शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गौडगाव मुत्त्या बंदरु.. ..मामांचा माढा दादांचाच !

By सचिन जवळकोटे | Updated: May 24, 2019 08:10 IST

लगाव बत्ती

 

- सचिन जवळकोटे

गेल्या महिन्यात लोकसभेचं मतदान झाल्या-झाल्या सोलापूर अन् माढ्याच्या निकालाचा स्पष्ट अंदाज ‘लोकमत’नं व्यक्त केला होता. आज अखेर तोच खरा ठरला. ‘कपबशी खळखळली.... हात थरथरला,’ हे सोलापुरात शंभर टक्के खरं ठरलं. आंबेडकरांनी जेवढी मतं घेतली, तेवढ्याच फरकानं सुशीलकुमार मागं पडले. ‘मामांच्या माढ्यात दादांचीच दादागिरी,’ हेही भीमा-सीना खो-यात स्पष्ट झालं. माढा, करमाळा अन् सांगोल्याचा लीड तोडायला अकलूजचे ‘दादा’च मदतीला आले. अखेर इथं चालली फलटणच्या रणजितदादांचीच दादागिरी.

साहेब’ का चालले नाहीत ?

सुशीलकुमारांची राजकीय कारकीर्द जेव्हा उदयाला आली होती, तेव्हा ‘सोलापूरचे सुपुत्र’ अशी त्यांची आपुलकीची ओळख सोलापूरकरांमध्ये होती. कालांतरानं वर्षानुवर्षे ‘लाल बत्ती’च्या गाडीत बसल्यामुळं सर्वसामान्यांसोबतचा हक्काचा संवाद हळू-हळू तुटत गेला. दोघांमध्ये काळ्या गाडीची काळी काच अभेद्य भिंत बनून राहिली. यावर खुद्द वाघोलीच्या लक्ष्मणरावांनीही निवडणुकीच्या काळात खोचक टिप्पणी केलेली. असो.... याच गाडीत ते ‘सुपुत्र’चे ‘साहेब’ बनले.

यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासमोरचे दोन्ही प्रमुख उमेदवार तसे सोलापूरकरांसाठी तसे नवे होते. परके होते. त्यांचा अत्यंत खुबीनं असा वापर ‘हात’ वाल्यांना करता आला असता. ‘आपला माणूस’ या इमोशनल प्रचारातून लोकांच्या काळजाला हातही घालता आला असता; मात्र सुशीलकुमारांचे ‘प्रोफेशनल चेले’ही पडले सुटाबुटातले. त्यांनी ‘आपले साहेबऽऽ’ हीच टॅगलाईन वापरली. त्यांच्या साहेबांना त्यांनी ‘केबिन’ मधल्या साहेबांच्याच जागी ठेवलं. ‘सर्वसामान्य सोलापूरकरांचा हक्काचा माणूस’ ही भावनाच त्यांना लोकांमध्ये रुजविता आली नाही. आलेली संधी गमावली; कारण त्यांना सोलापूरकरांची आत्मीयताच नाही समजली.  मतदारांसोबतचा ऋणानुबंध केवळ निवडणुकीपुरताच नसतो. विजयी व्हा अथवा पराभूत... पाच वर्षे नेत्यानं जनतेच्या सुख-दु:खात सहभागी झालंच पाहिजे, ही आपल्या भारतीय लोकशाहीतील साधी सरळसोट अपेक्षा. कदाचित हाच सूचक संदेश यंदाच्या निवडणुकीत सोलापूरकरांनी दिलाय. साडेचार वर्षे परगावी राहून शेवटच्या सहा महिन्यात जनतेशी साधला गेलेला संवाद क्षणभंगूरच ठरतो, हेच इथं सिद्ध झालंय. भलेही सुशीलकुमार प्रचाराच्यावेळी रिक्षात बसले असतील. पहाटे किल्ला परिसरात लोकांसमवेत चालले असतील; परंतु तरीही ते निवडणुकीत चालले नाहीतच.

सुशीलकुमारांनी काय गमावलं.. बाळासाहेबांनी काय कमावलं ?सुशीलकुमारांची ही दुसरी हार. गेल्यावेळी ते मोदी लाटेत पराभूत झाले. यावेळी ते मतविभागणीमुळे खासदारकीपासून ‘वंचित’ ठरले. त्यांची वर्षानुवर्षे हक्काची मतं एका क्षणात ‘कप-बशी’मय झाली. ही अनाकलनीय प्रक्रिया समजून घेण्यात काँग्रेसवाले नेमकं कुठं कमी पडले, याचं आत्मचिंतन करणंही अत्यंत गरजेचं. ‘आंबेडकर आपल्या विरोधात उभे राहिले म्हणजे त्यांनी लोकशाहीचा खूनच केला,’ असं म्हणत उर बडवून थोडीच लोकांची सहानुभूती मिळाली ? थोडीच मतं प्राप्त झाली ? यामुळं उलट गावकुसाबाहेरची आहे ती आपुलकीही लुप्त झाली; मात्र यंदा अजून एक स्पष्ट झालं. विजापूर वेशीचा जुना जिव्हाळा पुन्हा एकदा स्पष्ट झाला. ‘मिमसाब हैदराबादकर’ यांच्या भरगच्च सभेनंतरही ‘बेस का मतदान’ हातालाच दिल खोल के झालं. हेही नसं थोडकं.बाळासाहेबांनी भलेही अकोल्यातून इथं येऊन लोकसभेची निवडणूक लढविली असली तरी त्यांच्या पक्षाचं पुढचं ध्येय म्हणे विधानसभा. यंदा भलेही त्यांना विजय प्राप्त झाला नसला तरी या निमित्तानं प्रत्येक तालुक्यात त्यांची स्वत:ची हक्काची निर्माण झालेली ‘व्होट बँक’ येणार विधानसभेला नक्कीच कामाला. विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या उमेदवारीनंतर धाकट्यापासून थोरल्या राजवाड्यापर्यंत सर्व गटा-तटांचं जे झपाट्यानं ध्रुवीकरण झालं, त्यामुळं झपाट्यानं बदलली सोलापुरातील आगामी राजकारणाची समीकरणंही. चंदनशिवेंसारखी मंडळी विधानसभेच्या उमेदवारीपासून ‘वंचित’ राहणार नाहीत, हेही झालं स्पष्ट.

बिच्चाºया ‘शिंदें’ना बनवलं ‘मामा’माढ्यात ‘संजयमामां’नी खरोखरच जोरदार लढत दिली. मोदींची सभा होऊनही पहिल्या काही फेºयांमध्ये त्यांनी अकलूजकरांपासून साºयांनाच घाम काढायला लावला; मात्र त्यांच्याच पट्ट्यानं त्यांना दिली नाही साथ. पाच-पाच कारखाने असूनही ऊस कडूच ठरला; कारण त्यांचं मीठच म्हणे निघालं अळणी. माढा-करमाळा तालुक्यात अजून किमान वीस-पंचवीसचं लीड अधिक मिळालं असतं तर कदाचित निकाल म्हणे वेगळा लागला असता; परंतु करणार काय? खºया-खुºया शत्रूपेक्षा दोस्तीतल्या दुश्मनांची छुरी नेहमीच धारदार, हे आम्ही पामरानं ‘लगाव बत्ती’ मधून अनेकवेळा सांगितलेलं, पण कोणतीच गोष्ट ‘मामां’नी कधी सिरियसली म्हणे न घेतलेली. ‘बारामतीकरांं’चा अभेद्य बालेकिल्ला असणाºया माढ्यात मामांचा पराभव ‘कमळ’ वाल्यांनी नव्हे तर त्यांच्याच एकेकाळच्या ‘जिगरी’ मित्रांनी केलाय, यात शंकाच नाही. खासदारकी गेली.. आमदारकी गेली.. हाती झेडपीची खुर्ची राहिली, हेही नसे थोडके... परंतु, आता ती तरी राहणार का नाही, शोध घ्यायलाच हवा मामा ! (क्रमश:)

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालmadha-pcमाढाsolapur-pcसोलापूर