- डॉ. विशाल तोरो(अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचे अभ्यासक)
आजपासून ब्राझीलमध्ये बेलेम या शहरात संयुक्त राष्ट्रसंघाची हवामान बदलासंदर्भात शिखर परिषद (Conference & Parties, थोडक्यात COP) आयोजित केली जात आहे. यावर्षी या परिषदेची तिसावी आवृत्ती असल्याने त्याला COP30 म्हणून संबोधले जात आहे. संपूर्ण जगाला भेडसावत असलेली हवामान बदलांच्या परिणामांची समस्या आणि त्यातच त्याला असलेली राजकीय तसेच भौगोलिक पार्श्वभूमी यामुळे COP30 परिषदेत काय साध्य होते, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दरवर्षी COP परिषदेमध्ये जगातील बहुतांश देश एकत्र येतात. हवामानबदल रोखण्यासंदर्भात जागतिक स्तरावरील विविध उपाययोजनांबद्दल येथे चर्चा होते. मागील आढावा घेतला जातो आणि आगामी उपाययोजनांच्या बाबतीत वाटाघाटी होऊन ध्येयनिश्चिती केली जाते. COP30 परिषदेत ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे असे मुख्य मुद्दे चार :
१) हवामान बदलाला आळा घालण्यासाठी सहभागी राष्ट्रांकडून आगामी ५-१० वर्षाच्या काळात हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य निश्चित करणे. २) हवामान बदलांच्या होऊ घातलेल्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी व त्यांच्याविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढविण्यासंदर्भात आराखडा बनवून ध्येयनिश्चिती करणे. ३) हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी व हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी विकसनशील देशांना लागणारा वित्तपुरवठा ४) जीवाश्म इंधन आधारित ऊर्जानिर्मिती ते अक्षय ऊर्जानिर्मिती या संक्रमणाचा आराखडा निश्चित करणे. या सर्व मुद्द्यांच्या अंमलबजावणीमध्ये बरीच आव्हाने आहेत. COP30 परिषदेत यावर कोणते ठोस निर्णय घेतले जातात, त्यावरच या परिषदेचे यश अवलंबून आहे.
सन २०१५ च्या पॅरिस करारानुसार, सहभागी राष्ट्रांनी जगातील सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळातीत तापमानाच्या वर १.०५ सेल्सिअसच्या आत रोखण्यासंदर्भात कटिबद्धता दाखवली आहे. प्रत्येक देश हरितगृह वायूचे उत्सर्जन किती प्रमाणात कमी करण्याचे उद्दिष्ट (म्हणजेच NDC5) ठेवतो, याला COP सारख्या हवामान बदलाच्या परिषदेमध्ये खूप महत्त्व असते.
COP30 साठी फेब्रुवारी २०२५ मध्ये सर्व देशांनी त्यांची NDC उद्दिष्टे प्रस्तुत करणे आवश्यक होते, मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक देशांनी त्यांची उद्दिष्टे अंतिम मुदतीपूर्वी दाखलच केली नाहीत. पॅरिस करारानुसार ठरविलेले १.५ सेल्सिअस तापमानवाढीचे लक्ष्य साध्य करायचे असेल तर २०३० पर्यंत हरितगृह वायूंचे उत्सर्जन सन २०१९ च्या उत्सर्जनाच्या तुलनेत्त ४३ टक्क्यांपर्यंत कमी करणे आवश्यक आहे. पण सध्याच्या देशांनी ठरविलेल्या उद्दिष्टांप्रमाणे सन २०२३ पर्यंत एकत्रितपणे ५.९ टक्केच उत्सर्जन कमी होण्याचा अंदाज आहे.
वातावरणातीत हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्याप्रति बहुतांश देशांची उदासीनता व ते कमी करण्याप्रति महत्त्वाकांक्षेचा अभाव ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. अलीकडील काही परिषदांमध्ये हवामान बदलांच्या परिणामांना कसे सामोरे जायचे व या परिणामांशी कसे जुळवून घ्यायचे, यावर बरीच चर्चा झाली. COP30 प्रत्येक सहभागी देशाने स्वतःचे याबाबतचे उद्दिष्ट सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, ही उद्दिष्टे साध्य करतेवेळी कोणते निर्देशक संदर्भ म्हणून घ्यायचे याबाबत सर्व देशांत एकवाक्यता असणे आवश्यक आहे. विकसनशील देशांना त्यांचे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी व हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासते. यासाठी गेल्यावर्षी बाकू (अजरबैजान) येथे झालेल्या COP29 परिषदेतील ठरावानुसार सन २०३५ पर्यंत विकसित देश विकसनशील देशांना दरवर्षी ३०० अब्ज अमेरिकन डॉलर अर्थसाह्य करतील, असे ठरविण्यात आले. तसेच सर्व देश मिळून हा आकडा १.३ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत असेल. त्याच्या अंमलबजावणीसाठी COP30 मध्ये काय निर्णय होतो, हे महत्त्वाचे आहे.
दोन वर्षांपूर्वी दुबई येथे पार पडलेल्या COP28 परिषदेत सन २०३० पर्यंत जगभरातील अक्षय ऊर्जेची क्षमता सध्याच्या तुलनेत तिपटीने वाढविण्याबाबत एकमत झाले होते. मात्र हे संक्रमण न्याय्य असेल याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून सध्याच्या जीवाश्म इंधन आधारित उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या कामगार व समुदायांवर नकारात्मक परिणाम होणार नाहीत. ही बाब लक्षात घेत COP30 परिषदेमध्ये प्रत्येक सहभागी देशाकडून त्यांच्या ऊर्जानिर्मितीचा प्राधान्यक्रम अंमलबजावणी आराखडा सादर होण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेने या वर्षाच्या सुरुवातीला पॅरिस करारातून माघार घेतल्याने हवामान बदलाप्रति जागतिक पातळीवर प्रयत्नांना आणि या त्याच्या वित्तपुरवठ्याला मोठी खीळ बसली आहे. त्यामुळे COP30 परिषदेत सहभागी इतर देश या मुद्द्याकडे कसे बघतात, हेही महत्त्वाचे!vishal@thecleannetwork.net
Web Summary : COP30 in Brazil confronts climate change with crucial goals: emission reduction, adaptation strategies, finance for developing nations, and a shift to renewable energy. Challenges abound, but success hinges on decisive action and commitment.
Web Summary : ब्राजील में COP30 जलवायु परिवर्तन से निपटने के लिए महत्वपूर्ण लक्ष्यों पर केंद्रित है: उत्सर्जन में कमी, अनुकूलन रणनीतियाँ, विकासशील देशों के लिए वित्त, और नवीकरणीय ऊर्जा में बदलाव। चुनौतियाँ हैं, लेकिन सफलता निर्णायक कार्रवाई पर निर्भर है।