शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा; सर्वपक्षीयांना जनतेचे कसलेही देणे-घेणे उरलेले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2023 08:41 IST

आम्ही स्वतःला पुरोगामी, प्रगत महाराष्ट्र म्हणवून घेतो! ही खरोखर शरमेची गोष्ट आहे!

सरकार कोणाचेही असो; सर्वसामान्य लोकांचे सरकारवाचून काही अडल्याचे पाहायला मिळत नाही. अनेकांना तर कोणत्या खात्याचा कोण मंत्री आहे हेदेखील माहिती नसते. जनता आणि सरकारची कधीच फारकत झालेली आहे. असे असले तरी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत पाच गोष्टी तरी सरकार नावाच्या यंत्रणेने जनतेसाठी देणे अपेक्षित आहे. मुंबईसारख्या शहराचे दरडोई उत्पन्न लाखोंमध्ये आहे. तर, गडचिरोली, चंद्रपूर अशा भागात ते अवघ्या काही हजारांचे आहे. ही विषमता दूर करणे, ज्या ठिकाणी शिक्षणाच्या चांगल्या सोयी नाहीत, आरोग्याच्या सुविधा नाहीत, अशा ग्रामीण, दुर्गम भागातील जनतेला त्या उपलब्ध करून देणे, हे मूलभूत काम सरकारकडून अपेक्षित असते. मात्र, नेत्यांना वारेमाप पैसे कमावण्याची सुटलेली हाव संपता संपत नाही. राजकारणासाठी पैसा, त्यातून सत्ता आणि पुन्हा तीच सत्ता टिकवण्यासाठी पैसा... या दुष्टचक्रात अडकलेल्या सर्वपक्षीय नेत्यांना जनतेच्या आरोग्याचे कसलेही देणे-घेणे उरलेले नाही. 

सरकारी यंत्रणेत पूर्वी आरोग्य हा एकच विभाग होता. पण, स्वतःची राजकीय सोय म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण असे दोन स्वतंत्र विभाग केले गेले. तीच परंपरा पुढे येणाऱ्या प्रत्येक सरकारने चालू ठेवली. त्याचा गैरफायदा घेत दोन विभागांच्या मंत्र्यांना हाताशी धरून अधिकारी स्वतःचे राजकारण करू लागले. एकच औषध दोन विभाग वेगवेगळ्या दराने खरेदी करू लागले. औषध खरेदीमधल्या टक्केवारीच्या घाणेरड्या व्यवहारामुळे चांगल्या नामवंत कंपन्या भाग घ्यायला तयार होईनात. सरकारने औरंगाबाद खंडपीठात औषध खरेदीबद्दल दिलेले शपथपत्रदेखील विद्यमान मंत्री आणि अधिकाऱ्यांनी गुंडाळून ठेवले. हजारो कोटींचे बजेट असणारे हे विभाग, औषध खरेदीमध्येच स्वतःचे हित शोधू लागले. मंत्र्यांनाच विभागाचे काही देणे-घेणे नाही, हे लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांना मोकळे रान मिळाले. या दोन्ही विभागातली प्रमुख पदे एमपीएससीमार्फत भरावीत, असे नियम आहेत. एमपीएससीकडून पदभरती झाली तर आपल्याला उच्च पदावर जाता येणार नाही, हे ओळखून ही पदभरती होणार नाही, यासाठीच वेगवेगळे हातखंडे वापरणे सुरू झाले. जो मंत्र्यांच्या जवळचा त्याला अतिरिक्त पदभार म्हणून संचालकपद मिळू लागले. 

मध्यंतरी 'लोकमत'ने औषध खरेदी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर काही अधिकारी निलंबित झाले. पण, ते पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने आपल्या मूळ पदावर आले. काही अधिकाऱ्यांनी तर हा विभाग म्हणजे आपली कौटुंबिक मालमत्ता आहे असे समजून स्वतःची दहशत निर्माण केली आहे. त्यातून या विभागाची परवड झाली. मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहू लागल्या. निवासी डॉक्टरांचा तुटवडा पडू लागला. वरिष्ठ डॉक्टर आणि प्रशासकीय पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली. ते भरण्यासाठी यंत्रणा राबवली नाही, पाठपुरावा केला गेला नाही. परिणामी एकट्या सार्वजनिक आरोग्य विभागात १७,५०० पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात हीच अवस्था आहे. आरोग्याच्या सोयी-सुविधा मिळत नाहीत म्हणून लोकांची ओरड होऊ नये, यासाठी मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात आरोग्य शिबिरे घेण्याचा सपाटा लावला. आम्ही तुमच्यासाठी मुंबईचे चांगले डॉक्टर घेऊन आलो आहोत, असे दाखवून आरोग्यवस्थेच्या दुरवस्थेवर सोईस्करपणे पांघरूण घालण्याचे प्रयत्न सुरू झाले. 

संस्थात्मक उभारणी करावी, इस्पितळे सुसज्य करावीत, तिथे सगळ्या सोयी-सुविधा द्याव्यात, औषधोपचार वेळेवर मिळावेत, या मूलभूत गोष्टींना बगल देत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेणे सुरू झाले. त्यामुळेच आज महाराष्ट्रात तब्बल २५ ते ३० हजार जागा या दोन विभागांत रिकाम्या आहेत. गोरगरिबांच्या घरातला कर्ता माणूस उपचाराअभावी गेला तर तो कुठून आणायचा? ते कुटुंब तर आयुष्यातून उठते. आज अनेक ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दवाखान्यात औषधे नाहीत. साप चावला तर औषध मिळत नाही. विंचू दंश, कुत्रा चावल्याचे उपचारही न मिळाल्याने लोकांना जीव गमवावा लागतो. गरोदर स्त्रीच्या बाळंतपणाची सोय ग्रामीण भागात नाही. तिला सरकारी दवाखान्यात आणायचे तर चांगले रस्ते नाहीत. सरकारी दवाखान्यात कसेबसे नेले तर तिथे डॉक्टर नाहीत. आणि आम्ही स्वतःला पुरोगामी, प्रगत महाराष्ट्र म्हणवून घेतो! ही खरोखर शरमेची गोष्ट आहे!

 

टॅग्स :Healthआरोग्य