शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा हेतू; स्त्री-पुरुषांना समान अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 3:26 AM

भारतीय दंड सहिता कलम ३७७ नंतर कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. व्यक्तिस्वातंत्र्याला पूर्णपणे महत्त्व सदर दोन्ही निकालात देण्यात आले आहे.

 - अ‍ॅड. परेश देसाई(कुटुंब न्यायालयातील वकील)भारतीय दंड सहिता कलम ३७७ नंतर कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. व्यक्तिस्वातंत्र्याला पूर्णपणे महत्त्व सदर दोन्ही निकालात देण्यात आले आहे. राज्य घटनेत व्यक्तिस्वातंत्र्य हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, तसेच घटनेने स्त्री-पुरुषांना समान अधिकार दिले आहेत.कलम ४९७ नुसार विवाहित महिलेशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषावर खटला चालतो, परंतु संबंधित महिलेवर खटला होत नव्हता़ तिला शिक्षा होत नव्हती़ या कायद्यांतर्गत पतीला पत्नीशी संबंध ठेवणा-या पुरुषाविरोधात खटला चालविण्याचा अधिकार होता़ मात्र, पतीने जर परस्त्रीशी संबंध ठेवले, तर पत्नीला तक्रार करण्याचा अधिकार नव्हता़ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, व्यभिचार कायदा हा मनमानी आहे़ या कायद्याने महिलांचा स्वाभिमान दुखावतो. व्यभिचार कायदा स्त्रीची लैंगिक निवड रोखतो. त्यामुळे तो घटनाबाह्य आहे. विवाहानंतर स्त्रीला तिच्या लैंगिक निवडीपासून रोखले जाऊ शकत नाही.केंद्र सरकारनुसार व्याभिचार गुन्हा आहे़ त्यामुळे कुटुंब व विवाह संस्था उद्ध्वस्त होतात़ कौटुंबिक न्यायालयात विवाहबाह्य संबंधाची कारणे देत घटस्फोटाची प्रकरणे प्रलंबित आहेत. कारण विवाहबाह्य संबंध हे मानसिक छळाचे कारण आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानुसार व्यभिचार गुन्हा नसेल, पण जर स्त्रीने आपल्या पतीच्या व्यभिचारामुळे आत्महत्या केली, तर पुरावे सादर करून पतीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा खटला चालविला जाऊ शकतो. आपल्या देशात प्रत्येक नागरिकाला व्यक्तिस्वातंत्र्य घटनेने दिले आहे व ते अबाधित ठेवण्याचा हेतू सर्वोच्च न्यायालयाचा आहे़ कायदा हा नेहमीच नागरिकांच्या सुरक्षतेसाठी असतो़ व्यक्तीला दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये, ही भावना न्यायव्यवस्थेची असते़पतिपत्नी एकमेकांच्या सहमतीनेच विवाह करतात़ विवाह टिकविण्यासाठी पतिपत्नीमध्ये विश्वास असणे आवश्यक असते़ समाजाच्या दृष्टीने विवाहबाह्य संबंध हा स्वैराचार मानला जातो़ विवाहबाह्य संबंध हे कुटुंब संस्थेला मारक ठरतात़ विवाहानंतर प्रत्येक पुरुष व स्त्रीला हेच अपेक्षित असते की, आपला विवाह भागीदार विश्वासू असावा़ त्याने विश्वासघात करू नये. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वैराचाराला प्रोत्साहन नसून, राज्य घटनेचे अनुच्छेद १४, १५ व २१ चे उल्लंघन टाळण्यासाठी देण्यात आला आहे़ सदर निर्णयानुसार व्यभिचार फौजदारी गुन्हा नसला, तरी त्याचा परिणाम कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित घटस्फोटांच्या प्रकरणांवर होणार नाही़ कारण व्यभिचार हा गुन्हा नसला, तरी नैतिक चूक तर नक्कीच आहे़ नैतिक चूक जर सिद्ध झाली, तर ते घटस्फोटाचे कारण ठरू शकते व दिवाणी कारवाईदेखील होऊ शकते.भारतीय नागरिकांनी न्यायालयाच्या या निर्णयाचा सन्मान करून व्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग करू नये़ वैवाहिक पावित्र्य टिकविण्याचा प्रयत्न करावा़ आपल्या वैवाहिक भागीदारावर पूर्ण निष्ठा ठेवून विवाह संस्था मजबूत करावी व पुढील पिढीला योग्य ते मार्गदर्शन करावे.

टॅग्स :Courtन्यायालय