शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आदिवासींच्या प्रथा-परंपरांचे तुणतुणे किती वर्षे वाजवणार?

By shrimant maney | Updated: September 25, 2021 09:51 IST

हाताला काम, पोटाला पुरेसे अन्न, पोषण, शिक्षण व आरोग्याच्या सोयीसुविधा देण्याच्या जबाबदारीतून अंग काढून घेत सगळा दोष आदिवासींवर का ढकलता?

श्रीमंत माने -सालाबादप्रमाणे राज्य सरकारनेअमरावती जिल्ह्यातील मेळघाट तसेच राज्याच्या इतर आदिवासी भागातील बालकांच्या कुपोषणासाठी आदिवासींच्या प्रथा-परंपरा, त्यांचे राहणीमान, कमी वयातील लग्ने-मातृत्व आणि मांत्रिक-तांत्रिकांचा पगडा अशा रटाळ कारणांचे तुणतुणे पुन्हा उच्च न्यायालयात वाजवले आहे. किमान तीस वर्षांपासून सरकार नावाची व्यवस्था आदिवासी बालकांच्या कुपोषण बळींबाबत पुन्हा पुन्हा बेजबाबदारपणे वागत आहे. आताही या मुद्यावर दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी राज्याच्या महाधिवक्त्यांनी हीच कारणे पुढे केली. हाताला काम, पोटाला पुरेसे अन्न, पोषण, शिक्षण व आरोग्याच्या सोयीसुविधा, दळणवळणाची साधने पुरविण्याच्या जबाबदारीतून अंग काढून घेण्याचा, सगळा दोष आदिवासींवर ढकलण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. मेळघाटात ज्यांना भूमका, भगत म्हणतात, अशा मांत्रिकांवर विसंबून राहण्याची वेळ आदिवासींवर का येते, हा प्रश्न सरकारी यंत्रणेला पडत नाही. दवाखाने कुचकामी असतील, पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर व इतर स्टाफ नसेल, औषधे नसतील, तर तिथे टाचा घासून मरण्यापेक्षा भूमकांच्या पायावर डोके टेकविण्याशिवाय पर्याय नसतो, हे विचारात न घेता दोष आदिवासींनाच दिला जातो. आदिवासींच्या राहणीमानाला दोष देताना शहरी झोपडपट्ट्यांपेक्षा आदिवासींची घरे व पाडे, ढाणे अधिक स्वच्छ असतात, याचा विसर पडतो. मुली वयात येण्याच्या काळात शिक्षणात गुंतल्या तर अल्पवयात लग्ने होणार नाहीत, काही यशस्वी प्रयोगाप्रमाणे त्या हवाई सुंदरी बनतील, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतील, ही साधी बाब शिक्षणाच्या सुविधांबाबत विचारात घेतली जात नाही. आदिवासी मातांना अनेक अपत्ये असतात व त्यामुळे मुले कुपोषित होतात, हे खरे. परंतु, किरकोळ आजारानेही मुले दगावत असतील तर स्वाभाविकच अधिक अपत्यांना जन्म देण्याकडे कल असतो. ग्रामीण भागातही काही दशकांपूर्वी अशीच स्थिती होती. अतिकुपोषित आदिवासी बालकांना त्यांचे मातापिता दवाखान्यात ठेवत नाहीत, यामागची खरी अडचणही कधी समजून घेतली जात नाही. एक मूल दवाखान्यात असले तर घरी इतर मुले व म्हातारीकोतारी माणसे असतात, त्यांचे काय करायचे, शेती व अन्य कामाचे काय, ही चिंता मातापित्यांना असते. म्हणून लवकर घरी जाणे ही त्यांची अगतिकता असते, अंधश्रद्धा नव्हे.आदिवासींच्या संस्कृतीवर आक्षेप घेण्याआधी तर समस्त नागर संस्कृतीने आत्मपरीक्षण करायला पाहिजे. जंगले संपविणाऱ्या, निसर्ग ओरबाडून विध्वंस घडविणाऱ्या तुमच्या-आमच्या नागरी फुटपट्टीने आदिम संस्कृतीचे मोजमाप करणेच चुकीचे आहे. नागरी प्रभावामुळे अलीकडे झालेले बदल वगळले तर आदिवासींमध्ये नावे, आडनावे, नद्या, वस्त्यांची नावेदेखील निसर्गाशी संबंधित आहेत. पूर्वी जंगलावर पूर्णपणे अवलंबून असलेला हा समुदाय आपण गेल्या काही वर्षांत पद्धतशीरपणे जंगलापासून दूर नेला. वनसंपदा, वन्यप्राण्यांच्या रक्षणात त्यांचा सहभाग बंद करीत गेलो आणि अपयश येताच दोष आदिवासींनाच देऊ लागलो. कुपोषण व आदिवासी समुदायाच्या इतरही बहुतेक सगळ्या समस्यांचे मूळ रोजगाराच्या प्रश्नात आहे. रोजगारासाठी स्थलांतर हे आरोग्य व शिक्षणाची परवड होण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. रोपवाटिकांपासून ते जंगलकटाईपर्यंत वनखात्याकडून मिळणारा रोजगार टप्प्याटप्प्याने कमी झाला आहे. वनउपजांवर प्रक्रियांच्या कुटीरउद्योगाच्या इतकी वर्षे नुसत्याच घोषणा झाल्या. प्रत्यक्ष ते उद्योग उभेच राहिले नाहीत. तेंदूपत्ता संकलन व मोहफुले जमा करणे, हाच  सध्या उपलब्ध असलेला थोडाबहुत रोजगार आहे. त्यातही मोहफुलावरील प्रक्रिया म्हणजे दारू बनविण्यावर बंदी असायची. अलीकडेच ती उठविण्यात आली. दिवाळीनंतर रोजगारासाठी बाहेर पडायचे व होळीला परत यायचे, ही पूर्वी पद्धत होती. आता वर्षाचे बाराही महिने रोजगारासाठी जंगलाबाहेर राहावे लागते. मग मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. आरोग्याचे प्रश्न बिकट बनतात. १९९० च्या दशकात कुपोषणाबळींच्या मोठ्या उद्रेकावेळी या प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली होती. उच्च न्यायालयात याचिकांवरील सुनावणीवेळीही हे मुद्दे चर्चिले गेले. असेही म्हणता येईल, की इतक्या वर्षांत आदिवासी चार पावले पुढे गेले. ढिम्म व निबर सरकारी यंत्रणा मात्र अजून जिथल्या तिथेच आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीState Governmentराज्य सरकारMelghatमेळघाट