शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय विद्यालय : वर्गातील संख्या वाढविणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 09:33 IST

Education News: महाराष्ट्रात दोन भागात विभागणी केलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या प्रत्येक वर्गाची आसनसंख्या वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे सोमवारी लोकसभेत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लेखी उत्तरात सांगितले.

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : महाराष्ट्रात दोन भागात विभागणी केलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या प्रत्येक वर्गाची आसनसंख्या वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे सोमवारी लोकसभेत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लेखी उत्तरात सांगितले. याबाबतचा प्रश्न रामदास तडस यांनी विचारला होता. प्रधान म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात ५९ केंद्रीय विद्यालये कार्यरत असून, एक नवे केंद्रीय विद्यालय अकोल्यात सुरू करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. हा प्रस्ताव अटी पूर्ण करीत असून, इतर अशाच प्रस्तावांशी स्पर्धा करीत आहे.’ अमरावती जिल्ह्यात नवे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव ठरावीक नमुन्यात महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीय विद्यालय संघटनेला मिळालेला नाही, असे सांगून प्रधान म्हणाले की, ‘नवे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे.’ केंद्रीय विद्यालये ही प्रामुख्याने संरक्षण आणि निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांसह बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले, स्वायत्त संस्था, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट हायर लर्निंगच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचा समान कार्यक्रम देऊन सुरू केली जातात. 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा