शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

मराठवाड्यातील गांधीवादी नेत्याचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:47 IST

हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर तिथेच सशस्त्र लढ्याला पूर्णविराम देऊन गंगाप्रसादजींनी वयाची ९५ वर्षे उलटली तरी सुराज्य निर्मितीचा गांधी मार्ग अजूनही सोडलेला नाही.

- धर्मराज हल्लाळेहैदराबाद मुक्ती संग्रामानंतर तिथेच सशस्त्र लढ्याला पूर्णविराम देऊन गंगाप्रसादजींनी वयाची ९५ वर्षे उलटली तरी सुराज्य निर्मितीचा गांधी मार्ग अजूनही सोडलेला नाही.शालेय जीवनापासूनच गांधी विचारांचा प्रभाव असलेले थोर स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद बाळाराम अग्रवाल यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात जुलमी राजवटीविरुद्ध सशस्त्र लढा दिला. ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले, त्याचवेळी शस्त्र बाजूला ठेवत आयुष्यभर अहिंसेचा विचार जपला. त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार १३ जानेवारी रोजी पुण्यात गंगाप्रसादजींना प्रदान होणार आहे. स्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्यासाठी धडपडणारे ते सेनानी होत. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद स्टेटमधील जुलमी राजवट संपुष्टात आली. त्यावेळी चोंढी स्टेशनवर कुरुंद्याच्या अत्याचारी फौजदाराला पकडून लोकांनी बेदम झोडपण्यास सुरुवात केली होती. गंगाप्रसादजींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि संतापलेल्या लोकांच्या तावडीतून त्या फौजदाराची सुटका केली. प्रखर संघर्षानंतर विजयोत्सवात बेभान न होता तोल सांभाळणारी वृत्ती गंगाप्रसादजींनी दाखविली. सुडाची आग आता अयोग्य आहे, झाले गेले विसरून सर्वांनी एक झाले पाहिजे. हैदराबाद मुक्ती लढा हा कुणा एका जाती वा धर्माविरुद्ध नव्हता, तो अखंड भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठीचा लढा होता, अशी धारणा असणा-यांपैकी गंगाप्रसादजी आहेत. संवेदनशील घटनांमध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली, तर रस्त्यावर येऊन हिंसा करणाºयांना तिथेच थांबविण्याची नैतिक ताकद असणारे नेते आज दिसत नाहीत. १९६९ मध्ये महात्मा गांधीजींची जन्मशताब्दी साजरी होत असताना महाराष्ट्रात काही भागात दंगली उसळल्या होत्या. शेकडो लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी वसमत येथे धार्मिक ऐक्यासाठी गंगाप्रसादजींनी १४५ दिवसांचे एक प्रदीर्घ साखळी उपोषण केले. लोकनायक जयप्रकाशजी नारायण यांच्या पत्नी प्रभावतीदेवी यांनी वसमत येथे जाऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबतचा लढा, आजेगावचा रणसंग्राम इतिहासात नमूद आहे. हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्यासह अनेक जखमी सैनिकांना प्राणांची बाजी लावून वाचविण्यासाठी गंगाप्रसादजी धावले होते. रायफल घेऊन लढणारे हे सैनानी पुढे आयुष्यभर गांधी विचारांचे पाईक बनले. भूदान चळवळीत योगदान दिले. दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान राबविले. आणीबाणीत १८ महिने तुरुंगवास भोगला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे काम पुढे नेत खादीचा प्रचार आणि प्रसार केला. ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्यासाठी निर्धूर चूल, सेंद्रीय शेतीचे प्रयोग केले. अनेक शेतकºयांना सेंद्रीय शेतीकडे वळविले. मराठवाडाभूषण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची डी.लिट पदवी संपादन करणारे गंगाप्रसादजी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आजपर्यंत दौरे करीत राहिले. जानेवारी महिन्यात त्यांनी ९६व्या वर्षांत पदार्पण केले आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्यानंतर मराठवाड्यात आदर्शवत सर्वोच्च स्थान असणारे गंगाप्रसादजी हे केवळ अग्रवाल कुटुंबीयांची जबाबदारी असू शकत नाहीत. १७ सप्टेंबरला होणाºया सरकारी औपचारिकतेपलीकडे जाऊन त्यांची सेवा करण्याची संधी सरकार अन् समाजाने स्वीकारली पाहिजे. कुटुंब देखभाल करीत असले तरी मोठ्या माणसांचे मोठेपण त्यांच्या हयातीत नव्हे, पश्चात गौरवान्वित करणारा मराठी मातीचा दुर्गुण नाहीसा करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे.

टॅग्स :social workerसमाजसेवक