शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पंगा भारताशी, ट्रम्प तोंडघशी! अमेरिकेचा अहंकार गळाला; भारत दबावापुढे झुकला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 09:09 IST

'ग्लोबल पोलिसमन' असल्याच्या आविर्भावातून ट्रम्प यांनी भारताबाबतही प्रेशर टॅक्टीस अवलंबल्या. परंतु ते अक्षरशः तोंडावर आपटले. भारताशी पंगा घेऊन ते पूर्णतः फसले. अमेरिकेचा अहंकार गळून पडला. याचे कारण त्यांना याची कल्पनाच राहिलेली नाही की, हा एकविसाव्या शतकातील भारत आहे, तो दबावाला बळी पडणार नाही.

डॉ. शैलेंद्र देवळाणकरपरराष्ट्र धोरण विश्लेषक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा 'विकसित भारत २०४७' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मिशनचा पाया भक्कम करणारा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाला काही तास उलटताच तोच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आकारण्यात येत असलेले २५ टक्के टॅरिफ १८ टक्क्यांवर आणण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच रशियाकडून तेलआयातीबाबत भारतावर लादलेले २५ टक्क्यांचे अतिरिक्त दंडात्मक आयात शुल्कही घटवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतासाठी विशेषतः भारतीय निर्यातदार, उद्योजक, गुंतवणूकदार यांच्यासाठी ट्रम्प यांनी दिलेला हा सुखद धक्का होता. याचे कारण आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत भारतावर अमेरिकेकडून आकारण्यात येणारे प्रस्तावित टॅरिफ हे कमी झाल्याने भारतीय निर्यातदारांना अमेरिकेत मालाची निर्यात करण्यामध्ये अधिक संधी मिळणार आहेत. सद्यस्थितीत अमेरिकेला सर्वाधिक निर्यात करणारा देश असणाऱ्या चीनवर ट्रम्प यांनी ३६ टक्के टॅरिफ आकारणी सुरू केलेली आहे. बांगलादेश व इंडोनेशिया हे दोन्ही देशही अमेरिकेमध्ये वस्तू विकण्याबाबत भारताचे स्पर्धक आहेत. या देशांवरील टॅरिफही १८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर भारताचा शेजारी असणारा पाकिस्तान अमेरिकेच्या गुड बुकमध्ये गेल्याचे दिसत असले तरी त्यांच्यावरील टॅरिफ शुल्कही सध्या १९ टक्के आहे. या सर्व देशांच्या तुलनेत अमेरिकेकडून कमी टॅरिफ आकारणी झाल्यास भारतीय वस्तूंना स्पर्धात्मक पातळीवर निश्चितच चांगली संधी मिळणार आहे.

टॅरिफमधील हा सुखद दिलासा देतानाच ट्रम्प यांनी आणखी एक घोषणा केली आहे. त्यानुसार भारत आता रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवेल आणि व्हेनेझुएलाकडून तेलखरेदी करेल. प्रसंगी अमेरिकेकडूनही भारत तेलाची आयात वाढवू शकतो. येत्या काळात भारत ५०० अब्ज डॉलर्सच्या वस्तू व सेवांची खरेदी अमेरिकेकडून करेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले. 

ट्रम्प यांनी टॅरिफ घटविण्याची घोषणा करणे हा भारताचा विजय

अमेरिकेच्या या निर्णयाला प्रतिसाद देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले प्रतिसादात्मक उत्तर अतिशय चपखल आणि परराष्ट्र धोरणामध्ये शब्दांचा वापर किती अचूकपणाने करावा लागतो, याचे उदाहरण ठरणारे होते. मोदी यांनी असे म्हटले की, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आकारण्यात येणारे आयात शुल्क ५० टक्क्यांवरुन १८ टक्के केले, याचा मला खूप आनंद झाला. यामुळे दोन देशातील संबंध बळकट होतील. तथापि, पंतप्रधानांनी कुठेही या द्विटमध्ये भारत रशियाकडून तेलखरेदी थांबवेल असे म्हटलेले नाही. ५०० अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची अमेरिकेकडून करण्याचाही उल्लेख पंतप्रधान मोदींनी केलेला नाही. या सर्व घोषणा ट्रम्प प्रशासनाकडून एकतर्फी केल्या जात आहेत. कालपरवापर्यंत भारतावर ५०० टक्के 3 टैरिफ आकारले जाऊ शकते, अशी धमकी देणाऱ्या ट्रम्प यांना स्वतः हे टॅरिफ १८ टक्के करत असल्याची घोषणा करावी लागणे, हा भारताचा मोठा विजयच म्हणावा लागेल.

भारताची 'स्ट्रॅटॅजिक सँगॅसिटी'

भारताने एप्रिल २०२५ पासून व्यापार रणनीती सुधारण्यावर भर दिला. याला 'स्ट्रॅटॅजिक सँगॅसिटी' असे म्हटले जाते. अमेरिकन वाढीव टॅरिफमुळे जेम्स अँड ज्वेलरी, ऑटो पार्टस्, लेदर इंडस्ट्रीज, कृषी, फिशरीज, डेअरी उद्योग यामधील सुमारे ३२ अब्ज डॉलरचा व्यापार प्रभावित झाला होता. ही सर्व क्षेत्रे श्रमिकप्रधान आणि एमएसएमईचा अधिक समावेश असणारी असल्याने त्यांना दिलासा देणे गरजेचे होते. भारताने इंग्लंड, युरोपियन महासंघ, ऑस्ट्रेलिया, ओमान, न्यूझीलंड या देशांबरोबर मुक्त व्यापार करारात आघाडी घेतली. युरोपियन महासंघासोबतचा करार हा मदर ऑफ ऑल डील म्हणून ओळखला जातो. याचे कारण युरोपची ५० कोटी श्रीमंत लोकांची बाजारपेठ भारतासाठी खुली झाली. विमा, श्रमसंहिता, अणुकायद्यातील सुधारणा याबरोबरीने पंतप्रधानांनी सातत्याने स्वदेशीचे आवाहन देशातील १४४ कोटी नागरिकांना केले.

अमेरिकेचा अहंकार गळालादबाव टाकणे, सौदेबाजी करणे, अनपेक्षित निर्णय घेऊन समोरच्या व्यक्ती अथवा राष्ट्राला सतत धक्के देत राहणे, अस्थिर ठेवणे आणि या सर्वांतून प्रतिपक्षाकडून जास्तीत जास्त सवलती व नफा पदरात पाडून घेणे ही ट्रम्प यांची कार्यपद्धती आहे.

भारत दबावापुढे झुकला नाहीजपानवर आधी प्रचंड टॅरिफ लावला. नंतर दबाव टाकून जपानसोबत व्यापार करार केला. त्यानंतर इंडोनेशिया, युरोपिययन देशांबाबतही ट्रम्प यांनी हीच नीती अवलंबली. परंतु भारत हा एकमेव देश असा होता जो ट्रम्प यांच्या दबावाला बळी पडला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : India stands firm; Trump reduces tariffs, acknowledging India's strength.

Web Summary : Trump reduced tariffs on India, a win for Indian exporters. India strategically diversified trade, lessening reliance on the US. Despite pressure tactics, India didn't yield, showcasing its economic resilience and strategic acumen, a blow to American arrogance.
टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी