शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

विशेष मुलाखत : मी राजकारण बदलायला आलो आहे, प्रत्येक राज्यात जाईन ! - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 06:47 IST

राजकारण आणि प्रशासनाचे नवीन प्रतिमान घडवणारे अरविंद केजरीवाल यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित अंश.

मुख्यमंत्री म्हणून आपली तिसरी टर्म कशी चालली आहे? आम्ही  उत्तम काम करून दाखवल्याने दिल्लीच्या जनतेने आम्हाला लागोपाठ संधी दिली. सात - आठ तास वीज पुरवठा खंडित व्हायचा, तिथे २४ तास वीज असते, तीही मोफत. सरकारी  इस्पितळांमध्ये उत्तम दर्जाचे उपचार, तपासण्या, औषधे सारे मोफत मिळते. चाळीस, पन्नास लाख रुपये खर्च येणारी शस्त्रक्रियाही मोफत केली जाते. दिल्लीतल्या सरकारी शाळा दिमाखदार झाल्या आहेत. आम्ही अर्थसंकल्पातला २५ टक्के खर्च शिक्षणावर करतो. सरकारी शाळांचे १२वीचे निकाल ९९.७ टक्के लागले आहेत. यावर्षी सुमारे ४ लाख मुले खासगी शाळांतून नावे काढून सरकारी शाळेत दाखल झाली आहेत. आम्ही नागरिकांना मोफत पाणी पुरवठाही करतो आहोत.

इतके सगळे मोफत दिल्यानंतरही आपला अर्थसंकल्प नफ्यातला कसा काय? इथे आधी खूप भ्रष्टाचार होता. प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नसत आणि अर्थसंकल्प सदैव तोट्याचा असे. आम्ही सर्वप्रथम भ्रष्टाचार  संपवला आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करुन बरेच पैसे वाचवू लागलो. उदा. मुकरबा चौक उड्डाणपूल ४२२ कोटी रुपयात होणार होता, आम्ही तो वेळेआधी पूर्ण करून १२५ कोटी रुपये वाचवले.

नागरिकांना फुकटात सेवा घेण्याची सवय लावणे कितपत उचित आहे? या देशात मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा सगळ्यांवर मोफत उपचार होतात, नागरिकांवर मोफत इलाज केला तर ती फुकटेगिरी कशी? या देशात ज्या सुविधा मंत्र्यांना मिळतात, त्या सगळ्या सर्वसामान्य लोकांना मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे मी ठरवलेच आहे.

यासाठी पैसे कुठून येणार? या देशात एकदा कोणी आमदार झाला की, त्याची बँकेतील शिल्लक १० - १५ कोटीच्या घरात जाते, याचा हिशेब कधी लावलात का तुम्ही? हे चोरीला जाणारे पैसेच आम्ही लोकांमध्ये वाटतो आहोत.  मी स्वतःसाठी विमान खरेदी केले नाही. पण, स्त्रियांना  बस प्रवास मोफत करुन दिला. सरकारकडे पैसा असतोच. रित्या खजिन्याची कारणे सांगणारे लोकांना मूर्ख ठरवतात. नियत साफ असेल तर सर्व काही शक्य होऊ शकते.

पंजाबमध्ये निवडणूक जिंकणे किती कठीण होते ?पंजाबमध्ये काँग्रेसने २५ वर्षे आणि अकाली दलाने १९ वर्षे राज्य केले. या दोघांनी पंजाबला फक्त लुटले. यांच्या सरकारने शाळा, इस्पितळे, वीज, पाण्याकडे कधीही लक्ष दिले नाही. पंजाबच्या लोकांचा आमच्यावर विश्वास होता, की हे अत्यंत प्रामाणिक लोक आहेत.

पण, मग इतक्या महाग निवडणुका आपण कशा लढता? आम आदमी पक्ष गरीब आहे. निवडणुकीत आम्ही लोकांना सांगतो की, आम्हाला एक संधी द्या, मंत्र्यांना मिळतात त्या सुविधा आम्ही तुम्हाला मोफत देऊ. भ्रष्टाचार संपवू. करातून आलेला प्रत्येक रुपया लोकांवरच खर्च करु. यामुळे लोकच आमची निवडणूक लढवतात. 

व्यवस्था बदलण्याऐवजी सरकार बदलणे हे तर आपले लक्ष्य झालेले नाही? आजवर ७५ वर्षांच्या राजकारणात जितकी आश्वासने दिली गेली त्यापैकी कोणतीच कुठल्याही राजकीय पक्षांनी पूर्ण केली नाहीत. आम्ही आमची सगळी आश्वासने पूर्ण केली आहेत. ही भ्रष्ट व्यवस्था बदलावी, असे विरोधी पक्षांना कधीच वाटत नाही. परंतु आम आदमी  पक्ष ती पूर्णपणे बदलत आहे.

“आप”ला कोणत्या राज्यात विजय मिळवणे सोपे आहे? का? आम्ही आंदोलनातून पुढे आलेले लोक आहोत. राजकारण बदलायला आलो आहोत. आम्ही प्रत्येक राज्यात जाऊ, जनता संधी देईल तिथे जाऊ. देशातला सामान्य माणूस आता उभा राहिला आहे. आता इमानदारी आणि देशभक्तीची लाट संपूर्ण देशात येईल.

आप”कडे भाजपऐवजी काँग्रेसचा पर्याय म्हणून का पाहिले जात आहे? आमचे उद्दिष्ट काँग्रेस किंवा भाजपला हरवणे नाही, तर देश जिंकला पाहिजे हे आहे. लोकांना आता बदल हवा आहे. काँग्रेसला मत देण्याचा अर्थ भाजपला मत देणे असा असतो. गोव्यासह अनेक राज्यांत काँग्रेसचे आमदार भाजपत गेले आणि भाजपने सरकार केले म्हणून काँग्रेसला मत देण्याचा काही फायदा नाही.  भाजपला हरवायचे असेल तर आम्हाला मत द्या, असे आवाहन आम्ही लोकांना करतो.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली