शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

श्रद्धेचं पोषणच चुकीचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:24 AM

साक्षरतेमुळे अंधश्रद्धा दूर व्हावी, असा सर्वसाधारण समज असतो. मात्र अलीकडेच पुण्यासारख्या शहरात रुग्ण महिलेवरील उपचारासाठी डॉक्टरनेच मांत्रिकाला पाचारण केल्याची घटना उघडकीस आली आणि या समजाला धक्काच बसला. उच्च शिक्षितांमधील अंधश्रद्धेमागील कारणांचा घेतलेला वेध.

- श्याम मानव

साक्षरतेमुळे अंधश्रद्धा दूर व्हावी, असा सर्वसाधारण समज असतो. मात्र अलीकडेच पुण्यासारख्या शहरात रुग्ण महिलेवरील उपचारासाठी डॉक्टरनेच मांत्रिकाला पाचारण केल्याची घटना उघडकीस आली आणि या समजाला धक्काच बसला. उच्च शिक्षितांमधील अंधश्रद्धेमागीलकारणांचा घेतलेला वेध.पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात डॉ. सतीश चव्हाण यांनी मांत्रिक पुजाऱ्याच्या वतीने मंत्रादी उपचार करवले. तरी संध्या सोनवणे या रुग्णाचा मृत्यू झाला... पिंपरी-चिंचवडमधील महापालिकेच्या सभागृहाच्या बांधकामप्रसंगी भुताचा वावर आढळल्याने उत्तर प्रदेशमधून एका मांत्रिकाला बोलावून भुते बांधण्यासाठी - घालवण्यासाठी मंत्रादी उपचार करण्यात आले. अशा दोन्ही बातम्या थडकल्यावर विद्येचे, सुशिक्षितांचे माहेरघर म्हणवणाºया पुण्यात असे घडूच कसे शकते, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.संध्या सोनवणे या महिलेची नियोजित शस्त्रक्रिया योग्य मुहूर्त साधण्यासाठी काही तास पुढे ढकलण्यात आली. परिणामत: शस्त्रक्रियेला उशीर झाल्यामुळेही रुग्णाची स्थिती गंभीर झाल्याचे व शेवटी मृत्यू ओढवल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.पहिल्या केसमध्ये - शस्त्रक्रिया करणाºया डॉक्टरांनी मुहूर्तासारख्या अत्यंत अशास्त्रीय-अवैद्यकीय बाबीवर विश्वास ठेवला आणि मौल्यवान वेळ वाया घालवला. जीव धोक्यात असणाºया रुग्णाला, आता डॉक्टर वा वैद्यकशास्त्र वाचवू शकत नाही अशा वेळी मंत्रादी उपचार वाचवू शकतील, या श्रद्धेपोटी अतिदक्षता विभागात मांत्रिक पुजारी आणला, यातून मुहूर्त आणि मंत्रादी सामर्थ्यावर दृढ विश्वास दिसून येतो.वैद्यकशास्त्राच्या शिक्षणात मुहूर्त, मंत्रतंत्रादी उपचारांना मुळीच थारा नाही. तरी डॉ. सतीश चव्हाणांसारखे अनेक डॉक्टर अशा गोष्टींवर का विश्वास ठेवतात? अनेक उच्चशिक्षित अशा अंधश्रद्धा का बाळगतात?आपल्यावर लहानपणापासून होणारे संस्कार व हे संस्कार तसेच कायम ठेवणारी आपली अवैज्ञानिक शिक्षणपद्धती याला जबाबदार आहे. मी गेल्या ३५ वर्षांपासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून काम करताना अनुभवतो आहे की शिक्षण अंधश्रद्धा कमी करण्याचे काम करत नाही. उलट अंधश्रद्धांना अवैज्ञानिक तार्किक बळकटी देण्याचेच काम करते. अडाणी माणसांच्या अंधश्रद्धा त्यांच्या पॉश कपड्यांसारख्याच पॉश आणि सुगंध छिडकलेल्या असतात.डॉक्टरांना असल्या आजारातले काही कळत नाही, ते ‘बाहेरचे’ आहे, डॉक्टरीच्या पलीकडचे आहे. यासाठी जाणता-मांत्रिकच पाहिजे, अशी समजूत सर्वसामान्य अडाणी अल्पशिक्षित माणसाची असते. त्यामुळे अनेक आजारांबाबत आजही डॉक्टरकडे न जाता मंत्रतंत्रादी उपचार केले जातात. त्यात अनेकदा माणसांचा बळी जातो. याच संस्कारातून पिंपरी-चिंचवडमध्ये, या जगात मुळात नसलेले भूत पळवण्यासाठी उत्तर प्रदेशातून मांत्रिक बोलावला जातो आणि त्यात इंजिनीअरही सहभागी होतात.