शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

...तर खासदारकीचा राजीनामाही देईल - नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:05 IST

निवडून सर्वच येतात. मात्र, काहीजण लोकांचे प्रतिनिधी होतात तर काही ‘धनाचे’. जे धनाचे प्रतिनिधी आहेत, ते दबून राहतील. मी लोकांचा प्रतिनिधी आहे.

निवडून सर्वच येतात. मात्र, काहीजण लोकांचे प्रतिनिधी होतात तर काही ‘धनाचे’. जे धनाचे प्रतिनिधी आहेत, ते दबून राहतील. मी लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे कुणाचीही भीती नाही. प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देईल पण जनतेशी बेईमानी करणार नाही. खा. नाना पटोले यांची कमलेश वानखेडे यांनी घेतलेली मुलाखत.पंतप्रधान मोदींवर जाहीर टीका करण्याचे धाडस का व कुठून आले ?- पंतप्रधान मोदी यांनी बोलाविलेल्या खासदारांच्या बैठकीत आपण शेतकºयांचे प्रश्न मांडले. मात्र, पंतप्रधान मोदी त्यावर सहमत नव्हते. मी प्रखरतेने शेतक-यांची बाजू मांडली असता त्यांनी मला ‘आपको नही समजता’ असे म्हणत बोलू दिले नाही. खाली बसवले. गरीब, शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न मांडणे हे प्रत्येक खासदाराचे कर्तव्य आहे. मला माझ्या कर्तव्यापासून रोखले तर कसे सहन करणार ? मी जे काही बोललो ते उघड व खासदारांसमक्ष बोललो. माझा आवाज गरीब शेतक-यांसाठी उठतच राहील. मला परिणामांची पर्वा नाही.मोदी-शहा-पटेलांच्या जवळिकीमुळे तुम्ही नाराज आहात ?- पंतप्रधान मोदी, अमीत शहा व प्रफुल्ल पटेल हे’ ‘त्रिकूट’ मिळून काम करीत आहे, हे काही लपून राहिलेले नाही. पण कोण कुणाच्या जवळ आहे याने मला फरक पडत नाही. विधानसभेचे निकाल लागत असताना भाजपाला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यासाठी प्रफुल्ल पटेलच पुढे आले होते. हीच खरी वास्तविकता आहे.भाजपा सोडण्याचा विचार आहे का ?- मी भाजपामध्येच आहे. कुठल्याही पक्षात जायचा विचार नाही. मी शेतकºयांसाठी बोललो ते चूक आहे, असे पक्षाचे म्हणणे असेल व पक्षश्रेष्ठींनी म्हटले तर खासदारकीचाही राजीनामा देऊन टाकील. पण जनतेशी बेईमानी करणार नाही.लोकसभेचे तिकीट कापल्या जाईल असे वाटते ?- मला तिकिटाचा मोह नाही. माझी राजकीय सुरुवात जिल्हा, विधानसभा व लोकसभा अपक्ष उमेदवार म्हणूनच झाली आहे. मी भाजपाकडे कधीही तिकीट मागायला गेलो नव्हतो. लोकसभेत मला अपक्ष म्हणून मिळालेली मते पाहून भाजपा नेत्यांनी बोलावून तिकीट दिले होते. ज्या भंडारा-गोंदियात झेंडा लावायला माणसं नव्हती तेथे मी भाजपा उभी केली. मी खुर्ची सोडणारा आहे. त्यामुळे मला तिकिटाची चिंताच नाही. मी फक्त जनतेची चिंता करतो.काँग्रेसमध्ये घरवापसीचा विचार आहे ?- मी रोखठोक भूमिका घेतल्यापासून अनेक पक्षांना मी आपलासा वाटू लागलो आहे. अनेक पक्षांकडून मला निमंत्रण मिळाले. मात्र, माझी लढाई राजकीय नाही. मी काँग्रेसचा आमदार असताना एक वर्ष शिल्लक असूनही शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी राजीनामा दिला होता.सरकारकडून काय अपेक्षा आहे ?- मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीकडे मी लक्ष ठेवून आहे. कर्जमाफीच्या आॅनलाईन अर्जात ६६ रकाने भरावे लागत आहे. त्याचे प्रिंट आऊट काढले तर साडेपाच फुटाची पट्टी होते. केंद्र व राज्य सरकारने शेतकºयांना न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तर प्रसंगी टोकाची भूमिका घ्यायला मी मागे पाहणार नाही.

kamlesh.wankhede@lokmat.com

टॅग्स :BJPभाजपाNana Patoleनाना पटोले