शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

महामार्गावर रक्षक हवेत तसेच देवदूतही हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:27 IST

भारत सरकारच्या रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहतूक संशोधन शाखेच्या अहवालानुसार भारतीय रस्त्यांवर दररोज रस्ते अपघातात ४१० लोकांचा मृत्यू होत असतो. न्यूज चॅनेल्सच्या नावाखाली नाट्य आणि सिनेमातील दृश्ये बघण्याची सवय लागलेल्या दर्शकांना या अपघातांवर उपाय शोधण्याचा विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही.

- डॉ. एस.एस. मंठा(माजी चेअरमन, एआयसीटीईएडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरू)भारत सरकारच्या रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहतूक संशोधन शाखेच्या अहवालानुसार भारतीय रस्त्यांवर दररोज रस्ते अपघातात ४१० लोकांचा मृत्यू होत असतो. न्यूज चॅनेल्सच्या नावाखाली नाट्य आणि सिनेमातील दृश्ये बघण्याची सवय लागलेल्या दर्शकांना या अपघातांवर उपाय शोधण्याचा विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. त्या अपघातांवर निव्वळ प्रतिक्रिया व्यक्त होत असतात पण त्याबाबत सकारात्मक कृती करण्यासाठी कुणालाच वेळ नसतो.भारतात एकूण १,६५,००० किलोमीटर लांबीचे महामार्ग असून राज्य महामार्गाची लांबीसुद्धा १,८०,०० किमी इतकी आहे. या सर्व महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या २२ कोटी इतकी असून त्यात दरवर्षी २९ लाख वाहनांची भर पडत असते. याचा अर्थ प्रत्येक किलोमीटर अंतरात ८५ वाहने धावत असतात. मोटारकार विकत घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा भारतीय खरेदीदार मोटारीच्या किमतीचा विचार करू लागतो. त्यामुळे टाटा मोटार्स, मारुती सुझुकी, रेनॉल्ड, ह्युंडाई मोटार्स यांच्या कमी किमतीच्या मोटारी मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. त्यांची किंमतही चार ते पाच लाख इतकीच असते.इंग्लंडच्या ग्लोबल एनसीएपी या संस्थेने गुणवत्तापूर्ण मोटारींच्या गुणवत्तेचे परीक्षण करून भारतातील छोट्या मोटारींना झीरो स्टार रेटींग दिले आहे! या मोटारी ताशी ४० मैल या वेगाने धावत राहूनही जिवाला धोका निर्माण करणारे अपघात करू शकतात असे निरीक्षण या संस्थेने नोंदवले आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित असावी यासाठी केलेल्या प्रयत्नांना अद्याप गती मिळालेली नाही. त्या दृष्टीने जे कायदे प्रस्तावित केले आहेत त्यांचे यश त्या कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे. नव्या कायद्यामुळे कारची निर्मिती करणाºया उद्योग समूहांना त्यांनी उत्पादित केलेल्या मोटारींमध्ये एअर बॅग्ज, वेगाची सूचना देणारी यंत्रणा, लॉक तोडणे कठीण करणारी यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मोटारींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.रस्ते अपघातात मरण पावणाºयांमध्ये चालक आणि प्रवासी यांची संख्या जास्त आहे. त्यानंतर पादचाºयांची संख्या आहे. दुचाकी चालविणाºयांचे रस्ता अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या ३४.८ टक्के आहे. (२०१६ ची आकडेवारी). १७.९ टक्के अपघाती मृत्यू ट्रक्समुळे होतात तर ११.२ टक्के मृत्यू हे पादचाºयांच्या चुकांमुळे होतात. बसेसमुळे १०.५ टक्के, आॅटोरिक्षामुळे ६.६ टक्के आणि अन्य मोटारींमुळे ४.७ टक्के मृत्यू होतात. कोणत्याही कारणाने का होईना पण रस्ता अपघातात नागरिकांचा मृत्यू होणे ही चिंतेची बाब असते. शहरातील प्रवासी वाहतूक, मालवाहतूक सुरळीत चालावी म्हणून रस्त्यांची निर्मिती करण्यात येते. अशा स्थितीत वाहतूक सुरक्षेला महत्त्व मिळायला हवे. तसेच रस्ते अपघात कमी कसे होतील याकडे अधिक लक्ष पुरवायला हवे.