शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

न झालेली पवारांची मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 03:36 IST

विश्व मराठी अकादमीच्या वतीनं पुण्यात ३ जानेवारीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार होता. मनसेप्रमुख राज ठाकरे ही मुलाखत घेणार असल्यामुळे गर्दीचे विक्रम मोडीत निघाले असते.

- नंदकिशोर पाटीलविश्व मराठी अकादमीच्या वतीनं पुण्यात ३ जानेवारीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार होता. मनसेप्रमुख राज ठाकरे ही मुलाखत घेणार असल्यामुळे गर्दीचे विक्रम मोडीत निघाले असते. पण कोरेगाव-भीमाची दंगल आणि महाराष्टÑ बंदमुळे संयोजकांना मुलाखतीचा तो कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. अनेकांचा हिरमोड झाला. कदाचित हा कार्यक्रम होऊ नये म्हणूनच त्या दंगलीचा कट शिजला असावा, असा संयोजकापैकी काहींचा दावा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिल्याचे समजते!असो. साहेबांची मुलाखत घ्यायची म्हणून राज यांनी रात्ररात्र जागून जोरदार तयारी केली होती. प्रत्येक मनसैनिकांकडून प्रश्न मागवले होते. बाळा नांदगावकरांना समोर बसवून रंगीत तालीमही करून घेतली होती. समजा ती मुलाखत झालीच असती तर, राज-पवार यांची जुगलबंदी अशी रंगली असती.राज: (चेहºयावरचा घाम पुसत) समोर काय वाढून ठेवलंय याची मला कल्पना आहे. (टाळ्या) एकवेळ चित्र काढायला सांगितलं असतं तर बरं झालं असतं. हात बसलेला असतो ना! असो. कुठून सुरुवात करू?पवार: कुठूनही करा, पण पोटावरून नको!(सभागृहात एकच हंशा)राज: मी पाठीमागून काही करत नाही. जे काय ते समोरासमोर. काहीजण असतात पाठीवर पडलेले. त्याला आपण काय करणार?पवार: मी व्यंगचित्राबद्दल बोललो. तुम्ही नेहमी माझ्या पोटावरच फटकारे मारत...राज: बाळकडू, दुसरं काय! इंदिरा गांधींच्या नाकाला आणि शरदरावांच्या पोटाला पर्याय नाही, असं बाळासाहेब म्हणायचे!(सभागृहात एकच हंशा)पवार: तेव्हापासून मी कोट घालू लागलो!राज: आज सकाळी मुंबईहून विमानाने येताना तुम्ही रायगड जिल्ह्यातील काही गावं दाखवत होतात. तिथलं पीकपाणी काय, माणसं कोण, धरणं कोणती वगैरे. हे सगळं कुठून येतं?पवार: सकाळी लवकर उठल्यावर!(पवारांनी टाकलेल्या या गुगलीवर राज यांचा चेहरा बघण्यासारखा झाला)राज: हल्ली मी लवकर उठतो. हवं तर शर्मिलाला विचारा. पण उठून लगेच बाहेर पडायचं म्हणजे जरा... शिवाय, जायचं कुठं?पवार: मातोश्रीवर चक्कर टाकायची! तेवढेच पाय मोकळे होतात आणि तिकडचं वर्तमानही कळतं. नाही का?(सभागृहात एकच हंशा)राज: तेवढ्यासाठी ‘सामना’ आहे की! तसं, बाळासाहेब असताना जायचो मी अधूनमधून. पण ब्रेकफास्टला काय तर वडापाव!पवार: मी फिरण्याबद्दल बोललो.राज: तेच ते. अहो, सध्या कुणी काय खायचं हे देखील दुसरेच ठरवतात. नॉनव्हेज चालत नाही म्हणून ते गुजराती आपल्या मराठी माणसांना दारातही उभं करत नाहीत. फुटपाथवर भय्ये पसरलेत...काय मोगलाई आहे का?पवार: शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्टÑात सर्व जातीधर्माची माणसं गुण्यागोविंदाने नांदली पाहिजेत, ही आजवर व्यक्तिश: माझी भूमिका राहिलेली आहे...राज: ते जाऊ द्या हो! मला सांगा, आपलं पंतप्रधानपदाचं घोडं नेमकं अडतं तरी कुठं?पवार: मराठी माणसांच्या एकीत!राज: माझंही तेच म्हणणं आहे. पण...पवार: ठरलं तर. आजचं डिनर मातोश्रीवर! 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार