शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आयडी आणि पासवर्ड हॅक झाला, तर...? तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 06:40 IST

इंटरनेटच्या जमान्यात अनेक कारणांसाठी सोशल मीडिया  किंवा ई - मार्केटिंग पोर्टल्सवर आपल्याला  नाव, पत्ता मोबाईल नंबर असा तपशील नोंदवावा लागतो. त्यामुळे आपला आयडी हॅक होण्याची शक्यता पूर्णतः नाहीशी करता येत नाही.

- दिलीप फडके(ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते)आपला आयडी आणि पासवर्ड हॅक होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो. पण आपला आयडी आणि पासवर्ड किती सुरक्षित आहे हे आपल्याला कसं कळणार ? - एक वाचकइंटरनेटच्या जमान्यात अनेक कारणांसाठी सोशल मीडिया  किंवा ई - मार्केटिंग पोर्टल्सवर आपल्याला  नाव, पत्ता मोबाईल नंबर असा तपशील नोंदवावा लागतो. त्यामुळे आपला आयडी हॅक होण्याची शक्यता पूर्णतः नाहीशी करता येत नाही. मुळातच संशयास्पद साईट्सवर  वैयक्तिक तपशील उघड करणे चुकीचे ठरते.  फेसबुकवरदेखील अकाऊंट लॉक करु शकता. आलेली प्रत्येक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलीच पाहिजे, असे नसते. पासवर्ड  भक्कम ठेवा, तो वरचेवर बदला.  भरवशाचे अँटी व्हायरस वापरा आणि ते वरचेवर अपडेट करत राहा. ज्या साईट्स  संशयास्पद वाटतील त्या सरळ ब्लॉक करा. ग्राहकाला अधिकृत ई - मेलवरूनच आल्यासारखा वाटणारा बनावट ई-मेल पाठवला जातो. त्यातल्या हायपर लिंकवर क्लिक केलं की, खऱ्या अधिकृत इंटरनेट बँकिंग साईटसारखी दिसणारी पण प्रत्यक्षात बनावट  वेबसाईट उघडते. सामान्यत: या ई - मेलमध्ये काही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बक्षीस देण्याची किंवा प्रक्रिया पूर्ण न केल्याबद्दल दंड आकारण्याची सूचना दिलेली असते. ग्राहकाला लॉग-ईन किंवा प्रोफाईल किंवा पासवर्ड तसेच बँक खाते क्रमांक इत्यादी गोपनीय माहिती देण्यास सांगितलं जातं. ग्राहक विश्वासाने ‘सबमिट’ बटणावर क्लिक करतो आणि जाळ्यात अडकतो. इंटरनेट वापरताना नेहमी ॲड्रेस बारमध्ये योग्य यूआरएल टाईप करुन साईटवर लॉग ऑन करावं. आपला अधिकृत आयडी आणि पासवर्ड देण्यापूर्वी, लॉग ईन पेजचे युआरएल (URL) ‘https: //’ यापासून सुरू होत असल्याचं आणि ‘http: //’ नसल्याची खात्री करून घ्या. यातील ‘एस’चा (s) अर्थ पेज ‘सुरक्षित’आहे, असा होतो. या पेजसाठी एन्क्रीप्शनचा वापर केलेला आहे, असं यावरून स्पष्ट होतं. नेहमी, ब्राउझरच्या खाली आणि व्हेरीसाईन प्रमाणपत्राच्या उजवीकडे आणि सर्वांत खाली असलेलं लॉक चिन्ह शोधा. बँक आपल्या खात्याच्या माहितीसाठी कधीही ई-मेलद्वारे संपर्क साधत नाही, हे लक्षात ठेवा.(तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com)

टॅग्स :technologyतंत्रज्ञानconsumerग्राहक