शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

सेलिब्रिटींच्या कौटुंबिक हिंसाचाराचा वाढता प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 14:52 IST

प्रसिद्ध जोडप्यांमधील कौटुंबिक वादविवादात कोण मोठा, कोण छोटा इथपासून, तर प्रेमाची विभागणी, निर्णय कोण घेणार, इथपर्यंत अनेक ताणतणाव असतात.

ठळक मुद्देविवाहसंबंध विस्कळीत झाल्यावर आपल्या प्रसिद्धीचे वलय कलंकित होईल का, त्यांच्या प्रसिद्धीला शोभेल असा जीवनदर्जा ठेवून आयुष्य जगता येईल का, अशा अनेक कृत्रिम चिंतांमुळे वलयांकित व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर होत जातात.

अ‍ॅड. असीम सरोदे

हल्ली सेलिब्रिटी कुटुंबांमध्येही कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढत आहेत. हिंसाचार समजून घेणे खूप गुंतागुंतीचे आहे. कारण चार भिंतींमध्ये होणारी हिंसा केवळ शारीरिकच नाही तर ती इतर अनेक प्रकारे होते. वागणुकीतून होणारा अन्याय केवळ नवरा-बायकोसारख्या अत्यंत घट्ट संबंधातील व्यक्तींनाच लक्षात येतो. सेलिब्रिटी स्टेटस असलेल्या प्रसिद्ध जोडप्यांमधील वादविवादात कोण मोठा, कोण छोटा, कोणी कोणाचे ऐकायचे, इथपासून तर प्रेमाची विभागणी, पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य, कोणाचे कुटुंबावर नियंत्रण राहणार, कोणते अन्नपदार्थ खाल्ले जाणार, निर्णय कोण घेणार, अशा प्रकारे अनेक ताणतणाव असतात. कौटुंबिक हिंसाचारपासून संरक्षण देणारा कायदा भारतात २००५ साली अस्तित्वात आला तरी इथे स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारमुक्त जीवन जगणे प्रत्यक्षात शक्य आहे का, हा प्रश्न नेहमीच निरुत्त्तर करणारा ठरतो. ज्यांच्यावर अन्याय- अत्याचार होतो किंवा ज्यांना हिंसा सहन करावी लागते ते जोपर्यंत अन्यायाविरुद्ध उभे राहत नाहीत तोपर्यंत कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा केवळ ‘मूक अधिकार’ बनून राहतो.

कुणीतरी प्रसिद्ध असणे याचे जसे अनेक फायदे असतात, तसेच त्या प्रसिद्ध व्यक्तींना बऱ्याचदा त्याचा त्रासही सहन करावा लागतो. नवरा-बायको दोघांनाही सामाजिक मान्यता आणि प्रसिद्धीचे वलय असेल अशावेळी  त्यांच्यात झालेला कौटुंबिक कलह आपोआपच सामाजिक- सार्वजनिक चर्चेचा भाग बनतो. कुटुंबांतर्गत होणारी हिंसा घराच्या उंबरठ्याबाहेर सांगितली जाऊ नये व घरातले भांडण घरातच संपवावे, असा पुरुषप्रधान पगडा विशेषतः स्त्रियांच्या खांद्यावर भार म्हणून टाकला आहे. स्त्रियांनीच सहनशीलता बाळगावी, तर अनेक समस्या दूर होतील, असा समज रूढ आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास नष्ट होण्याची प्रक्रिया नेहमी घडते, याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. अशातच नवरा-बायको दोघेही एकाच क्षेत्रात प्रसिद्ध आणि वलयांकित व्यक्ती असतील, तर इतर अनेक शक्ती-स्थाने (पॉवर स्टेशन्स), त्या दोघांमधील अधिक ताकदवान व्यक्तीच्या सोबत उभे राहतात. त्यामुळे सेलिब्रिटी असलेल्या लोकांसंदर्भात शक्तीसंबंध लक्षात घेतल्याशिवाय त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांसंदर्भात चूक-बरोबर असे काही ठरवता येत नाही. 

विवाहसंबंध विस्कळीत झाल्यावर आपल्या प्रसिद्धीचे वलय कलंकित होईल का, त्यांच्या प्रसिद्धीला शोभेल असा जीवनदर्जा ठेवून आयुष्य जगता येईल का, अशा अनेक कृत्रिम चिंतांमुळे वलयांकित व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर होत जातात. कौटुंबिक हिंसाचार सहन न झाल्याने अनेक सेलिब्रिटींच्या आयुष्याची कोंडी करणाऱ्या अनेक घटना याआधी जगात घडल्या आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप ज्यावेळी स्त्रीकडून केला जातो, तेव्हा छळ, अन्याय, भेदभाव, दुर्लक्षितपणा, अशा अनेक गोष्टी सहन करण्याची प्रक्रिया तिने पूर्ण केलेली असते. त्यातून आत्मसन्मानाची जाणीव तिला झाल्यावरच सर्व भीती दूर सारून आपल्या नवऱ्यावर जाहीर आरोप कोणतीही स्त्री करते, हे भारतीय संस्कृतीतील वास्तव आहे. प्रसिद्ध जोडप्यांमधील कौटुंबिक हिंसा जेव्हा चव्हाट्यावर येते तेव्हा एक अनाहूत परिणाम दिसतो की, सामान्य कुटुंबातील अनेक हिंसाचार सहन करणाऱ्या स्त्रिया त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेबाबत बोलण्याची तयारी करतात. हिंसेचा आरोप करणाऱ्यांना ‘जज्ज’ करणे अनेकदा चुकीचे असते. कौटुंबिक हिंसाचारग्रस्त स्त्रीच्या सुरक्षिततेची योजना करणाऱ्यांवर कायदा भर देतो; पण त्याची अंमलबजावणी होत नाही.‘सेलिब्रिटी’ कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये जगात सर्वत्र हे दिसून आले आहे की, काही काळानंतर संबंधित जोडपे एकत्र बसून वाद संपवितात. अनेकदा नुकसानभरपाई घेऊन अन्याय व हिंसा करणाऱ्या पुरुषाला सोडून दिले जाते. ‘लेटिंग मेन ऑफ द हूक’ या व्यावहारिक प्रक्रियेला ‘सेलिब्रिटिंच्या’ कौटुंबिक वादात मान्यता मिळताना दिसते.

माझ्यावर कौटुंबिक हिंसा होतेय असा स्त्रीने केलेला आरोप ‘सेलिब्रिटींच्या’ जीवनातील शांततेचा भंग करणारा व सेलिब्रिटी म्हणून असलेल्या मुखवट्याचा पर्दाफाश असतो. ती ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळेतेय; पण ती ‘व्हिक्टिम’ नाही, असे म्हणण्याचा प्रघात म्हणजे पुन्हा स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराचा खोटाच आरोप करतात, असे सामान्यीकरण करणारे असते. स्त्रियांमधील खूप नगण्य प्रवृत्ती कायद्याचा चुकीचा वापर करीत असतील; पण त्यामुळे सर्व स्त्रियांचे आरोप खोटे व निराधार आहेत, असे म्हणण्यातून आपण समाज म्हणून हिंसा करणाऱ्याला प्रोत्साहन देतो. कायद्याचा वापर नेहमीच जबाबदारीने करावा. कायदा हे ‘बदला’ घेण्याचे साधन नाही. हिंसा थांबून सन्मानाने जगण्यासाठी कायदा आहे. त्याचा वापर विवेकानेच झाला पाहिजे. 

(लेखक संविधान विश्लेषक, कायदेतज्ज्ञ आहेत)

asim.human@gmail.com

 

टॅग्स :Aniket Vishwasraoअनिकेत विश्वासरावbollywoodबॉलिवूडcinemaसिनेमाCrime Newsगुन्हेगारी