शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

इराण्यांचं कन्नड... इस्रायलींचं कीर्तन ! कन्नड बोलणारे इराणी आणि मराठी गाणारे इस्रायली

By सचिन जवळकोटे | Updated: March 8, 2026 08:32 IST

इस्रायल व इराण भारताचे प्राचीन काळापासून मित्र. व्यापार अन् सांस्कृतिक आदान-प्रदान हा संबंधांचा पाया. त्यानिमित्ताने दोन्ही देशांतून हजारो नागरिक  भारतात आले. या मातीचा भाग झाले. अशा समुदायाच्या घेतलेला वेध.

सचिन जवळकाेटेकार्यकारी संपादक, काेल्हापूर

इस्रायल-इराण युद्धात भारतानं नेमकी कुणाची बाजू घ्यावी, यावर सध्या साेशल मीडियावर प्रचंड वैचारिक धुमाकूळ सुरू झालाय. मात्र, या दाेन्ही देशांशी आपला ऋणानुबंध हजाराे वर्षांपासूनचा. व्यापारातील व्यवहार असाे वा सांस्कृतिक देवाण-घेवाण. या निमित्तानं भारतात आलेल्या दाेन्ही देशांचे शेकडाे बांधव इथंच स्थायिक झाले. त्यांच्या कैक पिढ्या आपल्या महाराष्ट्रातच जन्मल्या. मराठी बाेलत-बाेलत माेठ्या झाल्या. पश्चिम महाराष्ट्रात आजही अनेक गावांत ‘इराणी वसाहती’ दिमाखात उभ्या. सांगली-काेल्हापूर परिसरातल्या या मंडळींना पूर्वी ‘भटकी जमात’ म्हणून ओळखलं  गेलं असलं तरी कायद्यानं यांना ‘भारतीय इराणी’  म्हणून  अधिकृत स्वतंत्र ओळख दिली.

माेघल साम्राज्यापूर्वीही म्हणजे जवळपास सहाशे-सातशे वर्षांपूर्वी रत्नं अन् जातिवंत घाेडे विकण्यासाठी ही इराणी मंडळी दिल्ली परिसरात यायची. दक्षिण भारतातला मसाला घेऊन परत जायची. मात्र, माेघलांसाेबत मराठी मुलखात आलेली ही जमात इथंच स्थायिक झाली. स्वातंत्र्यानंतर चष्मे अन् गाॅगल विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या मंडळींपैकी काही नावं ‘खाकी’च्या हिटलिस्टवरही आलेली. मात्र, शिक्षणाच्या प्रवाहात सांगली स्टेशनजवळच्या या वसाहतीनं स्वत:ला पूर्णपणे बदलवलं. इथल्याच एक कन्या फिजा इराणी या आता थेट न्यायाधीशपदापर्यंत पाेहाेचल्या. त्यांची बहीण अन् वहिनीही वकील. जुन्नरमधल्या याच समाजातला एक तरुण थेट इराणमध्ये डाॅक्टरकी शिकून पुन्हा इथं येऊन प्रॅक्टिस करू लागला. पुण्यातली शहजादी इराणी आता एअर हाॅस्टेसही बनली. बुऱ्हाणपूरची काश्मिरीही कायद्याच्या ज्ञानातून समाजाला घडवू लागली. कधीकाळी राजे-राजवाड्यांसाठी गालिचा तयार करणाऱ्या या भारतीय इराण्यांसाठी आता आदराचं ‘रेड कार्पेट’ पसरलं जाऊ लागलं. 

‘आमचा फिरता व्यवसाय; घरात पर्शियन, वस्तीत हिंदी तर बाजारपेठेत मराठी बोलतो’

१. जयसिंगपूर येथील रफिक इराणी वयाच्या सत्तराव्या वर्षीही फिरता व्यवसाय करतात. केवळ मराठीच नव्हे तर कन्नड भाषेवरही त्यांचं चांगलंच प्रभुत्व. सांगलीचे इराणी सांगतात, ‘आम्ही घरात पर्शियन इराणी भाषा बाेलताे. वस्तीतल्या मुस्लिम समाजबांधवांसाेबत हिंदी तर बाजारपेठेत मराठी. आमच्या ईदला मराठी बांधव घरी येतात. गणपती पूजेवेळी आम्हीही मंडपात जाताे. पूर्वीपासून केवळ व्यापारावरच पाेट अवलंबून असल्यानं इराणी लिपी मात्र पिढ्यान् पिढ्या कुठंच जपता न आलेली.’ असं असलं तरीही महाराष्ट्रातले इराणी दाेन-तीन वर्षांतून एकदा का हाेईना इराणला जातात. मशद इराण अन् कुम इराण इथल्या धार्मिक स्थळांना भेट देऊन तेहरानमध्येही फेरफटका मारतात.

