शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

काँग्रेस सेनानींनी दक्षिण दिग्विजय कसा साधला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 10:02 IST

कर्नाटक ही खरगे यांच्यासाठी अग्निपरीक्षा होती. राष्ट्रीय पातळीवर अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांनी विविध गट एकत्र आणले आणि कठोर निर्णयही घेतले.

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

कर्नाटक विधानसभेचे निकाल यायला सुरूवात झाली आणि सोनिया, राहुल, प्रियांका हे गांधी त्रिकूट टीव्हीकडे डोळे लावून बसले. ८० वर्षे वयाचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या परिश्रमाची सोनिया गांधी यांनी प्रशंसा केली. तब्बल ३६ प्रचारसभा त्यांनी घेतल्या होत्या. १० जनपथ येथून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवायचा झाला तर प्रियांका गांधी यांनी खरगेंच्या रूपाने योग्य अध्यक्ष निवडल्याबद्दल आपल्या आईचे अभिनंदन केले. प्रियांका यांचे बरोबरही होते, कारण खरगे आल्यानंतर दोन राज्ये पक्षाला जिंकता आली. पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतरच्या आठ महिन्यांत एकापाठोपाठ एक असे दोनदा यश मिळाले. खरगे यांनी २६ ऑक्टोबर २०२२ रोजी सूत्रे हाती घेतली आणि हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाला यश मिळाले. ८ डिसेंबर २०२२ रोजी मिळालेले हे यश पक्षाला बराच काळ वाट पाहायला लावल्यानंतर मिळाले होते. त्यानंतर पाचच महिन्यांनी १३ मे २०२३ रोजी खरगे यांनी कर्नाटकमधील मोठे यश गांधी मंडळींना नजर केले. कर्नाटक ही खरगे यांच्यासाठी अग्निपरीक्षा होती. कारण खरगे कर्नाटकातील आहेत. दुसरे म्हणजे २०१९ साली त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.

तो त्यांना खूपच लागला होता. राष्ट्रीय पातळीवर आपले अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांना कर्नाटक ही मोठी संधी होती. विविध गट एकत्र आणण्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले आणि काही कठोर निर्णयही.

कर्नाटकमध्ये दलित आणि मुस्लिमांना एकत्र आणण्यासाठी खरगे उपयुक्त ठरू शकतात, हे भाजप नेतृत्वाच्या थोडे उशिराच लक्षात आले आणि हेच भाजपला झटका देऊन गेले. मागासवर्गीय (पक्षी - सिद्धरामय्या) आणि डी. के. शिवकुमार यांच्या रूपाने वोक्कलिंग भाजपला महागात पडले. देवेगौडा यांचा तीन दशकांपासूनचा बालेकिल्ला भुईसपाट करण्यात डी. के. शिवकुमार यांना यश आले. खरगे यांचा आता दलितांचे नेते म्हणून उदय झाला असून, तेच भाजपसाठी घातक ठरले. गेल्या ३०-३५ वर्षांत पक्षापासून दूर गेलेले दलित लोक खरगे यांच्यामुळे परत जोडले जाऊ शकतात. दुसरीकडे मायावती आणि ओवेसी यांच्यासारख्यांच्या मागे गेलेले मुस्लिम पुन्हा काॅंग्रेसला मतदान करतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात त्या मतदारसंघात काॅंग्रेस उमेदवार भाजपला मात देण्याच्या परिस्थितीत असायला हवा.

मुंबई मनपा निवडणुकीवरून संभ्रमकर्नाटकमधील मानहानीकारक पराभवाचा परिणाम भाजपवर स्पष्टपणे दिसत आहे. कर्नाटक निवडणूक आटोपताच बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर करण्याचे भाजपच्या मनात होते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात आक्रमकरित्या कामाला सुरूवात करा, असे या मंडळींना शाह यांनी सांगितले होते. ठाकरे गटाच्या हातातून महापालिका हिसकावून घेण्यासाठी शाह यांनी त्यांना सात कलमी कार्यक्रमही दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे गटाच्या सत्तेला राज्यात पुढे चाल मिळाली. परंतु, सर्वोच्च न्यायालयातील तसेच इतर आघाड्यांवरची लढाई पुढे चालूच राहणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुंबईला भेट देऊन राज्याला तीन इंजिनांची गरज असल्याचे सांगितले होते. परंतु, कर्नाटकातील निकालांनी या सगळ्या तयारीवर काहीसे पाणी फिरवले आहे. 

जालंधर पोटनिवडणुकीत भाजपची अनामत जप्तभाजपची हार केवळ कर्नाटकात झालेली नाही, पंजाबमध्येही झाली. जालंधर लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराची अनामत जप्त झाली. या लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रामध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकीपेक्षा या पोटनिवडणुकीत भाजपची मतसंख्या चार टक्क्यांनी वाढली हे खरे असले तरी पक्षाचे उमेदवार इक्बालसिंग अटवाल केवळ चौथ्या क्रमांकावर फेकले गेले नाहीत तर त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. अनामत रक्कम वाचवायची असेल तर उमेदवाराला एकूण मतदानाच्या १/६ मते मिळवावी लागतात. भाजप उमेदवाराला ती मिळाली नाहीत. २०२२ साली झालेल्या निवडणुकीत जबरी हार पत्करावी लागल्यानंतर भाजपला पंजाबमध्ये हा दुसरा फटका होता. या भगव्या पक्षाने शेतीविषयक तीन कायद्यांच्या मुद्द्यावरून तीन दशकांपासून साथीदार असलेल्या अकाली दलाशी फारकत घेतली. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना कदाचित भाजप पुन्हा एकदा अकाली दलाला जवळ करेल. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल शांतपणे सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून आहेत. अर्थात त्यांचाही उमेदवार या निवडणुकीत हरला. मात्र, काँग्रेस आणि आपच्यानंतर अकाली दलाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आला, याचे समाधान त्यांना आहे. शिरोमणी अकाली दल आणि भाजप युती पंजाबमधील चित्र बदलू शकते, यात शंका नाही. परंतु, बादल इतक्यात हा जुगार खेळायला इच्छुक नाहीत. ते पुरेसा वेळ घेतील, असे दिसते. काँग्रेस आणि इतर पक्षांतून नेते आयात करण्याचा भाजपचा प्रयोग मात्र या राज्यात सपशेल फसला आहे. 

जल्लोष पुढे ढकललाकर्नाटकातील पराभवाने भाजपचे फारसे काही बिघडणार नाही, असे म्हणणाऱ्या नेत्यांची पक्षात कमी नाही. मात्र, पक्षाचे नेतृत्व भीतीग्रस्त झाले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊन नऊ वर्षे झाली ही गोष्ट साजरी करण्याची योजना आधी आखण्यात आली होती. परंतु, कर्नाटकातील निकाल आल्यानंतर तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक