शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इच्छा असेल तर 'बेस्ट' मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 08:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत योजना यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देश हातभार लावत आहे. 

- विनायक पात्रुडकरपंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत योजना यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देश हातभार लावत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. जनजागृती केली जात आहे. दंडात्मक कारवाई केली जात आहे. सर्वच स्तरावर असे विविध प्रयत्न सुरू असताना बेस्ट प्रशासनात बस गाड्यांचे शौचालय करण्यावरून वाद निर्माण झाला आहे.बेस्टच्या सुमारे अकराशे बस भंगारात निघणार आहेत. या गाड्या भंगारात काढण्याऐवजी त्याचे शौचालय करावे व शहरातील विविध भागात या गाड्या उभ्या कराव्यात, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली आहे. हा मुद्दा काही नगरसेवकांनी प्रतिष्ठेचा केला आहे. बेस्ट बस मुंबईची ओळख आहे. जागतिकस्तरावर या गाड्यांची वेगळी ओळख आहे. अशा गाड्यांचे शौचालय करणे योग्य नाही, असे सांगत काही नगरसेवकांनी याला विरोध केला आहे. मुंबईत सर्वच ठिकाणी सावर्जनिक शौचालय नाहीत. मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. किमान त्यांच्यासाठी तरी बस गाड्यांचे शौचालय करा, असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. या म्हणण्याचा विचार व्हायला हवा. बेस्टची ओळख टिकून राहावी याबाबत कोणाचे दुमत असू शकणार नाही. बस भंगारात काढून ही प्रतिष्ठा टिकून राहील, असा दावा करणेदेखील चुकीचे आहे. गेल्यावर्षी ६०० बस भंगारात काढल्या, आता ११०० बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव आहे. भंगारात निघणाऱ्या गाड्यांचा सदुपयोग झाला तर, त्याला कोणाचाच विरोध नसेल. बेस्ट बसचा रंग बदलणे शक्य आहे. रंग बदलून या गाड्यांचा शौचालय म्हणून वापर होऊ शकतो. किंवा अन्य कोणता तरी मार्ग शोधला जाऊ शकतो. मधुमेह रुग्णांसह महिलांना सावर्जनिक शौचालयाची नितांत आवश्यकता असते. पुरुष आडोसा बघून नैसर्गिक विधी उरकू शकतो. तसे महिलांना करता येत नाही. शौचालय कोठे आहे, असे विचारणेही महिलांना जमत नाही. असे असताना शौचालयाला नकार देणे योग्य नाही. काळानुसार बदल घडणे आवश्यक आहे. जनहिताचे बदल तर निश्चितच व्हायला हवे. प्रत्येक वेळी तडजोड करण्याची आवश्यकता नसते. पण मार्ग शोधायला हवा. तंत्रज्ञान ऐवढे पुढे गेले आहे की कोणतीच गोष्ट अशक्य नाही. असे असताना बेस्ट बसचे शौचालय करताना व्यापक जनहिताचा विचार व्हायला हवा. रुग्ण, महिलांना योग्य त्या सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, ही जबाबदारी तरी प्रशासनाने लक्षात ठेवायला हवी.(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत कार्यकारी संपादक आहेत.)

टॅग्स :BESTबेस्ट