लव्ह जिहादचा आंतरराष्ट्रीय चेहरा उघड
By Admin | Updated: September 22, 2015 21:51 IST2015-09-22T21:51:34+5:302015-09-22T21:51:34+5:30
केरळ, कर्नाटक, आंध्रसह देशातील अनेक राज्यातील हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना वैभवसंपन्न जीवनाची भुरळ घालून इस्लामी तरुणांनी त्यांना स्वत:शी लग्न करण्यास भाग पाडले

लव्ह जिहादचा आंतरराष्ट्रीय चेहरा उघड
बलबीर पुंज ( माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा)
केरळ, कर्नाटक, आंध्रसह देशातील अनेक राज्यातील हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना वैभवसंपन्न जीवनाची भुरळ घालून इस्लामी तरुणांनी त्यांना स्वत:शी लग्न करण्यास भाग पाडले आणि त्यानंतर त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडून त्यांचा वापर जिहादसाठी करण्यात आला असल्याचे अनेक प्रकार घडकीस आले आहेत. गेल्याच आठवड्यात युनायटेड अरब एमिरेटसने एका हैद्राबादच्या तरुणीला इसिससाठी ती काम करीत असल्याच्या आरोपावरून भारत सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा तपास संस्थेकडे सोपविल्याची घटना घडली आहे. अबुधाबीहून ती भारतात आल्यावर तिची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा ती भारतीय तरुणांना स्वत:ची भुरळ घालून त्यांची इसिस या दहशतवादी संघटनेसाठी भरती करीत असल्याचे उघडकीस आले आहे.
त्या तरुणीचे नाव आफ्सा जबीन असे आहे. तिने अनेक ख्रिश्चन नावे धारण केली असल्याचेही उघडकीस आले आहे. बऱ्याच वेळा ती निकोल जोसेफ या ख्रिश्चन नावाने ओळखली जायची. रंगाने गोऱ्या, उत्तम इंग्रजी संभाषण चातुर्य असलेल्या निकोल जोसेफच्या संबंधात येणाऱ्या तरुणांना ती ब्रिटिश असल्याचे सांगायची. त्यामुळे ती ब्रिटिश नागरिक असल्याची खात्री पटून तिच्या माध्यमातून आपल्याला इंग्लंडमध्ये जाता येईल असे वाटून तिच्या संपर्कात येणारी तरुण मुले नकळत इसिसच्या जाळ्यात सापडायची. ती ख्रिश्चन आहे या समजुतीने एक हिंदू तरुण तिच्याशी लग्न करून अबूधाबीस गेला, तिथे गेल्यावर तिचे खरे स्वरूप त्याच्या लक्षात आले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. तिने त्यास इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडून सरळ इसिसच्या शिबिरात पोचवले होते. त्यानंतर ती परत भारतात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने एका मुस्लीम इंजिनियर तरुणाला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यासोबत तो तरुण सिरियासही जायला तयार झाला. त्याने सिरियात जाण्यासाठी जेव्हा पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज केला, तेव्हा गुप्तचर विभागाने त्या तरुणावर लक्ष ठेवले. सतत सहा महिने तो तरुण सिरियास जाण्याचा प्रयत्न करीत होता. तेव्हा गुप्तचर विभागाने त्या तरुणाची उलटतपासणी सुरू केली. त्यातून निकोल जोसेफचे खरे स्वरूप पोलिसांच्या लक्षात आले. तोपर्यंत ती अबुधाबीस पोचली होती. भारत व युनायटेड अरब एमिरटेस्चे सरकार यांच्यातील करारानुसार संशयित गुन्हेगारांना तपासासाठी भारताकडे तिला सोपवणे भाग होते. त्यानुसार गुप्तचर संघटनेने मागणी केल्यामुळे अबुधाबीहून तिची भारतात परत पाठवणी करण्यात आली.
