शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

फुकटात ‘जिओ’ चालणार नाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 07:03 IST

कालच्या रविवारची गोष्ट. राखी पौर्णिमा असल्याने सकाळपासून भावा-बहिणीच्या नात्याची महती सांगणाऱ्या मेसेजेस्चा व्हॉट्अपवर अक्षरश: पूर आला होता.

कालच्या रविवारची गोष्ट. राखी पौर्णिमा असल्याने सकाळपासून भावा-बहिणीच्या नात्याची महती सांगणाऱ्या मेसेजेस्चा व्हॉट्अपवर अक्षरश: पूर आला होता. त्यामुळे विरंगुळ्यासाठी म्हणून टी.व्ही आॅन केला. समोर बघतो तर काय, टीव्हीच्या पडद्यावर चित्रांऐवजी काळ्या मुंग्या! चारदोनदा टीव्ही चालू-बंद करून पाहिला, रिमोट आपटून बघितला, केबल चेक केली; परंतु तरीही ‘ब्लॅकआऊट’ कायम!‘अगं केबलवाल्याचे पैसे दिलेस ना?’ गृहमंत्र्यांसमोर आम्ही शंका उपस्थित केली. ‘अहो कालच तर दिलेत नं तुम्ही सहा महिन्यांचे आगाऊ!’ सौ.च्या या उत्तराने आमची पुरती गाळण उडाली. केबलच्या कंट्रोलरूमची वीज गेली असेल कदाचित, म्हणून आम्ही टीव्ही बंद करून टाकला अन् समोर टेबलावर पडलेलं वर्तमानपत्र उघडलं.

सिनेमा-नाटकांच्या जाहिराती, टेरेस गार्डन, स्विमिंग पूल, स्पा, बार, जीम इ. सुविधा असलेल्या आलिशान फ्लॅट्सवर आलेल्या आॅफर्स बघून झाल्यानंतर (जाहिराती बघायला कुठे पैसे पडतात!!) आम्ही बातम्यांवर नजर फिरवली. ‘डिजिटल इंडियात केबल फुकटात देणार असाल, तर भाज्या आणि पेट्रोल-डिझेलही फुकटात द्या- सेना प्रमुखांची मागणी’ या बातमीनं आमचं लक्ष वेधून घेतलं. बातमीच्या शीर्षकातच ‘केबल’ असा शब्द असल्याने आम्ही ती मुळासकट वाचून काढली. पण ‘जिओ’, ‘धंदा’, ‘फुकटात’ आणि ‘उपासमार’ असे परस्परविसंगत शब्द असल्याने आमचा पुरता गोंधळ उडाला. एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘तूम जिओ हजारो साल...’ म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यामुळे ‘जिओ’मुळे उपासमारीची पाळी कशी येईल? जर कुणी फुकटात देत असेल तर देणाºयांचा ‘धंदा’ बसेल की नाही? मग इतरांनी उगीच कशाला काळजीत पडायचं? मराठी माणूस इथेच मागे पडतो! आपणही धंद्यात पडायचं नाही अन् इतरांनाही पडू द्यायचं नाही. डिजिटल इंडियामुळे अनेकांना घरबसल्या रोजगार मिळाला आहे. इतरांच्या बँक खात्यातील पैसे बिनबोभाट आपल्या खात्यात वळवून रात्रीतून अनेकजण करोडपती झाले. पण तिथेही मराठी माणूस मागेच. आजवर एकही मराठी माणूस बँकांना गंडवून परदेशात पळून गेल्याचे ऐकिवात नाही. मराठी युवकांना असे ‘स्कील इंडिया’चे प्रशिक्षण देण्याऐवजी जिओ टीव्हीला विरोध करून सेना-मनसेला काय ‘मिळणार’ आहे? जिओची केबल आपल्या टीव्हीला लागणार असेल तर लागू देत की! बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंतचा सगळा ‘खुल्लमखुल्ला’ मामला घरबसल्या अन् तोही फुकटात बघायला मिळेल. पण सेनाचालकांना असली फुकटेगिरी अजिबात मान्य नाही म्हणे! जिओला त्यांचा ठाम विरोध असल्याचे वाचून आमच्या मनसुब्यांवर पाणीच पडले. रविवार असल्याने टीव्हीवरील रिपीट एपिसोड बघण्यासाठी इकडे ‘सौ’ची आवराआवर सुरू होती. त्यामुळं केबलचालकाला फोन करणे भाग होते. केबल का बंद आहे? ते कधी सुरू होणार? जिओला सेनेचा विरोध का? निवडणुकीत भाषणं दाखवली जाणार नाहीत अशी भीती वाटते, की फक्त भाजपाचा प्रचार केला जाईल अशी शंका आहे? मनात आलेले असे असंख्य प्रश्न केलबचालकाला विचारणार तोच पलीकडून ‘जय महाराष्टÑ!’ म्हणून फोन ठेवून दिला गेला. कुणी फुकटात जिओ म्हटले तर भलतेच महागात पडते!- नंदकिशोर पाटील

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