- डॉ. दीपक शिकारपूरसन १९६९ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील युनेस्को परिषदेत २२ एप्रिल १९७0 रोजी जागतिक पृथ्वी दिवस स्थापित करण्यात आला. शांती कार्यकर्ते जॉन मॅककोनेल यांनी पृथ्वीच्या सन्मानासाठी ही संकल्पना मांडली होती. पर्यावरणाचे बिघडते तालचक्र पृथ्वीच्या काही विशिष्ट भागापुरते मर्यादित राहणार नसून आज ना उद्या सर्वत्र पसरणार आहे. निसर्गाच्या जीवावर उधळपट्टी करणाऱ्या देशांनाही या बाबीची जाणीव होते आहे आणि तेथेही पर्यावरण जतनाची चळवळ जोर पकडते आहे. इथेच आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला खूप मदत करू शकते.औद्योगिक जगाच्या एकूण वीजवापरापैकी ४२ टक्के वापर आयटी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्राकडून केला जातो. नव्या उत्पादन तंत्रांमुळे संगणक व इतर साधनांच्या (पेरिफेरल्स) किमती झपाट्याने कमी होत आहेत. परंतु ऊर्जेवर करावा लागणारा खर्च वाढतो आहे. कळत नकळत आपणापैकी प्रत्येक जण, या ना त्या प्रकारे, दररोज बरीच ऊर्जा आणि स्रोत वाया घालवत असतो. संगणक क्षेत्रातील पर्यावरण जतनाचे खरे काम सुरू होते पायाभूत गोष्टींपासून; सर्व्हर्स, सॉफ्टवेअर आणि विविध हार्डवेअर्सच्या पातळीपासून. संगणकाकडून खाल्ल्या जाणाºया विजेचा मोठा हिस्सा रंगीत मॉनिटर वापरीत असतो. सध्या विविध कारणांसाठी मोठ्या स्क्रीनचे टीव्ही आणि मॉनिटर्स वापरण्याची प्रथा पडते आहे. अशा वेळी त्यांच्या वीजवापराचा विचार सर्वांनीच करणे आवश्यक आहे.जगभरातील हजारो डेटा सेंटर्समधले लाखो सर्व्हर्स अहोरात्र चालू असतात. ते वीज वापरतात व काम करताना भरपूर उष्णता बाहेर टाकतात. बºयाच सर्व्हर्सना ‘एसी’ उर्फ वातानुकूलन लागते. डेटा सेंटर चालवण्याच्या एकूण खर्चापैकी ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक रक्कम निव्वळ वीजबिलावर खर्च होते असा अंदाज आहे. या सर्व प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जाबचत होऊ शकते. उपलब्ध असलेलेच स्रोत आणि संसाधने वापरून जास्तीत जास्त माहिती कार्यक्षमतेने साठवण्याचे हे आव्हान पेलण्यासाठी डेटाचा सर्वाधिक महत्त्वाचा भाग ‘मिरर्ड डबल डिस्क’वर साठवणे आणि त्याचा बॅकअप उच्च क्षमतेच्या ड्राइव्हवर घेणे यांसारखे उपायदेखील करता येतात. त्यामुळे जागा वाचते (८0 टक्क्यांनी), साठवणूक क्षमता वाढते (३५ ते ८0 टक्क्यांनी), व्यावसायिक कामगिरी सुधारते आणि (ड्राइव्हजची संख्याच कमी झाल्याने) विजेचे बिल निम्मेच येते! ही बाब प्रकर्षाने ध्यानात घ्यायला हवी.
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास अधिक ऊर्जाबचत शक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:39 IST