भविष्यात रस्ते अपघातात मरण पावणाºयांची नोंद घेणेसुद्धा न्यूजचॅनेलकडून टाळले जाऊ शकते. अशा स्थितीत आपण या अपघातातूनही नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकडे लक्ष पुरवायला हवे. नवे उत्पादन तयार करणे किंवा उत्पादनाची नवीन पद्धत विकसित करणे म्हणजेच नवीनता नव्हे. नवीनतेने नव्या बाजारपेठांची निर्मितीही करायला हवी.मी नुकताच गुंटूर ते बेरहामपूर हा ६५० किमी लांब प्रवास रस्तामार्गे केला. हा रस्ता फारच सुंदर आहे. पण संपूर्ण प्रवासात वाटेत खायला पदार्थ आणि प्यायला पाणी काही मला मिळाले नाही. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गोदामांची निर्मिती करण्यात आली आहे. पण खाण्याच्या चांगल्या सोयी जशा दिल्ली अंबाला मार्गावर आढळतात, तशा या रस्त्यावर मला कुठेच पहावयास मिळाल्या नाहीत. तेव्हा प्रत्येक महामार्गावर दर तीन किलोमीटर अंतरावर एखादी टपरी उघडावी. तेथे मोटारीतील बिघाड दुरुस्त करण्याची तसेच अपघातग्रस्तांना प्रथमोपचार करण्याची सोय असावी. याशिवाय चहा, कॉफी अन्य वस्तूसुद्धा तेथे उपलब्ध असाव्यात. त्यामुळे एका टपरीवर किमान पाच जणांना रोजगार मिळू शकेल. भारतातील महामार्गावर यातºहेच्या एक लाख टपºयांची साखळी निर्माण केली जाऊ शकते. या टपºया उभारण्यासाठी जाहिरात कंपन्यांची मदत घ्यावी. कॅडबरी किंवा पतंजली उद्योग ही जबाबदारी उचलू शकतील. एका टपरीचे मासिक उत्पन्न दहा हजार धरले तर एक लाख टपºयांपासून वर्षाला बाराशे कोटी उत्पन्न मिळेल. या टपºया वाहतुकीसाठी दीपगृहाचे काम करतील.जर्मनीच्या आॅटोमोबाईल क्लबने ज्याप्रमाणे अ‍ॅडॅकची निर्मिती केली आहे त्याच धर्तीवर भारतात व्हर्सा (व्हेईकल आॅफ इंडियन रोड सेफ्टी असोसिएशन) ची स्थापना करता येईल. तेथे चोवीस तास अपघातग्रस्तांना मदत मिळू शकेल. त्यासाठी पिवळ्या पोशाखातील मोटार मेकॅनिक्स नेमण्यात येतील. त्यांच्यापाशी तात्काळ घटनास्थळी पोहचता यावे यासाठी पिवळ्या रंगाच्या मोटारी असतील. हे मेकॅनिक एकप्रकारे ‘पिवळे देवदूत’ असतील. त्यांच्यासाठी साध्या मोटार व्हॅन्सचे रूपांतर चालत्याफिरत्या गॅरेजमध्ये करता येईल. व्हर्साचे सदस्यत्व अनिवासी भारतीयांना उपलब्ध केल्यास त्यांना जगात कुठेही मेकॅनिकची सेवा मिळू शकेल. अपघाताचे फोटोकाढल्यास एफआयआर. दाखल करताना त्या फोटोचा उपयोग होऊ शकेल. तो फोटो मोबाईलच्या माध्यमातून जवळच्या पोलीस चौकीला तसेच हॉस्पिटलला पाठविल्यास अपघातग्रस्तांवर वैद्यकीय इलाज करणे सोपे जाईल. त्यामुळे रस्ते अपघातात मृत्यू पावणाºयांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. आधुनिक तंत्रज्ञान जसे जीपीएस बायोमेट्रिक नोंदी इ. चा वापर करून रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित होऊ शकेल. रस्ता वाहतूक सुरक्षेसाठी अशा मॉडेलचा वापर करून अधिक रोजगार निर्मितीबरोबरच अधिक महसूलही मिळवता येईल.ही कल्पना स्टार्टअपला प्रेरणा देणारी ठरेल आणि ती मोठ्या प्रमाणात विकसित झाल्यास ती जुन्या अकार्यक्षम ठरलेल्या यंत्रणेची जागासुद्धा घेऊ शकेल. प्रत्येक दोन चाकी व चार चाकी वाहनांच्या विक्रीच्या वेळी सेसची आकारणी करून त्याचा उपयोग रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात येणाºया व्हर्सासाठी होऊ शकेल. दोन चाकी वाहनांना हा सेस रु.५०० असावा तर चारचाकी वाहनांना, वाहनांच्या स्वरूपानुसार रु. ५००० पर्यंत सेस आकारण्यात यावा. त्यातून किमान रु. १००० कोटी इतका निधी जमा होऊ शकतो. त्यातून सुरुवातीला दर दहा किलोमीटर अंतरावर एक टपरी उभारण्यात यावी. मातीपासून निर्माण होणाºया घड्याचा उपयोग अनेक तºहेने करता येतो, त्याचप्रमाणे या सेसचा उपयोगही रस्ता सुरक्षेच्या विविध पैलूंवर करता येईल. माझी ही कल्पना वाहतूक मंत्र्यांपर्यंत पोचू शकली तर आपल्याला किमान पाच लाख प्रत्यक्ष आणि त्याहून कितीतरी अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करता येतील!

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या