गोविंद नामदेवमराठी चित्रपटात
By Admin | Updated: September 28, 2016 02:01 IST2016-09-28T02:01:31+5:302016-09-28T02:01:31+5:30
सरफरोश, वाँटेड, सत्या यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांत गोविंद नामदेव यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. केवळ चित्रपटातच नव्हे, तर छोट्या पडद्यावरही

गोविंद नामदेवमराठी चित्रपटात
सरफरोश, वाँटेड, सत्या यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांत गोविंद नामदेव यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. केवळ चित्रपटातच नव्हे, तर छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ‘आशीर्वाद’ या त्यांच्या मालिकेला आज अनेक वर्षे झाली असली, तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. गोविंद नामदेव यांनी हिंदी चित्रपट, मालिका, हिंदी रंगभूमी यासारख्या विविध माध्यमांमध्ये काम केले आहे आणि आता पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटात ते झळकणार आहेत. ‘सूर सपाटा’ या मंगेश कंठाळेदिग्दर्शित चित्रपटात ते प्रमुख भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट कबड्डी या खेळावर आधारित आहे. गोविंद नामदेव या चित्रपटासाठी खास मराठीदेखील शिकले असल्याचे कळतेय.