शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आता पिनकोड विसरा; तुमच्या पत्त्यात येणार ‘डिजिपिन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:47 IST

India Post: पारंपरिक पिनकोडच्या तुलनेत अचूक आणि कार्यक्षम नवीन डिजिपिन प्रणाली पत्त्यांचे व्यवस्थापन सुलभ करेल, तसेच ग्रामीण, दुर्गम भागांमध्ये उपयुक्त ठरेल.

- दीपक शिकारपूर(माहिती तंत्रज्ञान अभ्यासक) 

पिनकोड (Postal Index Number) हा भारतातील डाक सेवा प्रणालीतील एक महत्त्वाचा घटक. प्रत्येक पिनकोड हा सहा अंकी असतो आणि तो विशिष्ट भौगोलिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतो. पिनकोडचा मुख्य उद्देश म्हणजे टपालाचे अचूक आणि वेळेवर वितरण सुनिश्चित करणे. एकाच नावाची गावे, रस्ते देशात अनेक ठिकाणी असल्याने नुसता पत्ता नेमके स्थळदर्शन करू शकत नाही. पिनकोड डाक विभागाला टपालाचे अचूक वर्गीकरण आणि वितरण करण्यात मदत करतो. यामुळे पत्र वेळेवर योग्य पत्त्यावर पोहोचते.

पिनकोडचा वापर मतदार नोंदणी, जनगणना, आणि कल्याणकारी योजनांच्या वितरणातही केला जातो. यामुळे सरकारी सेवा योग्य टिकाणी वेळेवर  पोहोचतात. श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी तयार केलेली ही पिनकोड प्रणाली १५ ऑगस्ट  १९७२ रोजी भारतात सुरू झाली. सहा अंकातला पहिला अंक विशिष्ट क्षेत्र दर्शवतो, दुसरा उपक्षेत्र, तिसरा अंक जिल्हा सांगतो आणि अखेरचे तीन अंक प्रत्यक्ष वितरण कार्यालयासाठी असतात.

आता भारतीय डाक विभागाने पारंपरिक पिनकोड प्रणालीला पर्याय म्हणून ‘डिजिपिन’ (DIGIPIN) ही  नवीन डिजिटल पत्ता प्रणाली सादर केली आहे. ही प्रणाली देशभरातील प्रत्येक ४ मीटर x ४ मीटर क्षेत्राचे १० अंकी अल्फान्युमेरिक कोडद्वारे अचूकपणे प्रतिनिधित्व करेल. हा कोड त्या विशिष्ट स्थानाच्या अक्षांश  आणि रेखांश यांच्या आधारे तयार केला जातो. या प्रणालीचा उद्देश म्हणजे पत्त्यांचे व्यवस्थापन सुलभ करणे, सार्वजनिक आणि खासगी सेवा वितरण सुधारित करणे आणि आपत्कालीन सेवा कार्यक्षम बनवणे. ‘आधार’ आपल्याला अद्वितीय (युनिक) ओळख देतो तसेच डिजिपिनचे आहे.

६ अंकी असलेला पिनकोड मोठ्या भौगोलिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतो, ज्यामुळे अचूक पत्त्याची ओळख पटवणे कठीण होते. पण डिजिपिन हा १०-अंकी अल्फान्युमेरिक कोड ४ मीटर x ४ मीटर क्षेत्राचे अचूक प्रतिनिधित्व करत असल्यामुळे अचूक स्थान ओळखणे शक्य होते.

https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home या वेबसाइटवर जाऊन आपले स्थान निवडले, की  आपला १० अंकी डिजिपिन मिळू शकेल. digipin.cept.gov.in या वेबसाइटवर डिजिपिन शोधता येईल. https://digipin.netlify.app/ या वेबसाइटवर नकाशावर क्लिक करूनही आपला डिजिपिन मिळेल.

ई-कॉमर्स आणि कुरिअर सेवांसाठी अचूक डिलिव्हरी, आपत्कालीन परिस्थितींमध्ये अचूक स्थान ओळखून जलद प्रतिसाद देण्यासाठी, सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी, नॅव्हिगेशन प्रणालींमध्ये अचूक मार्गदर्शनासाठी डिजिपिनचा वापर होईल. पारंपरिक पिनकोडच्या तुलनेत अधिक अचूक आणि कार्यक्षम असलेली ही प्रणाली ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये उपयुक्त ठरेल.

राष्ट्रीय भू-स्थानिक धोरण २०२२ अंतर्गत, थिमेटिक वर्किंग ग्रुप ऑन ॲड्रेसने डिजिपिन  प्रणाली अधिकृतपणे स्वीकारली आहे. ही प्रणाली आता विविध मंत्रालये, राज्य सरकारे आणि संस्थांच्या कार्यप्रवाहात सुसूत्रतेसाठी वापरली जाईल. या प्रणालीचे सर्व  तांत्रिक दस्तऐवज  आणि सोर्स 

कोडचा संपूर्ण संग्रह गीटहब या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, यामुळे सॉफ्टवेअर विकसक, स्टार्टअप याचा अंतर्भाव आपल्या प्रणाली/सेवेत करू शकतील.  काही विकसित देशांत ही कल्पना प्रचलित आहे. आता आपला देशही अशा विकसित देशांच्या रांगेत उभा आहे.(deepak@deepakshikarpur.com)

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसIndiaभारत