शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दिवस लक्ष्मी पूजनाचा !

By दा. कृ. सोमण | Updated: October 19, 2017 06:00 IST

आज गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर, आश्विन अमावास्या , लक्ष्मी कुबेर पूजन, अलक्ष्मी निस्सारण आहे.दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे ! सन्मार्गाने मिळविलेला आणि सन्मार्गाने खर्च होणार्या संपत्तीला ' लक्ष्मी ' असे म्हणतात

ठळक मुद्देआज गुरुवारी सायंकाळी ६-१३ पासून रात्री ८-३९ पर्यंत प्रदोषकाल आहे. आज या वेळेत लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहेनवीन वस्त्रालंकार घालून आनंदोत्सव साजरा केला जातो. लक्ष्मी, कुबेर यांची पूजा करावयाची असतेव्यापारी लोक आपल्या हिशेबांच्या वह्यांवर ' श्री ' अक्षर लिहून वहीचे पूजन करतात

आज गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर, आश्विन अमावास्या , लक्ष्मी कुबेर पूजन, अलक्ष्मी निस्सारण आहे.दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे ! सन्मार्गाने मिळविलेला आणि सन्मार्गाने खर्च होणार्या संपत्तीला ' लक्ष्मी ' असे म्हणतात. भ्रष्टाचार , अनीतीने मिळविलेले पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे ! आज प्रदोषकाळी लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे. प्रथम ' प्रदोषकाळ ' म्हणजे काय ते पाहूया. रात्रीमानाचे पंधरा भाग केले तर एका भागाला ' मुहूर्त ' म्हणतात. सूर्य मावळल्यापासून पुढे तीन मुहूर्त ' प्रदोषकाल ' मानला जातो. यावर्षी आज गुरुवारी सायंकाळी ६-१३ पासून रात्री ८-३९ पर्यंत प्रदोषकाल आहे. आज या वेळेत लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. नवीन वस्त्रालंकार घालून आनंदोत्सव साजरा केला जातो. लक्ष्मी, कुबेर यांची पूजा करावयाची असते. व्यापारी लोक आपल्या हिशेबांच्या वह्यांवर ' श्री ' अक्षर लिहून वहीचे पूजन करतात.                                               लक्ष्मीची आवड                       पुराणात एक कथा आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रीयता , श्रम असतील तेथेच लक्ष्मी आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्र्यवान , कर्तव्यदक्ष,धर्मनिष्ठ,संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे राहणे लक्ष्मीला आवडते.लक्ष्मीला " तू राहते कुठे ? " असा प्रश्न विचारला असता ती म्हणते. -- "  मी प्रयत्नात राहते.प्रयत्नाच्या फलात राहते. मी उद्योगरूप आहे. मी साक्षात समृद्धी आहे. धर्मात्मे आणि सत्यवादी पुरुष यांच्या घरी माझे वास्तव्य असते. जोवर असुर सत्याला धरून वागत होते , तोवर मी त्यांच्या घरीही राहिले. जेव्हा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली तेव्हा मी त्यांचा त्याग करून देवेंद्राच्या राज्यांत दाखल झाले आणि स्वर्ग भरभराटीला आणला. शांती, प्रेम, दया, सलोखा , न्याय-नीती , औदार्य हे सद्गुण प्रकर्षांने जिथे दिसतात तेथे मी आकृष्ट होते.                 लक्ष्मी हा शब्द ' लक्ष्म ' म्हणजे चिन्ह यावरून बनलेला आहे. मात्र कोणत्या चिन्हावरून लक्ष्मीचा बोध होतो हे मात्र निश्चितपणे  सांगता येत नाही. लक्ष्मीचाच पर्यायी शब्द म्हणजे ' श्री '  होय. आणि श्री हेअक्षर स्वस्तिकापासून तयार झालेले आहे. श्री आणि लक्ष्मी हे दोन्ही शब्द ऋग्वेदात आहेत.श्रीसूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते. श्रीसूक्तात कमळ, हत्ती, सुवर्ण  आणि बिल्वफळ या गोष्टी लक्ष्मीशी निगडीत असल्याचे म्हटले आहे." लक्ष्मी हत्तीच्या आवाजाने जागी होते. बिल्व तिचा वृक्ष आहे.ती सुवर्णाची आहे. ती आल्हाददायक आहे. ती स्वत: तृप्त असून तृप्ती देणारी आहे. तिचा वर्ण कमलासारखा असून ती कमलावरच बसलेली आहे. "            श्रीसूक्तात लक्ष्मीची प्रार्थना करताना तिचे काव्यात्मक सुंदर वर्णन केलेले आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण सर्वांनी ती प्रार्थना म्हणूया ---                 " कमलात वास्तव्य करणार्या , कमल हाती धरणार्या , अतिधवल वस्त्र , शुभ्र चंदन  आणि शुभ्र पुष्पे यांनी शोभणार्या , विष्णूची प्रियवल्लभा असणार्या , सुंदर आणि त्रैलोक्याची समृद्धी करणार्या हे भगवती लक्ष्मी , तू मजवर प्रसन्न हो. ".           आपण नारळाचा ' श्रीफळ ' म्हणून उल्लेख करतो ते चुकीचे आहे. बिल्व वृक्षाचे फळ म्हणजे 'श्रीफळ ' होय. लक्ष्मी ही सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असल्यामुळे तिची आठ रूपे असल्याचे म्हटले आहे. (१) धनलक्ष्मी (२) धान्यलक्ष्मी (३) धैर्यलक्ष्मी (४) शौर्यलक्ष्मी (५) विद्यालक्ष्मी (६) कीर्तीलक्ष्मी (७) विजयलक्ष्मी (८) राज्यलक्ष्मी ही आठ रूपे पूजनीय ठरली आहेत. बल आणि उन्माद हे लक्ष्मीचे दोन पुत्र आहेत. परंतु हे पुत्र भावात्मिक असावेत. कारण ज्याच्या घरी लक्ष्मी येते तो बलवान होतो आणि पुष्कळदा उन्मत्तही होतो असा अनुभव येतो.  आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत असे लक्ष्मीचे चार पुत्र असल्याचे श्रीसूक्तात म्हटले आहे.                                      कुबेराचे पूजन          महाभारतात कुबेराचा उल्लेख पुलस्त्याचा पुत्र असा केलेला आहे. मात्र अथर्ववेदात कुबेराचा वैश्रवण असा उल्लेख आहे. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्त्य; पुलस्त्याचा पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र कुबेर असल्याचे म्हटले आहे. म्हणून कुबेराला वैश्रवण असे नाव मिळाले. कुबेराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला संतुष्ट केले व त्याच्याकडून संपत्तीचा स्वामी व विश्वरक्षक हे अधिकार प्राप्त करून घेतले. नंतर कुबेराने विश्वकर्म्याने बांधलेल्या सुवर्णतटमंडित लंकेवर अधिकार मिळवला आणि तेथेच तो राज्य करू लागला. कुबेराकडे पुष्पक विमान असल्याचाही उल्लेख आढळतो. पुढे रावणाने कुबेराचे सर्व हिरावून घेतले. नंतर कुबेर हिमालयातील अलका नगरीत जाऊन राहिला. लक्ष्मी-कुबेर पूजनाच्यावेळी लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवून त्याची पूजा व प्रार्थना करतात.                                       अलक्ष्मी निस्सारण          अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची देवता मानली जाते. आज हिची शेणाची मूर्ती बनवून तिला काळे वस्त्र नेसवून तिची पूजा करून गावाबाहेर नेऊन तिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य असावे आणि अलक्ष्मी आपल्या घरात येऊ नये यासाठी आज तिचेही पूजन करून तिला गावाबाहेर नेऊन विसर्जित केली जाते. समुद्र मंथनातून कालकूट नंतर परंतु लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी बाहेर आली. म्हणून हिला लक्ष्मीची मोठी बहीण समजले जाते. तिचे तोंड काळे, डोळे लाल आणि केस पिंगट होते. हिच्या शरीरावर म्हातारपणीच्या खुणा होत्या.  समुद्रमंथनातून बाहेर आल्यावर अलक्ष्मीने  देवांना विचारले " मी कुठे राहू ?" त्यावर देव म्हणाले --"  जिथे केस, कचरा, कलह, अनीती भ्रष्टाचार , असत्य भाषण ,सज्जनांची निंदा ,परद्रव्यहरण, आळस, व्यभिचार असेल तेथे तू रहा. "          अलक्ष्मीचे वाहन गाढव असून तिच्या हातात झाडू आहे. अलक्ष्मी म्हणजे कलह, अस्वच्छता ही आपल्या घरात राहू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक झाडूची पूजा करतात. लक्ष्मी-अलक्ष्मीसंबंधी एक कथा आहे.         एकदा लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघीही एका ऋषींकडे गेल्या. त्या दोघीवी ऋषींना विचारले " मुनीवर्य , आमच्या दोघींपैकी सुंदर कोण दिसतेय् ? आणि पहाणार्याला आनंद वाटतोय् ? "ऋषीना या दोघींपैकी कुणालाच नाराज करावयाचे नव्हते. ते म्हणाले-- " तुम्ही दोघीही समोरच्या झाडाला हात लावून इथे या. मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो."दोघीही पळत पळत झाडाला हात लावून परत ऋषींकडे आल्या. ऋषी म्हणाले, " अलक्ष्मी तू इथून जात असताना सुंदर दिसत होतीस. लक्ष्मी तू इथे येत होतीस त्यावेळी सुंदर दिसत होतीस."दोघींचे समाधान झाले. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य घरातून जाते त्यावेळी आपणास आनंद होते. लक्ष्मी म्हणजे संपत्ती घरात येते त्यावेळी आपणास आनंद वाटतो.लोकमतच्या सर्व वाचकांच्या घरातून अलक्ष्मी कायमची जावो आणि घरात लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य राहो यासाठी सर्वाना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा !(लेखक पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017