवासी जमिनी, नझूलच्या जमिनींची नोंद आहे. अशा सर्व जमिनींची सांगड ‘गूगल मॅप’सोबत घालण्यात आली असून, संकेतस्थळावर हव्या त्या जमिनीचा नकाशा बघता येईल. प्रादेशिक योजना व विकास योजनांची माहितीही संकेतस्थळावर आहे. कोणती जमीन कशासाठी आरक्षित आहे, कुणाला देण्यात आली आहे, किती जमीन शिल्लक आहे, ही सगळी माहिती एका ‘क्लिक’वर मिळू शकेल.विशेष म्हणजे ही माहिती सर्वसामान्य जनतेसाठीही उपलब्ध असल्याने, ही प्रणाली संपूर्ण राज्यात सुरू झाल्यावर, शासनाच्या जमिनी हडपण्याच्या प्रवृत्तीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. ती प्रत्यक्षात उतरल्यास, राज्यातील सर्व प्रामाणिक नागरिक, लॅण्ड बँक प्रणाली विकसित करणारे वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उप निवासी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे आणि त्यांच्या चमूचे ॠणी असतील.- रवी टाले