शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अस्वस्थ, परिवर्तनशील दशकाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 14:26 IST

मिलिंद कुलकर्णी अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे ईशान्य राज्यांमधील विद्यार्थी आंदोलन, त्याचा सामाजिक व राजकीय परिणाम याविषयी ...

मिलिंद कुलकर्णी

अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे ईशान्य राज्यांमधील विद्यार्थी आंदोलन, त्याचा सामाजिक व राजकीय परिणाम याविषयी स्वानुभव मांडणारे अप्रतिम पुस्तक आहे. ऐतिहासिक दस्तऐवज असे त्याचे वर्णन करता येईल. त्याच दशकासारखे २०१० ते २०२० हे दशक अस्वस्थतेचे निदर्शक होते. या दशकाची सुरुवात आणि शेवट यात काही साम्यस्थळे आहेत. भारतीय राजकारण व अर्थकारणात खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण हे धोरण प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दुसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरुध्द मोठे आंदोलन याच काळात झाले. अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने संपूर्ण देशभरात भ्रष्टाचाराविरुध्द जनभावना तयार झाली. हे आंदोलन हाताळण्यात डॉ.सिंग यांच्या सरकारला अपयश आले. आणि त्याची परिणती २०१४ च्या निवडणुकीत आघाडीच्या पराभवात झाली. डॉ.सिंग यांच्या प्रमाणे नरेंद्र मोदी हे २०१९ मध्ये दुसऱ्यांदा बहुमत मिळवून सत्तेत आले. पण सीएए, एनआरसी पाठोपाठ शेतकरी आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण करीत सरकारविषयी जनभावना तयार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन निर्णायक शेवटापर्यंत गेले, तसे शेतकºयांच्या आंदोलनाचे होते काय, हे नव्या वर्षांत कळेल. पण मुलभूत फरक दिसतो, तो म्हणजे तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासंबंधी ठोस भूमिका घेतली नव्हती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती घेतलेली आहे. भाजपचे सर्व मंत्री, खासदार, मुख्यमंत्री, तसेच शासकीय प्रचार माध्यमे, समाज माध्यमे यांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे कृषी कायद्यांच्या फायद्यांविषयी, आंदोलकांच्या भूमिकेविषयी अथकपणे बोलताना दिसून येत आहे. त्याचा काही परिणाम होतो काय, हे सुध्दा नव्या वर्षात कळेल.अल्पसंख्य व बहुसंख्यवाद हा मुद्दा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असतो. तसा तो भारतातही या दशकात प्रखरतेने दिसला. अल्पसंख्यकांना झुकते माप देण्याचा काँग्रेसवर आरोप करीत भाजपने बहुसंख्यक वादाचा उघडपणे पुरस्कार केला. त्याचा परिणाम २५ वर्षांत प्रथमच एका पक्षाचे बहुमताचे सरकार दिल्लीत येण्यात झाले. त्यापाठोपाठ अनेक राज्ये भाजपने मिळवली. जागतिक पातळीवर बहुसंख्यकवाद, राष्टÑवाद अशा नावाने राजकारण झाले. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी ते आक्रमकपणे केले. त्याच ट्रम्पना अमेरिकन जनतेने नाकारल्याचे याच दशकात दिसून आले. सर्वसमावेशकतेचा हा सूर आता अन्य देशात आळवला जातो काय, हे नव्या दशकात कळेल.माहिती व तंत्रज्ञानात झालेला बदल हा मानवजातीवर परिणाम करणारा ठरला. भारताच्यादृष्टीने तर हा बदल मोठे परिवर्तन घडविणारा ठरला. विकसित देशांच्या बरोबरीने या क्षेत्रात भारतीयांनी या नव्या व्यासपीठाचा वापर केला. नवा बदल स्विकारला. कोरोना या जागतिक महासाथीच्या काळात याच माहिती व तंत्रज्ञानाचा खूप मोठा उपयोग झाल्याचे दिसून आले. अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य या व्यासपीठाने उपभोगायची संधी दिली. त्यामुळे सरकार, समाज व त्यातील घटकांमधील विसंगतीवर सामान्यांपासून तर असामान्य व्यक्तींपर्यंत कोणीही बोट ठेवू लागले. प्रश्न विचारु लागले. हा स्वागतार्ह बदल या दशकात दिसून आला.स्पॅनिश फ्लूनंतर १०० वर्षांनी कोरोनासारखी जागतिक महासाथ याच दशकात आली. आरोग्य पातळीवर विकसित असलेल्या देशांच्यातुलनेत भारताने या महासाथीचा सक्षमपणे मुकाबला केल्याचे दिसून आले. मजुरांचे स्थलांतर, सार्वजनिक आरोग्य सेवेतील प्रचंड त्रूटी असे काही अपवाद वगळता कोरोनाशी लढण्यासाठी सरकार आणि समाज हातात हात घेऊन काम करताना दिसून आल्या.९ महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात भौतिक सुख म्हणजे सर्व काही अशा धारणेला मोठा धक्का बसला. वैयक्तिक आरोग्य, कौटुंबिक नाती आणि समाजाशी जुळवून घेण्याची वृत्ती यांचे माणसाच्या जीवनातील असलेले अविभाज्य स्थान याचे महत्त्व पटले. खूप काही शिकविणारे असे हे दशक होते, असे त्याचे एका ओळीत वर्णन करता येईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव