शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

हे कधीतरी व्हायचेच होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 01:12 IST

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या रा.स्व. संघाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संघटनांना अमेरिकन सरकारच्या ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) या जगभर काम करणाऱ्या गुप्तहेर संघटनेने ‘धर्मांध व अतिरेकी’ संघटनांच्या जागतिक यादीत जमा केले आहे.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या रा.स्व. संघाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संघटनांना अमेरिकन सरकारच्या ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) या जगभर काम करणाऱ्या गुप्तहेर संघटनेने ‘धर्मांध व अतिरेकी’ संघटनांच्या जागतिक यादीत जमा केले आहे. या संघटनांनी भारतात केलेला अतिरेक व हिंसाचार संघ आणि भाजप सरकारच्या मदतीने आजवर जेवढा चर्चिला जावा तेवढा येथे झाला नाही. भारतातील अल्पसंख्य, दलित, धर्मनिरपेक्षतावादी, सुधारणावादी व स्वतंत्र वृत्तीच्या पत्रकारांना या संघटनांनी आजवर जे छळले आणि सर्व तºहेच्या धमक्या देऊन त्यांना धास्तावून सोडले तो प्रकार देशांतर्गत घटनांचा भाग म्हणून जनतेनेही मूकपणे पाहण्याचेच काम केले. मात्र मध्य आशिया, पॅलेस्टाईन आणि जगाच्या अन्य भागात आपल्या अतिरेकी कारवायांनी धुमाकूळ घालीत असलेल्या संघटनांवर सातत्याने लक्ष ठेवणाºया व प्रसंगी त्यांचा बंदोबस्त करायला पुढे होणाºया सीआयएच्या नजरेतून भारतात घडत असलेला धार्मिक अतिरेकाचा उद्रेक लपणारा नव्हता. शिवाय ती संघटना त्याबाबत गप्पही राहणारी नव्हती. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटामागे पाकिस्तान होते. मात्र बाबरीच्या विध्वंसापासून ओरिसातील चर्चेसच्या जाळपोळीमागे व गुजरातमधील मशिदींच्या तोडफोडींमागे याच संघटना असल्याची चर्चा देशात व जगातही होती. पण सरकारचा पाठिंबा त्यांनाच असल्याने व बहुसंख्यांकवादाचा पुरस्कार करणाºया संघाचा आशीर्वादही त्यांना असल्याने त्याविषयी प्रसिद्धी माध्यमांसह सारेच गप्प होते. पॅलेस्टाईनमधल्या ज्यूंच्या संघटना किंवा अफगाणिस्तानपासून इराक व सिरियापर्यंत हिंसाचार घडविणाºया इस्लामिक संघटना जर अतिरेक्यांच्या यादीत असतील तर केवळ स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाºया आणि सरकार व संघाच्या पाठिंब्याने तीच कामे करणाºया विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाला कधी ना कधी त्यांच्या रांगेत उभे केले जाईल हे अपेक्षित होते व ते आता झाले आहे. यावर सरकारची वा संघाची प्रतिक्रिया अजून उमटली नाही. पण ती का व कशी असेल याचा अंदाज बांधणे अवघड नाही. ‘सीआयए ही संघटना भारताच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करीत आहे’, ‘त्यांचे खरे स्वरूप सीआयएला समजलेच नाही’ इथपासून अमेरिकेचा निषेध करण्यापर्यंत त्यातील काहींची मजल जाईल. भारत सरकार अमेरिकेच्या दबावामुळे व ट्रम्प यांच्या स्वभावामुळे एखादेवेळी तसे करणार नाही. मात्र त्याच्याही मनात तसे आल्यावाचून राहणार नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेने काश्मिरातील शांतता व सुव्यवस्था याबाबत प्रकाशित केलेल्या अहवालावरील आपल्या सरकारची प्रतिक्रिया ज्यांनी पाहिली त्यांना याहीबाबत सरकार व त्याच्या पाठिराख्या संघटनांची याही विषयीची प्रतिक्रिया समजू शकणारी असेल. गेल्या काही दिवसात या संघटनांचे सदस्य मालेगाव, समझोता एक्स्प्रेस, बंगलोर, हैदराबाद व अन्य जागी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या आरोपातून सहीसलामत कसे सुटले हे ज्यांंना समजते त्यांना या संघटनांच्या पाठीशी असणाºया यंत्रणांचे सामर्थ्यही समजू शकते. त्याचवेळी दादरी कांड, गुजरातेतील दलितांना झालेली मारहाण, झारखंडमधील दलितांना जिवंत जाळण्याचे झालेले प्रकार याही साºया गोष्टी ज्यांनी केल्या त्यांची नावे लोक उघडपणे घेत नसतील तरी ती त्यांच्या मनात आहेत. झालेच तर दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या स्वतंत्र विचारांच्या लेखक व पत्रकारांच्या हत्या कुणी केल्या आणि देशात गेल्या चार वर्षात किती डझन पत्रकार मारले गेले याही गोष्टी कुणापासून लपलेल्या नाहीत. भारतात लोकशाही व विचारस्वातंत्र्य आहे. मात्र विचारस्वातंत्र्याचा समर्थपणे वापर करण्याएवढी आपली मानसिकता अजून बळकट झाली नाही. अमेरिका हा या संदर्भात अतिशय प्रगत देश आहे. त्यातील सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष अध्यक्षाविरुद्धही चौकशा करायला व त्याच्यावर आरोप ठेवायला मागेपुढे पाहात नाहीत. त्यामुळे त्यांनी वि.हिं.प. व बजरंग दल यांना दहशतवादी ठरविले असेल तर तो देशाच्या व सरकारच्याही प्रतिष्ठेला बाधा आणणारा प्रकार आहे.

टॅग्स :IndiaभारतTerrorismदहशतवादHindutvaहिंदुत्व