शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

विद्यमान की माजी सरकार, ओबीसी आरक्षणाची कत्तल कोणी केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 07:38 IST

देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसींचे सर्व प्रकारचे आरक्षण टिकविले. ३१ जुलै २०१९ रोजी एक अध्यादेश काढून त्यांनी या आरक्षणाला संरक्षण प्रदान केले. या अध्यादेशाला कायद्यात परावर्तित करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारला करायचे होते

ठळक मुद्देदेवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसींचे सर्व प्रकारचे आरक्षण टिकविले. ३१ जुलै २०१९ रोजी एक अध्यादेश काढून त्यांनी या आरक्षणाला संरक्षण प्रदान केले. या अध्यादेशाला कायद्यात परावर्तित करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारला करायचे होते.

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

दि. २५ जून २०२१ रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा. हरी नरके  म्हणतात, २०१० सालच्या निकालातून ओबीसींच्या आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा तयार करायला सांगितला आणि महात्मा फुले समता परिषदेने त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी पुढाकार घेत ओबीसी जनगणना करायला लावली आणि त्यातून २०११ ला ही प्रक्रिया सुरू केली. तीन वर्षे हे काम चालले. स्वत:ला ओबीसी म्हणवून घेणाऱ्या मोदी यांच्या मातृसंस्थेचा आरक्षणाला विरोध असल्याने हा डेटा त्यांनी ७ वर्षे दाबून ठेवला, असेही प्रा. नरके यांनी म्हटले आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांना डोक्यावर उचलून  भाजप नेत्यांना कोणतेही कारण नसताना गुन्हेगारांच्या पिंजऱ्यात उभे करणे हाच त्यांचा उद्देश असावा. एक आरोप वारंवार केला जातो की, ओबीसींची जनगणना न केल्यामुळे हे आरक्षण गेले. पण, असे करून राज्य सरकारमधील नेते स्वत:चीच फसवणूक करून घेत आहेत. वस्तुत: या आरक्षणासाठी जनगणनेची आवश्यकता नाही. के. कृष्णमूर्ती यांनी आपल्या आदेशातील परिच्छेद ४८ मध्ये ‘कन्क्लुजन ३’ मध्ये एम्पिरिकल डाटा हा शब्द वापरला आहे. त्यामुळे मागासवर्ग आयोग गठित करून एम्पिरिकल डाटा सादर करणे, हेच त्यावरील उत्तर आहे. परंतु वारंवार केंद्र सरकारकडे डाटा मागून ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा सुरू करण्यास विलंब केला जात आहे. विरोधाला विरोध करण्याच्या हेतूने काही मंडळी केंद्रावर खापर फोडत आहेत.

देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसींचे सर्व प्रकारचे आरक्षण टिकविले. ३१ जुलै २०१९ रोजी एक अध्यादेश काढून त्यांनी या आरक्षणाला संरक्षण प्रदान केले. या अध्यादेशाला कायद्यात परावर्तित करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारला करायचे होते. पण, त्यांनी ते केले नाही. ५० टक्क्यांच्या खालचे आरक्षण आणि एम्पिरिकल डाटा हे दोन्ही प्रश्न पहिल्यांदा समोर आले, ते २८ नोव्हेंबर २०१९ रोजी. त्यावेळी राज्यात सरकार होते महाविकास आघाडीचे. ४ मार्च २०२१ रोजी हे आरक्षण रद्द झाले. ५ मार्चला देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे हा विषय सभागृहात मांडला. काय करायला पाहिजे, हेही सांगितले. पण, त्यानंतर सुद्धा सरकारने काहीच केले नाही. एकटे फडणवीस नाही, तर महाधिवक्ता, विधि व न्याय खात्याचे अधिकारीसुद्धा एम्पिरिकल डाटा सांगत असताना सरकार आणि मंत्री मात्र जनगणनेचा डाटा असा भ्रामक प्रचार करीत राहिले.  देवेंद्र फडणवीस ५० टक्क्यांच्या खालचे आणि वरचे; दोन्ही आरक्षण टिकवू शकले, तर मग तेच काम या सरकारला का जमले नाही? जानेवारी २०२० पर्यंत या सरकारात केवळ ५ ते ६ मंत्री काम पाहत आणि  नियमित कामकाज दीड वर्ष सुरू झाले नाही, हा अतिटोकाचा बचाव झाला. या काळात देशातील सर्व न्यायालये सुरू होती. राज्य सरकारकडून १५ महिन्यांत सात वेळा फक्त तारखा मागण्याचे काम केले गेले. आठव्यांदा जेव्हा राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात उत्तर दिले, तेव्हा ‘होय, आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जाते आहे’, अशी कबुलीच राज्य सरकारने देऊन टाकली. आता या १५ महिन्यांत राज्यात सरकार पातळीवर स्वार्थाचे सारे व्यवहार सुरळीत सुरू असताना केवळ ओबीसींसाठीचा डाटा गोळा केला जाऊ शकत नाही, यावर कसा विश्वास ठेवावा?

सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १३.१२.२०१९ रोजी न्यायमूर्ती कृष्णमूर्ती यांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना पंधरा महिने राज्यशासन केवळ तारखा मागत होते. दिनांक २ मार्च २०२१ रोजी देखील राज्य शासनाने शपथपत्र सादर करून सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागण्याचे काम केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे ओबीसींचे ५० % वरचेच नाहीतर संपूर्ण राजकीय आरक्षण रद्द केले. ओबीसींचे आरक्षण जाण्यात सरकारी वेळकाढूपणा जबाबदार आहे. तिन्ही सत्ताधारी पक्षांना आणि भाजपला ओबीसींबद्दल आस्था असेल तर त्यांनी केवळ ओबीसींनाच तिकिटे द्यावीत, असे प्रा. नरके सांगतात. या निवडणुकीत जय-पराजयाचा विचार न करता केवळ आणि केवळ ओबीसी उमेदवारांनाच तिकिटे दिली जातील, ही घोषणा करणारा राज्यातील पहिला पक्ष भाजप होता. प्रा. नरके यांचा लेख २५ जूनला प्रकाशित झाला. पण, २३ जूनलाच देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर आज आठवडा लोटला, तरी भाजप वगळता राज्यातील अन्य कुठल्याही पक्षाने तशी घोषणा केलेली नाही. ओबीसींचे खरे रक्षणकर्ते कोण आणि आरक्षणाची कत्तल करणारे कोण, या आपल्या प्रश्नाचे उत्तर यातच सामावले आहे.

devnashik2@gmail.com

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेOBCअन्य मागासवर्गीय जाती