शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

World Trending: उन्हाळ्यात माणसं, कुत्रे, उंदरांचाही जातो ‘तोल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 11:49 IST

World Trending: तुम्हाला कोणता ऋतू आवडतो? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा..? एखादा ऋतू आवडण्याची किंवा न आवडण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील; पण या वातावरणाचा आपल्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या मेंदूवर निश्चतपणे परिणाम होत असतो.

तुम्हाला कोणता ऋतू आवडतो? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा..? एखादा ऋतू आवडण्याची किंवा न आवडण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील; पण या वातावरणाचा आपल्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या मेंदूवर निश्चतपणे परिणाम होत असतो. मग तो मानव असो किंवा पशू, पक्षी, प्राणी. थोडीशी माहिती घेतली किंवा थोडा अभ्यास केला, निरीक्षण केलं तर  लक्षात येईल, वर्षाच्या कोणत्या काळात, विशेषत: कोणत्या ऋतूत आपल्याला अस्वस्थ वाटतं? केव्हा आपली चिडचिड जास्त होते? आपल्याला राग केव्हा जास्त येतो आणि केव्हा आपण जास्त धुसफुसत असतो..?जाऊ द्या, एखाद्या पोलिस स्टेशनला जा, तिथल्या नोंदी तपासा किंवा तुमच्या ओळखीचा एखादा पोलिस अधिकारी असेल, तर त्याला विचारा, वर्षाच्या कोणत्या काळात गुन्ह्यांचं प्रमाण जास्त असतं..?

मुळात आपण कधी या दृष्टीनं विचारच केलेला नसतो. कोणीही म्हणेल, गुन्हा हा गुन्हा असतो. गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस केव्हाही गुन्हा करू शकतो. तो काही ऋतू पाहून गुन्हा करतो का? - पण जगभरातील गुन्हेगारी संदर्भातल्या नोंदी तपासल्या तर लक्षात येईल, विशेषत: उन्हाळ्यात जास्त प्रमाणात गुन्हे घडून येतात. उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हाच्या तलखीनं माणूस आधीच ‘तापलेला’ असतो, त्यात त्याच्या थोडं काही मनाविरुद्ध घडलं की त्याच्या संतापाचा पारा वाढतो आणि त्या अवस्थेत त्याच्या हातून बऱ्याचदा नको तो गुन्हाही घडून जातो. 

जगभरात यासंदर्भात आजवर अनेक अभ्यास झाले आहेत आणि त्या प्रत्येक अभ्यासात हाच निष्कर्ष निघाला आहे, की उन्हाळ्यात हिंसाचारात जास्त प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या काळात कायदा-सुव्यवस्थेकडे जास्त लक्ष द्या, किंबहुना बाहेरचं तापमान फार वाढू देऊ नका म्हणजे लोकांचं आंतरिक तापमानही खवळून उठणार नाही, थोडक्यात पर्यावरणाकडे लक्ष द्या. ग्लोबल वॉर्मिंगमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, असाही त्याचा निष्कर्ष काढता येतो. या दोन्ही गोष्टींत जर वाढ होऊ दिली नाही, तर लोकांचं मानसिक स्वास्थ्य तर नीट राहीलच, शिवाय लोकांची माथीही ‘थंड’ राहतील, भडकणार नाहीत! अमेरिकेत अलीकडच्या काळात यासंदर्भात दोन विस्तृत अभ्यास करण्यात आले. दोन्हींचे निष्कर्ष समान आहेत. त्यातला ताजा अभ्यास सांगतो,

उन्हाळ्याच्या दिवसांत, त्यातही ज्या दिवशी तापमान अधिक असतं, अशा दिवसांत लोक जास्त आक्रमक होतात. त्यांचा आपल्या मेंदूवरचा ताबा निसटतो आणि अशा अवचित क्षणी ‘इच्छा’, ‘मानसिकता’ नसतानाही त्यांच्याकडून गुन्हा घडून जातो. या अभ्यासानुसार अमेरिकेत उन्हाळ्यात गुन्हेगारीचं प्रमाण चार टक्क्यांनी तर सामूहिक हिंसाचारात तब्बल १४ टक्क्यांनी वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. स्पेनमधला अभ्यास आणखी एका वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधतो. स्पेनमध्ये उन्हाळ्यात रस्ते अपघातांमध्ये जवळपास आठ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांतच आपली जास्त चिडचिड का होते? कारण या दिवसांत आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्समध्ये वाढ होते. उन्हाळ्यात जसजसं तापमान वाढत जातं, तसतसं आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल या हार्मोनमध्येही वाढ होत जाते आणि त्यामुळे आपल्या शरीर-मनाचा तोल बिघडतो. उन्हाळ्याचे दिवस वाढले आणि पावसाळा दूर गेला तर त्याचाही विपरीत परिणाम आपल्या मेंदूवर होतो. मेंदूतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. यामुळे काही जण डिप्रेशनमध्ये जातात, काही जण पटकन चिडतात, नेहमीच्या गोष्टींचाही त्यांना ताण यायला लागतो. कामं बिघडायला लागतात. हा बिघडलेला तोलच मग आपल्या हातून गुन्हे घडवून आणतो.

यासंदर्भातलं आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे उन्हाळ्यात तरुण मुलांकडून होणारे गुन्हे जास्त वाढतात. कारण याच काळात त्यांना शाळा-कॉलेजेसला सुटी असते. मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी कमी होतात. ‘समाजात’ मिसळण्याचं प्रमाण तुलनेनं कमी होतं. त्यात शरीराची काहिली करणारं ऊन! यामुळे तरुणांमधली आक्रमकता वाढते. त्यांच्यातल्या ऊर्जेला अयोग्य दिशा मिळते आणि छोट्याशा कारणानंही त्यांची माथी भडकतात. अर्थातच त्यांच्याकडून होणारे गुन्हेही वाढतात..!

६९,५२५ कुत्र्यांचा अभ्यास! या निष्कर्षाला पुष्टी देणारा आणखी एक रंजक अभ्यास अमेरिकेत करण्यात आला. २००९ ते २०१८ या काळात अमेरिकेतील आठ शहरांतील ६९,५२५ कुत्र्यांचा अभ्यास करण्यात आला. त्याशिवाय माकडं आणि उंदरांवरही तापमानाचा काय परिणाम होतो, याचं निरीक्षण करण्यात आलं. कुत्रे, माकडं आणि उंदरांंचंही उन्हाळ्यात ‘डोकं’ फिरतं, हे त्यातून सिद्ध झालं. याच काळात कुत्रे माणसांना जास्त चावतात. हे प्रमाण दिवसाला तीन, तर वाढ तब्बल अकरा टक्के होती!

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीInternationalआंतरराष्ट्रीय