शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेला काळीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 13:03 IST

मिलिंद कुलकर्णीपुरोगामी महाराष्टÑाला काळीमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरुन मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात अद्यापही जातीपातीचे विष, आर्थिक स्थिती, शेतजमीन, विहिरींची मालकी यासंबंधी वर्चस्वाची भावना किती खोलवर ...

मिलिंद कुलकर्णीपुरोगामी महाराष्टÑाला काळीमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरुन मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात अद्यापही जातीपातीचे विष, आर्थिक स्थिती, शेतजमीन, विहिरींची मालकी यासंबंधी वर्चस्वाची भावना किती खोलवर रुजलेली आहे, हे अधोरेखित होते. जग एकविसाव्या शतकात पोहोचले आहे; माहिती-तंत्रज्ञानाने क्रांती केली आहे, असे म्हणत असताना आमच्या मनातून जात, श्रेष्ठ-कनिष्ठतेचे भेद जात नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानणाऱ्या आणि संविधानानुसार चालणाºया या देशात अशा घटनांचे प्रमाण वाढणे सामाजिकदृष्टया निरोगी नसल्याचे लक्षण आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा मूलमंत्र जपून सरकार काम करीत असेल तर त्याचे परिणाम ग्रामीण भागात असे का दिसतात, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. समाजातील शोषित, पीडित, वंचित घटकांना विकासाची समान संधी मिळत असल्याचा दावा शासन आणि प्रशासन करीत असले तरी ग्रामीण महाराष्टÑातील भयावह स्थितीचे दर्शन या घटनेने घडविले आहे. स्पृश्यास्पृश्यतेचा भेद मिटविण्यासाठी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांच्यासारख्या महात्म्यांनी प्रयत्न केले. देशाला समतेचा संदेश देण्यात महाराष्टÑ अग्रभागी असल्याचा अभिमान आम्ही बाळगत असताना अशा घटना ही काळाची चक्र उलटे फिरविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. वाकडीसारख्या छोट्या गावात भयंकर प्रकार घडूनही तीन दिवस त्याची वाच्यता होऊ नये, यावरुन त्याठिकाणी किती दहशतीत पीडित कुटुंब राहत असेल त्याची कल्पना येते. विहिरीत पोहण्यास मज्जाव केल्यानंतरही ते पोहल्याबद्दल जाब विचारताना त्यांना नग्न करुन मारहाण केली जात असताना त्याचा व्हीडिओ बनविणे, त्यात या तरुणांना हीन लेखणारी उद्दाम भाषा वापरणे यावरुन ही प्रवृत्ती किती बेमुर्वतखोर, आढ्यताखोर, वर्चस्ववादी आहे हे ठळकपणे जाणवते. अशा प्रवृत्तींना कठोर शिक्षा व्हायला हवी, तरच अशा प्रकारांना पायबंद बसू शकेल. मंत्री, शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रियांमधून या घटनेविषयी संताप व्यक्त झाला. तो रास्त आहे. पण केवळ तेथे न थांबता अशी हिंमत समाजातील कुठलाही घटक करणार नाही, अशा पध्दतीने गावपातळीवर प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्याची आवश्यकता आहे. रविवारी घटना घडल्यानंतर तेथील पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी या शासकीय घटकांनी तीन दिवस ही घटना दडपून ठेवली, असाच याचा अर्थ आहे. हे कच्चे दुवे हेरुन ते मजबूत करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव