शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वारसा हक्क आणि नॉमिनेशन: एक चूक तुमच्या कुटुंबासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 13:25 IST

गुंतवणूक केली आहे; पण, 'नॉमिनी'चे नाव द्यायला विसरला आहात ? ही चूक तुमच्या कुटुंबासाठी भविष्यात मोठी डोकेदुखी ठरू शकते. तुमच्या कष्टाच्या कमाईचे संरक्षण करण्याकरिता आणि १.२ लाख कोटींच्या 'बेवारस' निधीमध्ये तुमची गुंतवणूक जमा होऊ नये, यासाठी आजच सावध होणे गरजेचे आहे.

आयुष्यभर कष्ट करून पुंजी जमा करतो, जेणेकरून निवृत्तीनंतर आपल्याला आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळावे. मात्र, केवळ संपत्ती निर्माण करणे पुरेसे नाही; ती संपत्ती योग्य व्यक्तीपर्यंत विनासायास पोहोचणे, हा आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे.

'बेवारस' संपत्तीचे संकट 

ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय वित्तीयसंस्थांकडे ₹ १,२०,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम 'Unclaimed' (कोणीही दावा न केलेली रक्कम) म्हणून पडून आहे. बँका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड आणि शेअर्स कंपन्यांकडे हे हजारो कोटी रुपये पडून आहेत. याचे कारण बऱ्याच प्रकरणांमध्ये नॉमिनीचे नाव नसते किंवा नॉमिनीला त्या गुंतवणुकीबद्दल माहितीच नसते. आरबीआयने अशा रकमा शोधण्यासाठी 'उद्गम' (UDGAM) नावाचे विशेष पोर्टलही सुरू केले आहे. अशी वेळ येऊ नये म्हणून 'नॉमिनेशन' अद्ययावत असणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

गुंतवणुकीची 'मास्टर लिस्ट'

'फॅमिली वेल्थ रेकॉर्ड' किंवा गुंतवणुकीची यादी तयार करणे आवश्यक आहे. यादीमध्ये काय असावे?

बँक तपशील : बँकेचे नाव, खाते क्रमांक आणि कोणाचे नाव नॉमिनी म्हणून आहे.

म्युच्युअल फंड : फोलिओ नंबर आणि गुंतवणुकीचा तपशील.

विमा (Insurance) : पॉलिसी क्रमांक, विम्याची रक्कम आणि कंपनीचे नाव.

इतर मालमत्ता : लॉकर क्रमांक, पीपीएफ, एनएससी आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची जागा.

नॉमिनी 'मालक' की 'विश्वस्त'?

नॉमिनी हा केवळ एक 'विश्वस्त' असतो. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर संस्थांकडून पैसे स्वीकारण्यासाठी तो अधिकृत असतो. मालमत्तेचा खरा मालक हा मृत्युपत्रानुसार किंवा वारसा हक्क कायद्यानुसार ठरलेला वारस असतो. नॉमिनेशनसोबतच 'मृत्युपत्र' असणे हे आर्थिक नियोजनाला पूर्णत्व देते.

अज्ञान बालक नॉमिनी

नातवंडांना किंवा १८ वर्षांखालील मुलांना नॉमिनी करत असाल तर एका 'पालका'ची (गार्डियन) नेमणूक करणे अनिवार्य आहे. जोपर्यंत नॉमिनी सज्ञान होत नाही, तोपर्यंत संबंधित गुंतवणूक या पालकाद्वारे हाताळली जाते.

नॉमिनेशन करताना काय लक्षात घ्याल?

जोडीदाराचे किंवा मुलांचे नाव नॉमिनेशनमध्ये अद्ययावत असल्याची खात्री करा. म्युच्युअल फंडात तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी देऊन प्रत्येकाची टक्केवारी निश्चित करू शकता. तुमच्या बँक स्टेटमेंटवर किंवा म्युच्युअल फंड स्टेटमेंटवर नॉमिनीचे नाव दिसत आहे की नाही, याची खात्री करा. 

बँक बचत खाती आणि मुदत ठेवी, म्युच्युअल फंड फोलिओ, डिमॅट खाती आणि शेअर्स, इन्शुरन्स पॉलिसी आणि पीएफ खाती या ठिकाणी नॉमिनेशन तपासा. आर्थिक सल्लागाराची भूमिका. गुंतवणुकीतील नॉमिनेशन तपासून पाहणे. तुमच्या जुन्या विसरलेल्या गुंतवणुकी आहेत का, हे शोधण्यात मदत करणे. 

नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करून घेणे आणि एक सुटसुटीत 'गुंतवणूक यादी' तयार करणे. तुमची गुंतवणूक ही तुमच्या कुटुंबाचे भविष्य आहे. योग्य नॉमिनेशन करून आणि त्याची माहिती वारसदारांना देऊन तुम्ही तुमच्या कष्टाच्या कमाईचे संरक्षण करता.

तुमच्या पैशांची माहिती कुणाला, कशी द्याल?

सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची एक फाइल बनवा आणि ती घरात कोठे ठेवली आहे, हे तुमच्या नॉमिनीला सांगा.

जर तुम्ही माहिती डिजिटल स्वरूपात साठवत असाल, तर त्याचा पासवर्ड तुमच्या विश्वासातील व्यक्तीला देऊन ठेवा.

वर्षातून किमान एकदा कुटुंबासोबत बसून तुमच्या गुंतवणुकीबद्दल आणि वारसदारांबद्दल सविस्तर चर्चा करा.

-अमोल साळे (अर्थ सामाजिक विषयांचे अभ्यासक) amoalsale@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Inheritance and Nomination: A Mistake Can Trouble Your Family

Web Summary : Update nominations for investments like bank accounts, insurance, and mutual funds. Create a master list and inform family to avoid unclaimed assets. Nominee is a trustee, not owner. Include a will for complete financial planning.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसाBanking Sectorबँकिंग क्षेत्र