तपास संस्थेने तिची पार्श्वभूमी तपासली असता अनेक गोष्टी उघडकीस आल्या. २००८ साली तिने फेसबुकवर ‘इस्लाम विरुद्ध ख्रिश्चन धर्म’ या नावाचा एक ग्रुप निर्माण केला होता. नावावरून हा ग्रुप निष्पाप असल्याचे वाटत होते. पण तपास संस्थेने अधिक तपास करता बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. तिचा भारतातील नवरा ‘देवेंद्रकुमार बात्रा’ हाही हिंदू धर्माचा त्याग करून इस्लाम धर्मात प्रविष्ट झाला होता. त्यालासुद्धा आफ्सा जबीन ही इसिससाठी रिक्रुटिंग एजंट म्हणून काम करीत आहे हे बऱ्याच उशिरा समजले, असे गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. आफ्साने अन्य प्रांतात रिक्रूटिंग एजंट म्हणून नेमलेल्या व्यक्तींचा शोध घेणे गुप्तचर सघंटनेने सुरू केले आहे. या महिलेची संपूर्ण तपासणी झाल्यावरच भारतात इसिस या संस्थेची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत हे समजू शकेल. त्यादृष्टीने गुप्तचर विभागाने जम्मू-काश्मीर, कर्नाटक, आंध्रा या राज्यात काही संशयित इसमांवर नजर ठेवली आहे.
आफ्सा जबीनने हैदराबादच्या इलक्ट्रॉनिक इंजिनिअरला आपल्या जाळ्यात ओढले तेव्हा तिने आपण ख्रिश्चन असून ब्रिटिश नागरिक असल्याची त्याला माहिती दिली होती. त्यामुळे तो तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला होता. याच तऱ्हेने तिने किती तरुणांना आपल्या नादी लावून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते आणि त्यानंतर त्यांचा उपयोग इसिससाठी केला होता, याचा गुप्तचर संस्था शोध घेत आहे.
२६/११ च्या मुंबईतील हल्याच्या पूर्वी मुस्लीम तरुणाने हेडली हे ख्रिश्चन नाव धारण करून भारतातील अनेक जागांचा शोध घेतला होता आणि त्या जागांचे नकाशे व अन्य माहिती पाकिस्तानातील आयएसआय संस्थेला आणि हाफिस सईद या दहशदवाद्यांच्या नेत्यास पुरविली होती, याचे खरे स्वरूप तो अमेरिकेत असताना उघडकीस आले आणि सध्या तो तुरुंगाची हवा खात आहे त्याला अटक केल्यानंतर अमेरिकेच्या सरकारने त्याच्यासंबंधीची विस्तृत माहिती भारताला पुरविली होती. अमेरिकेतही हेडलीने आपण दहशतवादाच्या विरोधात काम करीत आहोत असे भासवले होते. पण तो प्रत्यक्षात पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेसाठी काम करीत होता.
आफ्सा जबीनच्या घटनेपासून आपण बरेच काही शिकण्यासारखे आहे. आमच्या राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही तरुण मुले इस्लाम धर्म स्वीकारीत आहेत ही बाब आपण सहजपणे स्वीकारायला नको. तरुणांना आखाती राष्ट्रात जाऊन भरपूर पगार मिळविण्याची स्वप्ने पडत असतात. त्याचा फायदा घेऊन काही संस्था इस्लामी तरुणींचा वापर लव्ह जिहादसारख्या कल्पनेसाठी करीत असतात आणि हिंदू तरुणांना इस्लामी धर्म स्वीकारण्यास बाध्य करीत असतात. तसेच इस्लामी तरुणांच्या जाळ्यात फसून काही हिंदू तरुणीसुद्धा इस्लामचा स्वीकार करीत असल्याचे उघडकीस आले आहे हे दोन्ही प्रकार देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे हे सर्व करण्यासाठी फेसबुकचा वापर केल्या जात आहे. अशा तऱ्हेच्या अनेक घटना युरोपातील राष्ट्रांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे दिसून आले आहे. इंग्लड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी राष्ट्रात हे प्रकार उघडकीस आले आहेत. एखादी धर्मांतर केलेली व्यक्ती त्या धर्मातील मूळ व्यक्तीपेक्षाही अधिक कट्टर असल्याचे पाहावयास मिळते. तोच प्रकार या राष्ट्रातही पाहावयास मिळत आहे. ख्रिश्चन धर्मातून इस्लाममध्ये अलीकडच्या काळात प्रविष्ट झालेल्या तरुणांनी आपल्या राष्ट्रात जिहादच्या नावाने घातपात घडवून आणले आहेत. इंग्लडमधील अशाच तऱ्हेच्या धर्मांतर केलेल्या एका तरुणाने काही महिन्यांपूर्वी एका ब्रिटिश सोल्जरची हत्त्या करून त्याचे मुंडके धडापासून वेगळे केले होते. त्यावरून या धर्माचे तत्त्वज्ञान एखाद्या व्यक्तीचे रूपांतर हिंस्र श्वापदात कसे करीत असते हे लक्षात येते.