शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

गृहपाठाअभावी फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:21 IST

‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणून असे चित्र जाणे भाजपाच्या प्रतिमेच्यादृष्टीने हानीकारक

मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिका निवडणुकीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणून भाजपाने भीमपराक्रम केला. प्रस्थापितांविरुध्द सुप्त लाट असल्याने ७५ पैकी ५७ जागा भाजपाला मिळाल्या. खासदार, आमदार आणि महापौर अशी तिन्ही महत्त्वाची पदे भाजपाकडे असल्याने मोठा दबदबा निर्माण झाला. त्यातच जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांना महापौरपद दिल्याने आता जळगावच्या विकासाची गाडी सुसाट धावेल, असा विश्वास नागरिकांना आहे. परंतु घवघवीत यश, अनुभवी नगरसेवक, प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या नेत्यांचे मार्गदर्शन अशा प्रबळ बाजू असतानाही महापालिकेच्या पहिल्या महासभेत भाजपाची फजिती झाली. सत्ताधारी भाजपामधील नगरसेवकांमध्येच भूसंपादन, गाळेप्रश्न अशा विषयांवरील मतभिन्नता, ठोस भूमिकेचा अभाव असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आमदार सुरेश भोळे, माजी सभापती कैलास सोनवणे यांना सभागृहाकडे धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणावी लागली. ‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणून असे चित्र जाणे भाजपाच्या प्रतिमेच्यादृष्टीने हानीकारक आहे.भगत बालाणी यांच्यासारखा अनुभवी नगरसेवक हा गटनेता, डॉ.अश्विन सोनवणे यांच्यासारखा तरुण तडफदार आणि कामाचा प्रचंड आवाका असलेले उपमहापौर, मावळते महापौर ललित कोल्हे यांच्याकडे असलेले सभागृह नेतेपद अशी वजनदार आणि परिपक्व नगरसेवकांची फळी भाजपाकडे असताना पहिल्याच महासभेत हे घडले, याचा अर्थ पक्षात विचारमंथन करणारी फळी अद्याप तयार झालेली नाही.निवडणुकीच्या विजयानंतर आमदारांनी ‘थिंक टँक’ बनविणार असल्याचे जाहीर केले होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा या समितीत समावेश करुन त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ जळगाव शहराच्या विकासासाठी केला जाणार असल्याचा त्यांचा मानस आहे. परंतु महिना उलटला तरी अद्याप ही समिती अस्तित्वात आली नाही. परिणामी १६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन पहिल्या महासभेत मंजुरीसाठी येणे अपेक्षित असताना सत्ताधारी आणि विरोधकांचे हित जपणारा भूसंपादनाचा विषय पटलावर आला, याचा संदेश योग्य गेलेला नाही. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुकाच जर सध्याची मंडळी करीत असेल तर मग यांच्यात आणि त्यांच्यात फरक काय असे नागरिकांना वाटू शकते. भाजपाच्या धुरिणांनी ही काळजी घेणे अपेक्षित आहे. स्विकृत सदस्यांची निवड होणे बाकी आहे. त्यात समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना समाविष्ट करुन भाजपा महापालिकेतील फळी मजबूत करु शकते. भाजपा असे करते काय, की राजकारणाचा भाग म्हणून पुन्हा राजकीय मंडळींचे पुनर्वसन यानिमित्ताने करते, यावर भाजपाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव