‘तिला’ न्याय कसा मिळेल?
By Admin | Updated: November 15, 2014 00:53 IST2014-11-15T00:53:53+5:302014-11-15T00:53:53+5:30
निहालचंद मेघावाल हे केंद्र सरकारातले राज्यमंत्री तूर्त बेपत्ता असून, त्यांचा ठावठिकाणा सापडत नसल्याचे निवेदन राजस्थान पोलिसांनी जयपूरच्या उच्च न्यायालयात केले आहे.

‘तिला’ न्याय कसा मिळेल?
निहालचंद मेघावाल हे केंद्र सरकारातले राज्यमंत्री तूर्त बेपत्ता असून, त्यांचा ठावठिकाणा सापडत नसल्याचे निवेदन राजस्थान पोलिसांनी जयपूरच्या उच्च न्यायालयात केले आहे. 43 वर्षे वयाच्या या निहालचंदांवर बलात्काराचा आरोप आहे. हरियाणातील सिरसा जिल्ह्याच्या अबू शहर या खेडय़ातून आलेली व राजस्थानातील हनुमानगड येथील इसमाशी विवाह केलेली आता 22 वर्षे वयाची असलेली महिला त्यांच्यावर हा गंभीर आरोप करीत आहे. आपल्या नव:याने व त्याच्या इतर 16 मित्रंनी मिळून आपल्यावर आळीपाळीने अनेक दिवस बलात्कार केला व त्या बलात्कारी पुरुषांत निहालचंद मेघावाल यांचाही समावेश होता असे तिचे म्हणणो आहे. मेघावाल हे हनुमानगड परिसरातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले स्थानिक पुढारी आहेत आणि त्यांच्याकडून राजकीय व अन्य फायदे मिळविण्यासाठी आपल्या नव:याने आपल्याला त्याच्या स्वाधीन केले असे या महिलेचे सांगणो आहे. या तक्रारीत फारसे तथ्य नसल्याचे सांगून राजस्थान पोलिसांनी हा खटला दफ्तरदाखल करण्याची विनंती 2क्12 मध्येच न्यायालयाला केली व न्यायालयाने ती मान्यही केली. मात्र त्या निकालाविरुद्ध या महिलेने आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, तीत कनिष्ठ न्यायालयाने मंत्री महोदयांना दिलेले स्वच्छतेचे प्रमाणपत्र खोटे व निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यावरून 12 जून 2क्14 या दिवशी या प्रकरणाची सुनावणी नव्याने सुरू होऊन त्यात आरोपी म्हणून हजर होण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मेघावालांवर बजावला आहे. हा आदेश बजावण्यासाठी त्यांचा शोध घ्यायला गेलेल्या पोलिसांना मात्र मेघावाल हे अखेर्पयत सापडले नाहीत, ही यातली भानगड आहे. निहालचंद मेघावाल हे राजस्थानातून केंद्रीय मंत्रिमंडळात, अखेरच्या क्षणी घेतले गेलेले एकमेव मंत्री आहेत. त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा मिळून त्यांच्याकडे खते व रसायने हा विभाग सोपविण्यात आला. परवा त्यांचे खाते बदलून त्यांना पंचायत राज हे खाते दिले गेले. या शपथविधीला ते हजर होते आणि तो सोहळा राजस्थानसह सा:या देशाने पाहिलाही आहे. दूरचित्रवाहिन्यांवर राष्ट्रपती व पंतप्रधानांसोबत सा:यांना दिसलेला हा निहालचंद मेघावाल राजस्थानच्या पोलिसांना मात्र दिसला नाही ही यातली खरी गोम आहे. मेघावाल हे मंत्री आहेत आणि त्यांच्यावर पंतप्रधानांचा वरदहस्त आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यावर असलेल्या रागामुळे त्या राज्यातून एकाही इसमाची आपल्या मंत्रिमंडळात आरंभी वर्णी न लावणा:या नरेंद्र मोदींनी मेघावाल यांना ऐन शपथविधीच्या वेळी विशेष विमानाने दिल्लीला बोलावून घेतले होते. मेघावाल मोदींना सापडतात, देशाला पाहता येतात आणि राजस्थानच्या पोलिसांना मात्र सापडत नाहीत यातले गौडबंगाल न समजण्याएवढा राजस्थानी माणूस आणि देश आता अजाण राहिला नाही. पकडायची असली की माणसे नको तिथून हुडकून काढता येतात आणि तसे करणो नको असेल तर पुढय़ातली माणसेदेखील पाहून न पाहिल्यासारखी करता येतात. त्यातून राजस्थान हे ियांवर सर्वाधिक अत्याचार करणारे राज्य आहे. भवरीदेवीचे बलात्कारी लोक ‘ते केवळ सवर्ण म्हणून’ सोडून देण्याचा अपराध करणा:या न्यायालयाचे राज्यही तेच आहे. हरिणो आणि मोर यांना प्रेमाने सांभाळणारे हे राज्य आपल्या ियांबाबत मात्र कमालीचे संवेदनाशून्य व काहीसे क्रूरही आहे. त्यातून या प्रकरणातील अत्याचारित ी साधी व एकाकी आहे. तिचा नवराही तिच्या बाजूने न जाता तिच्यावर बलात्कार करणा:यांच्या बाजूने जाणारा व त्यांच्याकडून हवे ते फायदे लाटणारा आहे. अशा प्रकरणात न्याय होणो हीच मुळात दुरापास्त गोष्ट आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर वसुंधराराजे या महिला नेत्याची निवड झाली आहे. वसुंधराबाईंना त्यांच्या मुलासाठी केंद्रात मंत्रिपद हवे होते आणि ते द्यायला नरेंद्र मोदी राजी नव्हते, हे त्या दोघांतील दुराव्याचे एक कारण आहे. निहालचंद मेघावाल या इसमावर वसुंधराबाई मनातून रुष्ट आहेत. त्याला केंद्रात मंत्रिपद दिल्यामुळे त्यांचा मोदींवरील राग आणखी वाढला आहे. मात्र मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यातील राजकीय तेढीचा कोणताही दुष्परिणाम कोणा दुर्दैवी ीवर होणो इष्ट नव्हे. देशभरच्या वृत्तपत्रंनी मेघावाल हे न्यायालयात हजर राहणो टाळत असल्याच्या बातम्या मोठय़ा प्रमाणावर प्रकाशित केल्यानंतर तरी त्या गृहस्थाला न्यायालयात हजर व्हायला सांगणो हे पंतप्रधानांचे वा त्यांच्या कार्यालयाचे काम होते. तसा दबाव न आल्यामुळेच मेघावाल हा इसम पोलिसांना टाळत आहे हे उघड आहे. त्यामुळेच त्याच्याविषयीचा संशय वाढला आहे.