शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

ही मौजमजा परवडणारी आहे?

By admin | Updated: January 3, 2016 22:51 IST

बावीस नोव्हेंबर रोजी रविवार होता. त्यानंतर दोन दिवस सरकारी कामकाज झाले. नंतर बुधवारी २५ ला गुरू नानक जयंतीची सुटी. त्याला जोडून दोन रजा टाकणाऱ्यांना सलग चार दिवस मजा करता आली

बावीस नोव्हेंबर रोजी रविवार होता. त्यानंतर दोन दिवस सरकारी कामकाज झाले. नंतर बुधवारी २५ ला गुरू नानक जयंतीची सुटी. त्याला जोडून दोन रजा टाकणाऱ्यांना सलग चार दिवस मजा करता आली. त्यात नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा वाया गेला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चार दिवस काम झाले व सालाबादप्रमाणे सरकार पाच डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशनासाठी रवाना झाले. २३ पर्यंत सरकार तिकडेच. त्यानंतर २४ ते २७ मोठा वीकेंड आला. सगळे ‘थर्टीफर्स्ट’च्या तयारीला लागले. शेवटचा आठवडाही वाया गेला. ४ तारखेपासून सरकार पूर्वपदावर येईल असे मंत्री, अधिकारीच येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत होते. या काळात मंत्रालयात फेरफटका मारला तर दिवाळीसारखी अवस्था होती. थोडक्यात काय तर गेल्या ४५ दिवसांपासून मंत्रालय जवळपास बंद झाल्यात जमा आहे. हे याच वर्षी होते आहे असे नाही. गेल्या अनेक वर्षांची ही परंपराच बनली आहे. नागपूर अधिवेशन डिसेंबरात होते. त्याआधीचा एक आठवडा आणि अधिवेशन संपल्यानंतर ३१ डिसेंबरची पार्टी होऊन सगळे पूर्ववत कामावर येण्यासाठी वर्षातले ३० ते ३५ दिवस दरवर्षी वाया जातात. ही चैन, ही मौज महाराष्ट्राला परवडणारी आहे का, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनात शोधायचे आहे. अधिवेशनातून काही हाती लागले का? तर त्यावर सांगण्यासारखे विरोधकांकडे फार काही नाही व सरकार केलेल्या घोषणांची यादी देण्यात मग्न आहे. दुसरीकडे राज्याच्या डोक्यावर साडेतीन लाख कोटींचे कर्ज आहे. अर्धे राज्य दुष्काळाच्या खाईत आहे. येणाऱ्या दोन महिन्यातच पाण्यासाठी मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हाणामाऱ्या होतील अशी स्फोटक परिस्थिती आहे. मराठवाड्यातल्या अनेक गावांमध्ये आजच टोकाचा असंतोष आहे. पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही, कोणाकडे आश्वासकपणे पाहावे असा दिलासा देणारा चेहरा दिसत नाही, विश्वासाने कोणाच्या खांद्यावर मान टाकून गुदमरलेलं मन मोकळं करावं असा खांदाही मिळेनासा झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांंची संख्या तीन हजारांचा आकडा पार करून गेली आहे. अशी विदारक स्थिती असताना स्वत:स कल्याणकारी राज्य म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राला ही ३० ते ३५ दिवसांची चैन परवडणारी आहे? या काळात ज्यांचे कोणाचे राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात काम पडले असेल त्याला ‘आता अधिवेशन आहे, संपल्यानंतर या’ असे उत्तर ऐकायला मिळाले असेल. ज्याचा अधिवेशनाची काडीचाही संबंध नाही असा शिपाईदेखील हल्ली साहेब, अधिवेशन आहे, नंतर या, साहेब बिझी आहेत... असे साहेबांच्या परस्परच सांगून मोकळा होतानाचे चित्र अनेक कार्यालयांमधून पाहावयास मिळेल.त्यातच गेल्या वर्षभरात सरकारने मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा नवा पायंडा पाडला आहे. त्यामुळे अनेक मंत्री सोमवारी सायंकाळपर्यंत किंवा मंगळवारी सकाळी मुंबईत येतात. मंगळवार-बुधवार मुंबईत. गेला बाजार काहीजण गुरुवारीही थांबतात आणि आपल्या मतदारसंघात निघून जातात. याचा अर्थ सोमवार, शुक्रवार, शनिवार मंत्रालय शांत शांतच असते. दर आठवड्याचे असे तीन दिवस, दिवाळीचे पंधरा-वीस दिवस आणि उत्सवप्रिय महाराष्ट्रात येणारे सण वार आणि त्यासाठीच्या सुट्या यांचा हिशोब यात कोठेही नाही.जाता जाता : सरकारने गरिबांसाठी १० लाख घरे बांधण्याचा संकल्प सोडला, त्याला वर्ष झाले. एकही घर बांधून झालेले नाही. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या सहाव्या मजल्यावरील केबिनची आणि कार्यालयाची मात्र मोठ्या प्रमाणावर डागडुजी चालू आहे. सगळा कारभार पारदर्शक करण्यासाठी म्हणून काचेच्या केबिन केल्या जात आहेत. या कामासाठी आणखी किमान दहा बारा दिवस लागणार आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यालय सध्या तरी जिथे जागा मिळेल तेथून चालू आहे... - अतुल कुलकर्णी