शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींचा ‘डॉक्टरी’सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:44 IST

डॉक्टरांनी विद्वत्ता आणि गुणवत्तेसोबतच सामाजिक दायित्वाचे पालन केले पाहिजे. यामुळे त्यांना आपल्या कार्याचे संपूर्ण समाधान मिळेल. पॅ्रक्टिस करणा-या कुठल्याही डॉक्टरसाठी नैतिकता ही प्राधान्यक्रमावर असली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

डॉक्टरांनी विद्वत्ता आणि गुणवत्तेसोबतच सामाजिक दायित्वाचे पालन केले पाहिजे. यामुळे त्यांना आपल्या कार्याचे संपूर्ण समाधान मिळेल. पॅ्रक्टिस करणा-या कुठल्याही डॉक्टरसाठी नैतिकता ही प्राधान्यक्रमावर असली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नागपुरात गुरुवारी भारतीय बालरोग परिषदेस प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित असलेल्या समस्त डॉक्टर समुदायासमोर त्यांनी या क्षेत्राशी संबंधित जी विविध मते मांडली ती केवळ त्यांची एकट्याची नसून प्रातिनिधिक स्वरुपाची आहेत. सर्वसामान्य लोकांच्या मनात आज डॉक्टरांबद्दल ज्या भावना निर्माण झाल्या आहेत, डॉक्टर आणि रुग्णांमधील नात्यात अविश्वासाचा जो गंध येऊ लागला आहे त्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी ज्या भावना बोलून दाखविल्या त्याचा डॉक्टरांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. गडकरींची एक शैली आहे. एरवी आपल्या एखाद्या कार्यकर्त्याकडूनही चूक झाली की ते त्याची जाहीर शस्त्रक्रिया करीत असतात. ती सुद्धा अ‍ॅनस्थेशियाशिवाय. विशेष म्हणजे यामुळे कुणी दुखावतही नाही. नेमकी अशीच शस्त्रक्रिया त्यांनी काल डॉक्टरांची केली. देशातील सरकारी रुग्णालयांची दुरवस्था आणि डॉक्टरांच्या तुटवड्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात ऊहापोह केला. त्याचाही विचार आता सर्व पातळीवर झाला पाहिजे. कारण या देशातील वैद्यकीय सेवा आणि शिक्षणाचा ढासळता दर्जा चिंतेचा विषय झाला आहे. देशात निर्माण होणारे डॉक्टर्स, त्यांची उपलब्धता आणि गुणवत्ता यांच्यात अजूनही योग्य ताळमेळ बसलेला नाही. अनेक डॉक्टरांचा दर्जा हा भोंदू डॉक्टरांपेक्षा किंचित वरचा असल्याचे विधान खुद्द एका माजी आरोग्य सचिवानेच केले होते. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या कमतरतेकडे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी लक्ष वेधले आहे. आजमितीस देशातील सुमारे ३९० वैद्यकीय महाविद्यालयांमधून वर्षाला जवळपास ५५ हजार डॉक्टर्स तयार होतात. सध्या आपल्या येथे साडेसात लाख डॉक्टर्स कार्यरत आहेत. म्हणजे १७०० लोकांमागे एक डॉक्टर असे हे प्रमाण आहे. ते अर्थातच कमी आहे. पण केवळ डॉक्टरांची संख्या वाढवूनही भागणार नाही. कारण डॉक्टर उपलब्ध असले तरी ग्रामीण भागात जाऊ इच्छित नाहीत. सरकारी सक्तीचाही आता त्यांच्यावर परिणाम होईनासा झाला आहे. एकूण परिस्थिती बघता शासनानेही आता ढासळत्या आरोग्य सेवेबाबत केवळ डॉक्टरांना जबाबदार न धरता नवनवीन कल्पना, योजना आणि उपाय अमलात आणले पाहिजेत. यासाठी वैद्यकीय शिक्षणात आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. याशिवाय खासगी आणि सरकारी भागिदारीतून डॉक्टरांची गुणवत्ता कशी वाढेल या दिशेनहीे प्रयत्न करावे लागतील.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीPoliticsराजकारणIndiaभारत