शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

वृक्षवल्ली आम्हा सोयरे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:41 PM

मिलिंद कुलकर्णी जागतिक पर्यावरण दिन साजरा करीत असताना आम्ही सगळ्यांनी जल, वायू प्रदुषणाची यंदा चर्चा केली. वृक्षारोपण करताना संवर्धनाचा ...

मिलिंद कुलकर्णीजागतिक पर्यावरण दिन साजरा करीत असताना आम्ही सगळ्यांनी जल, वायू प्रदुषणाची यंदा चर्चा केली. वृक्षारोपण करताना संवर्धनाचा संकल्प सोडला. एका वृक्षाभोवती पाच-पंचवीस माणसे उभे राहून छायाचित्रे काढली गेली. सेल्फी काढली गेली. समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमांवर ती प्रसारीत झाली. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सार्वजनिक स्थळे अशा ठिकाणी वृक्षारोपणाचे सोहळे साजरे झाले. आकडेवारी नोंदवली गेली. फोटोंसह ‘वर’पाठविली गेली. आमची इतिकर्तव्यता संपली. प्रामाणिकपणे आपण स्वत:ला विचारुन बघूया, की या १५ दिवसात आपण लावलेल्या रोपाकडे आपण फिरकलो तरी का? किती दिवस आपण त्या रोपाला पाणी घातलं? पाणी घालणं शक्य नसलं तरी त्याला पाणी दिलं जातंय की नाही, हे आम्ही बघितले का? बहुसंख्य मंडळींचं उत्तर हे नाही, असेच येणार.गंमत बघा, हे चित्र आपल्याला सर्वत्र दिसून येईल. कार्यालय, बाजारपेठ याठिकाणी एखाद्या मोठ्या कडूनिंब, वड, पिंपळ या झाडाच्या सावलीखाली बहुसंख्य वाहने लावलेली आढळून येतात. सावलीच्या आकारानुसार वाहने कोंबून लावली जातात. वाहनांच्या काळजीसाठी हे होत नाही, तर आपल्याला चटका बसू नये म्हणून सावलीत वाहने लावली जातात. अशी सावली देणारी झाडे किती आहेत, याचा विचार कधी केला का आम्ही? ज्याने कुणी हे झाड लावले असेल, जगवले असेल त्याचे नावसुध्दा आपल्याला ठाऊक नसेल. पण त्या सावलीचा लाभ आम्ही जन्मसिध्द अधिकार असल्याप्रमाणे घेत आहोत. प्रसंगी भांडत असतो दुसऱ्या वाहनधारकाशी. तुझे झाड आहे का? मालकी तुझी आहे का? अशी विचारणा करीत असतो. पुढच्या पिढ्यांसाठी आम्ही काय वारसा ठेवणार आहोत, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.काहींना पर्यावरणाची खरंच तळमळ, कळकळ असते. प्रयत्नपूर्वक ती झाडे लावतदेखील असतात. त्यासाठी पदरमोड करीत असतात. पण त्यांना असंख्य अडचणी, समस्यांना तोंड द्यावे लागते. सावली आम्हाला हवी असते, पण झाड आपल्या अंगणात नको. दाराशेजारी तर नकोच नको. त्यासाठी कारणांची मोठी जंत्री सादर केली झाले. झाड मोठे झाले की, मुळे आमच्या भिंतीला तडा पाडतील, जमिनीखालची टाकी फोडेल, अंगणातील फरशा उचकवेल, वर्षातून दोनदा पानगळती होईल, तर ती गळलेली पाने आवरण्याचा त्रास होईल, पक्षी येऊन बसतील आणि घाण करतील. एक ना अनेक कारणे सांगितली जातात. त्यात आपल्या प्रशासकीय यंत्रणेच्या कारभाराचा फटकादेखील वृक्षारोपण मोहिमेला बसत असतो. वृक्षारोपण करा, असे आवाहन तर केले जाते पण ते कुठे करायचे? संवर्धनातील अडचणींवर मार्ग कुणी काढायचा. ६ आणि ९ मीटरच्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावली तर गटारी उघड्या असल्याने मुळे जाऊन गटारी तुटतात आणि पाणी शेजारी प्लॉटमध्ये वा रस्त्यावर येते. म्हणून घरमालक आधी झाड लावायला अनुत्सुक असतो, आणि शक्य असेल तेव्हा मोठ्या झाड्यावर कुºहाड चालवितो. झाड मोठे झाडे की, वीज महामंडळांची माणसे फांद्या छाटून दरवर्षी त्याला बोडके करुन टाकतात. चारचाकीसाठी घरासमोर जागा हवी म्हणून झाड छाटले जाते. रस्ता रुंदीकरणात तर हमखास झाडाचा बळी जातो. खुल्या जागांमध्ये वृक्षारोपण होते, झाडे लावली जातात आणि नंतर या जागेत बांधकाम करताना त्याच झाडांवर कुºहाड चालवली जाते. भूमिगत गटारी, वीज आणि दूरध्वनी वाहिनीची व्यवस्था का होऊ शकत नाही, याचा विचार प्रशासकीय यंत्रणेने करायला हवा.समाज आणि प्रशासकीय यंत्रणेद्वारे होणारे वृक्षारोपण आणि नैसर्गिक परागीकरणाने होणारे वृक्षारोपण यात फार काही अंतर असेल असे वाटत नाही. आम्ही दिखावा करतो, निसर्ग नित्यनेमाने त्याचे काम करीत असतो. तरीही आम्ही वृक्षवल्लींना ‘सोयरे’ म्हणत असू तर हा कृतघ्नपणा नाही का? एखाद्यावेळी ती वृक्षहल्ली आमचे ‘सोयरेपण’ नाकारेल, आणि तो दिवस फार दूर नसेल, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव