शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

आपत्ती निसर्गाची कमी, मानवाची अधिक--रविवार विशेष -जागर

By वसंत भोसले | Published: September 02, 2017 11:18 PM

आपल्या परिसरात १९५३ ते १९८३ आणि २००५ मध्ये महापुराने जो कहर केला होता, तसा आपत्तीचा धोका निर्माण झाला तर परिणाम अधिक गंभीर असतील. त्या आपल्या मानवी चुका आहेत.

ठळक मुद्दे आपण काहीच शिकत नाही आहोत. हे मुंबईने शिकविले आहे. आपली वेळ कधी येते पाहूया! दिवसेंदिवस अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या तीव्रतेत आपणच भर टाकीत आहोत. केव्हातरी कधीतरी अशी निसर्गदत्त आपत्ती येणार, त्यात काहीजणांचा जीव जाणार, थोड्या संपत्तीचा विनाश होणार, व्यवहार ठप्प होणार आणि महाराष्टच्या राजधानीत असंख्य समस्या कायमच्या घर करून बसलेल्या आहेत. त्

- वसंत भोसले

आपल्या परिसरात १९५३ ते १९८३ आणि २००५ मध्ये महापुराने जो कहर केला होता, तसा आपत्तीचा धोका निर्माण झाला तर परिणाम अधिक गंभीर असतील. त्या आपल्या मानवी चुका आहेत. वास्तविक अधिक समृद्ध समाजरचना करण्यासाठी या आपत्तीतून धडा घ्यायला हवा होता; पण आपण काहीच शिकत नाही आहोत. हे मुंबईने शिकविले आहे. आपली वेळ कधी येते पाहूया!मुंबई-ठाणे परिसरात चार दिवसांपूर्वी एका दिवसात धो-धो तीनशे ते साडेतीनशे मिलीमीटर पाऊस पडला. ही दोन्ही महानगरे क्षणार्धात थबकून गेली. रस्ते दिसेनासे झाले, रेल्वे रूळ, रेल्वेस्थानके पाण्याच्या प्रवाहात डुंबुन गेली. घरा-घरांत पाणी शिरू लागले. ब्रिटिशकालीन मुंबई शहराचा भाग वगळता उर्वरित मुंबई महानगर जलमय झाले. शासन ठप्प, देशाची आर्थिक राजधानी नि:शब्द आणि सर्व व्यवहार जिथल्या तिथे थबकले. लोक अडकून पडले. वास्तविक हा पाऊस महाप्रचंड वगैरे नव्हता. अशाप्रकारे पाऊस देशाच्या अनेक भागात होतो. प्रचंड दाटीवाटीनेअसलेल्या नागरी वस्तीत हा होत असल्याने हाहाकार उडाला, असे फार तर म्हणता येईल. ही आपत्ती काही सांगून येत नाही, त्यामुळे लोकांना सावध राहता येत नाही; पण ती कधी येणारच नाही, असे अजिबात नाही. ती केव्हा ना केव्हा किंबहुना केव्हाही ओढवू शकते. तिला तोंड देण्याची व्यवस्था करायला हवी आहे.महाराष्टच्या राजधानीत असंख्य समस्या कायमच्या घर करून बसलेल्या आहेत. त्यातून सुटका होत नाही. याउलट ठाणे, पुणे किंवा नाशिकसारख्या शहरांची भर पडत आहे. पुण्याची वाहतूक व्यवस्था, तेथील पर्यावरण, पाण्याचा पुरवठा, सांडपाण्याचा निचरा, घनकचºयाची विल्हेवाट आदी प्रश्न मुंबईच्या समस्यासारख्या गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. आता त्यांचा विस्तार होऊ लागला आहे.

या शहरानंतर औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सांगली यांचा नंबर लागू लागला आहे. खरंतर २६ जुलै २००५ रोजी मुंबई-ठाणे शहरांवर ज्या पद्धतीत पाऊस कोसळला होता, तितका तर चार दिवसांपूर्वी पडला नाही. त्याच्या एकतृतियांश झाला होता. २६ जुलै रोजी एका दिवसात ९९७ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यानंतर अशा प्रकारची आपत्ती येण्यास एक तप म्हणजे बारा वर्षे लागली. त्यामुळे चिंता करण्यासारखे काहीच वाटत नाही. केव्हातरी कधीतरी अशी निसर्गदत्त आपत्ती येणार, त्यात काहीजणांचा जीव जाणार, थोड्या संपत्तीचा विनाश होणार, व्यवहार ठप्प होणार आणि चार-आठ दिवसांनी सर्व काही सुरळीत चालणार, अशी आपली समजूत आहे. मात्र, यातील धोका ओळखायला हवा. कारण बारा वर्षांपूर्वी यापेक्षा तिप्पट पाऊस झाला होता. मात्र, हाहाकार आता उडाला तसाच होता. आता कमी पाऊस होऊनही चोवीस तास मुंबई महानगरी ठप्प झाली होती. प्रसारमाध्यमांच्या चष्म्यातून दिसले किंवा दाखविले गेले तेवढेच आपण सर्वांनी पाहिले आहे. रस्ते, रेल्वे रुळ आणि अनेक सोसायट्या पाण्यात बुडत होत्या. एवढेच नव्हे तर झोपडपट्ट्यांचे हाल कोणी पाहिले असेल का? रेल्वे किंवा बस वाहतूक ठप्प झाल्याचे वर्णन पाहत ऐकले; पण ज्या झोपडीत पाणी गेले तिथे राहणे अशक्य होते. अशी राहणारी चाळीस लाख जनता एकट्या मुंबईत आहे.

ही आपत्ती काही सांगून येत नसते. ती येणारच नाही असे ठामपणे सांगू शकत नाही. अशा महानगरांना किंवा समुद्र किनाºयावर वसलेल्या शहरांना कायमचा धोका असतो. त्यांना तोंड देणारी व्यवस्था निर्माण करणे ही प्राथमिकता असायला हवी. न्यूयॉर्क, टोकिओ किंवा इस्तंबूलसारखी एक कोटीपेक्षा अधिक लोकवस्तीची महानगरे समुद्र किनाºयावर आहेत. त्यांना पाऊस, वादळ-वारा यांचा धोका कायमच आहे. तिथेही अशी आपत्ती येते; पण ही शहरे जलमय होत नाहीत. माणसं पालापाचोळ्यासारखी पाण्यात वाहून जात नाहीत. रेल्वे स्थानकांचे रूपांतर तलावात होत नाही. आपल्याकडे आता थोडी तरी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली की, संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडते आहे. वाहतूक कोंडी त्यातीलच एक प्रकार आहे. आपल्याकडे असे एकही शहर नाही की, तिथे नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती आल्यास तिला तोंड देता येईल.बारा वर्षांपूर्वी २००५ मध्ये मुंबईप्रमाणेच कृष्णा खोºयातील नद्यांनाही महापूर आला होता. विशेषत: दक्षिण महाराष्टÑातील अनेक शहरे आणि गावे पाण्याखाली गेली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याचा निम्मा भाग पुराच्या पाण्यात बुडाला होता. सांगलीसारखे शहर निम्मे पाण्यात होते. कोल्हापूर शहराचीही तीच अवस्था होती. भिलवडीसारख्या मोठ्या गावातील दहा हजारांहून अधिक माणसे केवळ चार गल्ल्यात जमून कशीबशी जीव वाचवत होती. उर्वरित गाव चारी बाजूने पाण्याने वेढले होते. नृसिंहवाडी पूर्णत: पाण्यात गेली होती. तशी आपत्ती पुन्हा येणार नाही, याची हमी कोणीही देऊ शकत नाही. त्या आपत्तीचे प्रमाण किंवा सातत्य कमी असल्याने तो धोका वाटत नाही.

१९८३ नंतर २००५ मध्ये म्हणजे बावीस वर्षांनी अशा प्रकारचा धोका उद्भवला होता. त्यापूर्वी १९५३ मध्ये महापूर आला होता. त्यात तीस वर्षांचे अंतर होते. आता बारा वर्षांनी त्या स्थितीत येऊन पोहोचलो आहोत. वारणा नदीला १९५३ मध्ये आलेल्या महापुराने अनेक गावे पाण्यात बुडाली होती. त्यापैकी पारगाव गावाचे नवे पारगाव म्हणून वाठार-वारणा रस्त्यावर पुनर्वसन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या कोरेगावचे पूर्णत: नवे गाव पुनर्वसित करण्यात आले होते. याचा अर्थ धरणे नव्हती तेव्हाही पाण्याचा असा लोंढा येत होता. आता बहुतांश नद्यांवर धरणे झाल्याने अचानक मोठा पूर येण्याचा धोका नाही. मात्र, ही धरणे पूर्ण भरली आणि पावसाचा जोर वाढत राहिला तर पाण्याचा विसर्ग करावा लागतो. अशा प्रसंगी महापुराचा धोका समोर उभा राहतो.

मुंबईत झाला तसाच पाऊस कृष्णा खोºयाच्या पाणलोट क्षेत्रात झाला असता तर हाहाकार माजला असता. तो धोका अजूनही टळलेला नाही. कोयनापासून सर्वच छोटी-मोठी धरणे भरली आहेत. सर्वच धरणांतून पाण्याचा थोडा विसर्ग करण्यात आला आहे. या पावसाचे पाणी आणि धरणातून विसर्ग झालेले पाणी नदी पात्रात एकाच वेळी आले तर ते पुढे सरकण्यास वावच नाही. त्याचा फटका अनेक गावांना बसणार आहे.मुंबईत ज्याप्रमाणे अचानक कोसळणाºया पावसाच्या पाण्याला समुद्राकडे वाहत जाण्यास मार्ग उरलेला नाही. ते पाणी तुंबते आणि मुंबईचा ‘तुंबई’ अशी ओळख अधोरेखित होते. तीच अवस्था कोल्हापूर, कºहाड किंवा सांगली शहरांसह अनेक गावांची होणार आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुराने उच्चत्तम पातळी गाठली होती. धोक्याचीही पातळी गाठू शकते. तेव्हा ते प्रमाण मानून नदीपात्रातून कृष्णा-कोयनेच्या संगमावर, ताकारीच्या पुलाजवळ, भिलवडी किंवा सांगली जवळच्या पुलावर पाणी किती येऊ शकते. त्याचा विसर्ग प्रतिसेकंद किती असणार आहे, याची ती कमाल पातळी होती.

पंचगंगेची कोल्हापूरजवळची पातळी आणि शहरातील हिरव्या पट्ट्यातील किती बांधकामामध्ये पाणी शिरते हे देखील निसर्गाने आपणास २००५ मध्ये शिकविले आहे. कृष्णा आणि पंचगंगेचा संगम नृसिंहवाडीस होत असताना शिरोळ तालुक्यात कशी दाणादाण उडते हे देखील दिसले आहे. त्या शिकवणीतून ज्ञानार्जन काय केले आणि व्यवहार कोणता करतो आहोत? याची उत्तरे कोणी देणार नाही. २००५ ला झाला त्या प्रमाणात पाऊस होणारच नाही, याची खात्री देता येत नाही; पण १९५३, १९८३ किंवा २००५ पेक्षा पाऊस कमी होऊन धोकावाढला आहे, हे देखील परवाच्या मुंबईतील हाहाकाराने सिद्ध केले आहे. तीनशेच्या ऐवजी हजार मिलीमीटर पाऊस झाला असता तर मुंबईची अवस्था काय झाली असती? दिवसेंदिवस अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या तीव्रतेत आपणच भर टाकीत आहोत. आपत्तीची तीव्रता कमी, पण परिणाम अधिक अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यात भरच पडत जाणार आहे. त्यामुळे न सांगता येणाºया आपत्तीचा धोका वाढत जाणार आहे. तो मात्र मानवनिर्मितीचा धोका असेल. आपल्या परिसरात १९५३ ते १९८३ आणि २००५ मध्ये महापुराने जो कहर केला होता, तसा आपत्तीचा धोका निर्माण झाला तर परिणाम अधिक गंभीर असतील. त्या आपल्या मानवी चुका आहेत. वास्तविक अधिक समृद्ध समाजरचना करण्यासाठी या आपत्तीतून धडा घ्यायला हवा होता; पण आपण काहीच शिकत नाही आहोत. हे मुंबईने शिकविले आहे. आपली वेळ कधी येते पाहूया!