शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जगाच्या बदलाचा वेग उत्कंठावर्धक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 04:26 IST

अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वी आयफोनची दोन नवीन मॉडेल एक्सएस आणि एक्सएस मॅक्स लाँच केली.

- अनय जोगळेकरअ‍ॅपलने काही दिवसांपूर्वी आयफोनची दोन नवीन मॉडेल एक्सएस आणि एक्सएस मॅक्स लाँच केली. हे दोन्ही फोन भारतात एक लाख रुपयांहून अधिक किमतीला मिळतील. आॅगस्टमध्ये अ‍ॅपल ही जगातील पहिली एक लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवल असलेली कंपनी बनली. अ‍ॅपलच्या पाठोपाठ सप्टेंबरमध्ये अ‍ॅमेझॉननेही एक लाख कोटी डॉलरचा आकडा ओलांडला. अ‍ॅमेझॉनचे बिझनेस मॉडेल अ‍ॅपलपेक्षा वेगळे आहे. अमेरिकेतील इ-कॉमर्स बाजारातील ५0 टक्के वाटा असलेल्या अ‍ॅमेझॉनचा भारतीय बाजारातील वाटा ३0 टक्के आहे. पुस्तकं, किंडल, ग्राहकोपयोगी वस्तू, वाणसामान, क्लाउड, संगीत, प्राइम व्हिडीओ, डिजिटल असिस्टंट अ‍ॅलेक्सा अशी नावीन्यपूर्ण उत्पादनं बाजारात आणून अ‍ॅमेझॉनने लोकांची मनं जिंकली आहेत. या दोघांखेरीज अल्फाबेट (गुगल) आणि फेसबुक या अमेरिकन कंपन्यांनीही भारतीयांना भुरळ घातली आहे. या सर्व कंपन्यांचा आवाका सातत्याने वाढत असून आपल्या त्यांच्यावरील अवलंबित्वातही वाढ होत आहे.पहिल्या विश्वयुद्धाच्या समाप्तीला या वर्षी शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. आपले जग ज्या व्यवस्थेवर उभे आहे, त्या व्यवस्थेच्या निर्मितीला १९१८ साली प्रारंभ झाला. अनेक देश जगाच्या नकाशावर अस्तित्वात आले. ब्रिटिश आणि फ्रेंच वसाहतींमध्ये स्वातंत्र्य चळवळी तीव्र झाल्या. १९२९ सालची जागतिक मंदी, दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर प्रवाही झालेले जागतिकीकरण आणि २१ व्या शतकाच्या सुरुवातीनंतर वणव्यासारखे पसरलेले इंटरनेट, मोबाइल संदेशवहन आणि समाज माध्यमं यांनी या व्यवस्थेला हादरे दिले; मोठे बदलही घडवून आणले. पण अजूनही या व्यवस्थेचा कणा किंवा ढाचा पूर्णपणे मोडलेला नाही.आज आपण चौथी औद्योगिक क्रांती अनुभवत आहोत. इंटरनेट आॅफ थिंग्स, चालकरहित वाहनं, त्रिमितीय प्रिंटिंग, नॅनो तंत्रज्ञान, बिग डाटा, शेअरिंगच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले उद्योग आणि त्यातून नावारूपाला आलेल्या फेसबुक, उबर आणि एअर बीएनबीसारख्या कंपन्या या सगळ्यांनी जगभर उत्पात माजवला आहे. उद्योग-धंद्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, पूर्वानुभव किंवा भांडवल नसलेले तरुण उद्योजक नावीन्यपूर्ण कल्पनेवर आधारित स्टार्ट-अप कंपन्या स्थापन करून जागतिक कंपन्यांसमोर आव्हान उभं करू लागल्या आहेत. नवीन रोजगारांची निर्मिती करतानाच या कंपन्या जगाला अधिकाधिक कार्यक्षम, पर्यावरणस्नेही आणि चिरस्थायी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे चौथ्या औद्योगिक क्र ांतीमुळे जगात सध्या अस्तित्वात असलेल्या ८0 टक्के रोजगारांवर संक्रांत आली आहे. औद्योगिक उत्पादनाचे आयुष्यचक्र किंवा लाइफ सायकल काही शतकं, काही दशकं असं करत आता पाच ते दहा वर्षांमध्ये आलं आहे. त्यामुळे तरु ण वयात मिळवलेली पदवी आणि कायमची नोकरी या गोष्टी नामशेष होणार आहेत.भावी पिढीला आपल्या कार्यकाळात किमान तीन वेगवेगळ्या उद्योगांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर काम करावे लागणार असून त्यासाठी तिला काम करता करता नवीन शिक्षण तसेच कौशल्यं संपादित करावी लागणार आहेत. या क्र ांतीच्या तडाख्यातून ऊर्जा क्षेत्रही सुटले नाही.विसाव्या शतकाच्या अखेरीस जन्मलेली पिढी मोबाइल, इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या साथीने मोठी झाली आहे. प्रत्येक क्षण अधिकाधिक जगण्याकडे या पिढीचा कल असल्यामुळे मोठी घरं आणि मोठ्या गाड्या विकत घेण्यात पैसा वाया घालवण्यासाठी शहराच्या केंद्रस्थानी छोट्याशा आणि भाड्याच्या घरात राहण्याकडे, कार-पूल किंवा ओला-उबरने प्रवास करण्याकडे तिचा कल आहे. त्यामुळे शहरीकरणाचा वेग वाढला असून चीनमध्ये बिजिंग-शांघाय किंवा भारतात मुंबई-पुणे ते थेट अहमदाबाद असे विस्तीर्ण महानगरी पट्टे तयार होत आहेत. त्यामुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.एकीकडे नवीन तंत्रज्ञानाचे फायदे तर आपल्याला हवे आहेत पण तिच्यातून निर्माण झालेली अनिश्चितता आपल्याला अस्वस्थ करत आहे; देशोदेशींच्या समाजकारणावर आणि राजकारणावर मोठा प्रभाव टाकत आहे. अरब जगतातील क्रांती, अमेरिकेतील वॉलस्ट्रीटविरुद्धचा रोष, जगात ठिकठिकाणी उभी राहिलेली भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनं, ते भारतातील प्रबळ जाती आणि भाषिक समूहांची सामाजिक न्यायासाठीची आंदोलनं, अमेरिकेत ट्रम्प यांचा अनपेक्षित विजय, ब्रिटिश जनतेने ब्रेक्झिटला दिलेला कौल, युरोपात बाहेरील स्थलांतराला विरोध करणाºया उजव्या आणि संकुचित राष्ट्रवादी पक्षांच्या ताकदीत झालेली वाढ या सर्व घटना वेगवेगळ्या वाटत असल्या तरी एका समान धाग्याने गुंफल्या गेल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करण्यासाठी राजकारणाच्या जोडीनेच अर्थकारण, तंत्रज्ञान, ऊर्जा, देशांतील सामाजिक अभिसरण या सगळ्यांचा एकात्मिकदृष्ट्या अभ्यास करणं अनिवार्य बनलं आहे. हे आव्हान पेलणं कठीण असलं तरी उत्कंठावर्धक आणि रंजकही आहे.(आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक)

टॅग्स :Apple Incअॅपल