‘विज्ञान खरे आहे. पण विज्ञानाच्या पलीकडे विज्ञानाला न कळणारे असे एक आधिभौतिक जग आहे. विज्ञान संपते तेथून अध्यात्म, आधिभौतिक जग सुरू होते, असा संस्कार बाळगणारे उच्चविद्याविभूषित डॉ. सतीश चव्हाणांसारखे वागतात. वैद्यकीय ज्ञानाचा घोर अपमान करतात.हे दोन्ही प्रकारचे संस्कार चुकीचे आहेत, अवैज्ञानिक आहेत. बाहेरचे काही नसते आणि विज्ञानाचे नियम न लागू होणारे आधिभौतिक जग, अध्यात्मही या जगात अस्तिवात नाही, हे आज वारंवार सिद्ध झालेले सत्य आपण स्वीकारल्याशिवाय यात बदल होणे शक्य नाही. विज्ञान शिक्षण घेऊनही माणूस अंधश्रद्ध राहतो. कारण त्याला विज्ञानाचे सत्य मिळवून देणारी वैज्ञानिक प्रक्रिया कशी वापरायची ते शिकवले जात नाही. शिकवली तरी सृष्टीच्या, विश्वाच्या, माणसाच्या साºयाच ज्ञानासंदर्भात वैज्ञानिक प्रक्रिया वापरली पाहिजे. सत्य शोधण्याचे, सत्य स्वीकारण्याचे हे एकमात्र हत्यार आहे हे शिकवले जात नाही, मनात-बुद्धीत रुजवले जात नाही. हे शिकले पाहिजे. यालाच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, विवेकवाद रुजवणे असे म्हटले जाते.‘मंत्राने साधा भाजलेला पापडही मोडला जात नाही. कुणी मोडून दाखवला तर २५ लाख रुपयांचे पारितोषिक देऊ,’ असे ३५ वर्षांपासून महाराष्ट्रात, अनेक प्रांतात सांगत फिरतो आहे. एकालाही हे आव्हान जिंकता आले नाही.महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदा मंजूर करून २०१३ पासून लागू केला. कायद्यासोबत प्रचार-प्रसाराची गरज आहे हे लक्षात घेऊन शासनाने जादूटोणाविरोधी कायदा प्रचार-प्रसार अंमलबजावणी समिती गठित केली. सरकारने मंजूर केल्यानुसार आम्ही महाराष्ट्रात जोरदार प्रचार-प्रसार मोहीम राबवली. कायदा समजावून सांगतानाच वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावीपणे रुजवता येतो हे सप्रमाण सिद्ध केले. ३५ जिल्हा जाहीर सभा, प्रशिक्षित २०० वक्ते, ४०० शाळा-कॉलेजातील कार्यक्रम, पोलीस अधिकारी प्रशिक्षण असा धडाका लावला. यातील निम्मे कार्यक्रम नव्या सरकारच्या काळात झाले. पण नव्या सरकारने प्रबोधनाची ही सारी प्रक्रिया शीतगृहात टाकली.अशा घटना महाराष्टÑात घडू नयेत असे वाटत असेल तर प्रबोधन करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा एकमेव मार्ग आहे.आमच्या दोन अंधश्रद्धा निर्मूलन समिती शक्य असेल तेवढे कार्य करतच आहेत. पण जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रसार-प्रचार करण्याचे आपले घटनादत्त कर्तव्य राज्य सरकारने करायचे ठरवल्यास पुढच्या काही वर्षांत अख्ख्या महाराष्ट्राचे चित्र बदलू शकते. वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, नागरिकांमध्ये रुजू शकतो. हजारोंचे बळी जाणे वाचू शकते. या पद्धतीचा प्रकल्प आधीच सादर केला आहे, राज्य सरकारकडे पडून आहे. डॉ. सतीश चव्हाणांना ‘जादूटोणाविरोधी कायदा’ लागू होत नाही. फक्त दक्षता विभागात उपचार करणा-या मांत्रिक-पुजाºयाला औषधीद्रव्ये व जादूटोण्याचे उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम १९५४ (केंद्राचा कायदा) लागू होतो.

(लेखक जादूटोणाविरोधी कायदा प्रचार-प्रसार अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-संघटक आहेत.) 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणे