शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

खड्ड्यांचे विघ्न दूर होवो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:20 AM

अंदाजे चार वर्षे झाली असतील, उच्च न्यायालय खड्ड्यांविषयी महापालिका व राज्य शासनाचा कान वारंवार पिरगळत आहे़ एवढ्या वर्षांत एखादा कैदी सुधारला असता किंवा गंभीर आजार बराही झाला असता;

अंदाजे चार वर्षे झाली असतील, उच्च न्यायालय खड्ड्यांविषयी महापालिका व राज्य शासनाचा कान वारंवार पिरगळत आहे़ एवढ्या वर्षांत एखादा कैदी सुधारला असता किंवा गंभीर आजार बराही झाला असता; पण निगरगट्ट राजकारणी, सनदी अधिकारी व कंत्राटदार मात्र वारंवार टीका होऊनही सुधारायचे नाव घेत नाहीत, असे चित्र तूर्तास आहे़ कारण या चार वर्षांत ना खड्डे कमी झालेत, ना खड्ड्याने बळी जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे़ आता न्यायालयाने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यावरून शासनाला फटकारले आहे़ आम्हाला एक महिन्याची मुदत द्या, गणेशोत्सवाआधी महामार्गावरील खड्डे बुजविले जातील, अशी हमी शासनाने न्यायालयात दिली आहे़ त्यामुळे गणेशोत्सवास कोकणात जाणाºया चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल, अशी तूर्त अपेक्षा करायला हवी़ मात्र खड्ड्यांविषयी महापालिका व प्रशासन कधी गंभीर होणार हा संशोधनाचा विषय आहे़ खड्ड्यांमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची प्रतिमा राज्यात व देशात मलिन होते़ मात्र डागाळलेल्या प्रतिमेचे कोणालाच सोयरसुतक दिसत नाही़ भ्रष्ट यंत्रणेची साखळी शेवटपर्यंत पोहोचली असल्याने त्याविषयी कोणालाच काहीही वाटत नाही़ राजकीय पाठबळ हा तर सर्वत्र चर्चेचा विषय आहे़ खड्ड्यांविषयी कंत्राट मिळविण्याचा मुद्दा उच्च न्यायालयात गेला तरी अधिकारी व राजकारण्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारालाच कंत्राट कसे मिळेल, याची पूर्ण व्यवस्था केली जाते़ मग कंत्राटदार दर्जेदार काम करतो का अथवा दर्जेदार साहित्य वापरतो का, हा विषय गौण ठरतो़ ही कार्यप्रणाली आता सुधारायला हवी़ परदेशातील शहरे कशी सुंदर आहेत़ तेथे कचरा प्रश्न कसा हाताळला जातो़ तेथील कार्यपद्धती कशी आहे, याचा अभ्यास करायला अधिकारी व राज्यकर्ते नागरिकांच्या पैशातून विदेशवारी करतात़ त्यातून आतापर्यंत काय निष्पन्न झाले, हेही तपासायला हवे़ खड्ड्यांच्या तक्रारींसाठी महापालिकेने विशेष अ‍ॅप तयार केले आहे़ मात्र या अ‍ॅपवर तक्रारी येण्याचे प्रमाण तसे कमीच आहे़ याचा अर्थ मुंबईकरांनाही जणू खात्री झाली आहे, की तक्रार करूनही खड्डे कायमचे बुजविले जाणार नाहीतच़ खड्डे बुजविण्यासाठी दर्जाहीन साहित्य वापरले गेल्याने रस्ते पुन्हा खराब होणार, याचीही सामान्यांना अगदी सखोल माहिती असते़ अलीकडे खड्ड्यांचा विषय कोणासाठी पैसे कमविण्याचे उत्तम साधन बनला आहे, तर कोणासाठी राजकारण करण्याचा मुद्दा़ यात भरडला जातोय तो सर्वसामान्य मुंबईकऱ या मुंबईकराला न्यायालयावाचून कोणाचाच आधार राहिलेला नाही़ कारण सध्या प्रत्येक परिवर्तन हे न्यायालयाच्या आदेशानेच होते़ न्यायालय खड्ड्यांविषयी गंभीर असल्याने या वर्षीचा गणेशोत्सवाचा प्रवास सुखाचा होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही़ विघ्नहर्ता गणेश या साºया यंत्रणांना सुबुद्धी देवो.

टॅग्स :Mumbaiमुंबई