शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

अंतर्युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 12:55 AM

प्राचीन काळापासून मानव युद्धामध्ये गुंतलेला आहे. अशी आशा होती की जस-जसा सभ्यतेचा विकास होईल तसतशा युद्धाच्या घटना कमी होतील व मानव शांततेचे जीवन जगेल. परंतु असे घडले नाही. मानव जसजसा प्रगतिपथावर जाऊ लागला तसतशी त्याची युद्धाबाबतची मानसिकता वाढत गेली. मानवाने युद्धात वापरली जाणारी अत्यंत घातक शस्त्रे व अस्त्रांची निर्मिती केली.

- डॉ भूषण कुमार उपाध्यायप्राचीन काळापासून मानव युद्धामध्ये गुंतलेला आहे. अशी आशा होती की जस-जसा सभ्यतेचा विकास होईल तसतशा युद्धाच्या घटना कमी होतील व मानव शांततेचे जीवन जगेल. परंतु असे घडले नाही. मानव जसजसा प्रगतिपथावर जाऊ लागला तसतशी त्याची युद्धाबाबतची मानसिकता वाढत गेली. मानवाने युद्धात वापरली जाणारी अत्यंत घातक शस्त्रे व अस्त्रांची निर्मिती केली. आज संपूर्ण जग हे या धोक्याचा सामना करीत आहे, जर परमाणु हत्यारांचा वापर झाला तर संपूर्ण जग नष्ट होईल. बाहेरचे युद्ध हे मानवाच्या मनात चालणाऱ्या युद्धाचा प्रतिध्वनी आहे. सर्वात प्रथम हे युद्ध मानवाच्या मनात उत्पन्न होते व नंतर ते भौतिक जगामध्ये प्रकट होते. शेवटी जर बाहेरच्या युद्धाला नियंत्रित करावयाचे असेल तर सर्वप्रथम मनामध्ये चालणाºया युद्धाला नियंत्रित करणे आवश्यक आहे. हेच कारण आहे की भारतीय तत्त्वज्ञांनी बाहेरील युद्ध व हिंसेला मनाच्या वृत्तीचे प्रतिरूप म्हटले आहे. भारतीय योग व अध्यात्मशास्त्रामध्ये मनाच्या या वृत्तीची अतिशय खोलवर चर्चा झालेली आहे. या तत्त्वज्ञांचे असे म्हणणे आहे की मनामध्ये सात्विक वृत्ती असेल तर मानवाची वाणी व त्याचे कर्म सात्विक व चांगले असतात. मनाच्या वृत्तीला कसे शुद्ध बनविले पाहिजे व त्याला कसे नियंत्रित करून रंजनात्मक कार्यामध्ये गुंतविले गेले पाहिजे यासाठी भारत वर्षामध्ये विचारवंतानी एक महत्त्वपूर्ण शास्त्र विकसित केले आहे त्याला योगशास्त्र या नावाने ओळखले जाते. चित्ताच्या वृत्तीचा निरोध व मानवाची चेतना त्या परमचेतनेशी जोडणे हा योगाचा प्रमुख उद्देश आहे. जेव्हा मानवाची चेतना विस्तृत होऊन त्या परमचेतनेशी जोडली जाते, तेव्हा मानवाच्या मनात एकत्वाचा भाव निर्माण होतो. सध्या योगासंदर्भात अनेक वैज्ञानिक प्रयोग झाले आहेत, या प्रयोगातून असे निष्पन्न झाले आहे की शारीरिक व मानसिक स्वास्थ्याबरोबरच मानवाच्या मनात एक वैश्विक भाव निर्माण होतो. जर आपल्याला मानव समाजातील हिंसेला कमी करावयाचे आहे व युद्धाला थांबवायचे आहे तर मानवाच्या मनाचे शुद्धीकरण होणे आवश्यक आहे व त्यासाठी योग हा एक सशक्त उपाय आहे.

टॅग्स :warयुद्धnewsबातम्या