२. इसवी सन सुरुवातीच्या शतकात इराणमध्ये पर्शियन-ससानियन तर भारतात सातवाहन-कुशाण साम्राज्य. मसाले, कापडं, रत्नं, हस्तिदंत अन् धातूंची देवाणघेवाण दोन्ही साम्राज्यात. भारताच्या वायव्य भागात आजही पर्शियन लिपीचा प्रभाव, तर इकडच्या भारतीय विचारांचं अस्तित्व आजही इराणमध्ये. मध्यकालीन पारशी-भारतीय संस्कृतीच्या एकीकरणाचा पाया यातूनच मजबूत बनत गेला.

३. पारशी समाजही मूळचा पर्शिया (इराण)मधला. ते भारतात स्थायिक झाले. या समाजाच्या अंत्यविधीला ‘दख्मा’ म्हणतात. ‘टाॅवर ऑफ सायलन्स’ मध्ये उघड्यावर ठेवलेल्या मृतदेहाचं गिधाडं विघटन करतात. पृथ्वी, अग्नी अन् जल हे मृतदेहामुळे अपवित्र होऊ नये ही यामागची श्रद्धा. साताऱ्यात हायवेवरील खिंडीजवळ तर सोलापुरात सत्तर फुटामागे पारशी विहीर होती. जी याच अंत्यविधीसाठी वापरली जायची. आता गिधाडंच नसल्यानं परंपरेत बदल झाला.

‘बेन्ने इस्रायली ऑफ महाराष्ट्र’

मध्यंतरी इस्रायलमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात ‘बेन्ने इस्रायली ऑफ महाराष्ट्र’ या शब्दाचा वापर केलेला. या वाक्यामागं तब्बल दोन हजार वर्षांचा इतिहास. रोमन साम्राज्याच्या अत्याचाराला कंटाळून अनेक ‘ज्यू’नी त्यावेळी देश सोडला हाेता. त्यातलेच काही बोटीनं भरकटत पोहोचले भारतात. थेट कोकणात. त्यांनी आपली भारतीय, मराठी संस्कृती स्वीकारली. त्यांना ‘जुदाव मराठी’ म्हणून आजही ओळखलं जातं.

सध्या हजारो इस्रायली कुटुंबं भारतभर राहातात. रायगड जिल्ह्यातील नागांव, रेवदंडा, मुरूड, पनवेल अन् पेण परिसरात अनेक इस्रायली तेल निर्मिती, फर्निचरचा व्यवसाय करतात. त्यांची आडनावं दिवेकर, वासकर अन् अष्टेकर अशीच टिपीकल मराठी राहिलेली. ‘रायगड ज्यूईज असोसिशएन’ या संस्थेच्या माध्यमातून सारा समाज एकत्र येतो.  

या समाजाचे बेंजामिन सांगतात, ‘महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बेन्ने इस्रायल फॅमिली राहते. आम्ही  भारताच्या संस्कृतीत पूर्णपणे मिसळून गेलाेय. आम्ही आमचे सण तर साजरे करतोच. सोबत भारतातल्या सोहळ्यांचाही आनंद घेतो. आमचे जेवण टिपिकल कोकणी पद्धतीचंच.’

१९४८ नंतर इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर कोकणातली बहुतांश मंडळी तिकडे रवाना झाली. मात्र, आजही ते घरात मराठीतच बोलतात. मराठी कीर्तनही करतात. महाराष्ट्रातील विद्यापीठाच्या मदतीनं इस्रायलमध्ये मराठी भाषेचे वर्गही सुरू सुरू आहेत. तिथं चक्क ‘मायबोली’ नावाचं मासिकही प्रसिद्ध केलं जातं.

English
हिंदी सारांश
Web Title : Iranian Kannada, Israeli Kirtan: A Tale of Two Cultures in Maharashtra

Web Summary : Maharashtra hosts Iranian and Israeli communities deeply rooted in its culture. Iranians, known for trade, speak Kannada and Marathi. Israelis, arriving centuries ago, maintain Marathi traditions, even performing Kirtan. Both groups exemplify India's diverse cultural integration, showcasing unique blends of language and customs.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलIndiaभारत