शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

अग्रलेख - यांकीसोबत बेका; भारत-अमेरिका लष्करी सामंजस्य करारामुळे चीनला शह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 07:41 IST

India, US BECA deal - भारत आणि अमेरिकेत लष्करी सामंजस्याचा करार मंगळवारी झाला. बेका या नावाने हा करार ओळखला जाईल. चीन व पाकिस्तानच्या सरहद्दीवरील अचूक माहिती मिळविण्यासाठी अमेरिकी तंत्रज्ञानाची मदत यामुळे भारताला घेता येईल.

भारत आणि अमेरिका परस्परसंबंधातील एक महत्त्वाचा टप्पा मंगळवारी गाठला गेला. या दोन देशांमध्ये लष्करी सामंजस्याचा करार झाला. यामध्ये संरक्षणविषयक महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण होणार आहे. बेसिक एक्सचेंज ॲण्ड को-ऑपरेशन ॲग्रीमेंट म्हणजे बेका या नावाने हा करार ओळखला जाईल. चीन व पाकिस्तानच्या सरहद्दीवरील अचूक माहिती मिळविण्यासाठी अमेरिकी तंत्रज्ञानाची मदत यामुळे भारताला घेता येईल. भारत व अमेरिका ही दोन मोठी राष्ट्रे लष्करी डावपेच आखण्यासाठी एकत्र येत आहेत ही महत्त्वाची बाब आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला इजा पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्यास अमेरिका भारताच्या बाजूने ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. लडाख सीमेवर चीनकडून सुरू असलेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्त्वाचे आहे व चीननेही त्वरित त्याची दखल घेतली. चीनमधील कम्युनिस्ट सत्ता लोकशाही व्यवस्था व कायद्याचे राज्य यांना जुमानणारी नाही असेही परराष्ट्र मंत्री पॉम्पीओ म्हणाले. त्यांनी चीनचा स्पष्ट उल्लेख केला. भारताच्या परराष्ट्र व संरक्षणमंत्र्यांनी असा उल्लेख करण्याचे टाळले. मात्र अमेरिकेबरोबरची ही आघाडी चीनच्या वाढत्या आक्रमकतेमुळे उभी राहात आहे हे जगाला माहीत आहे. चीनच्या आततायी कृत्यांमुळेच सध्या जगात चीनच्या विरोधात आघाड्या उभ्या राहात आहेत आणि अमेरिका त्यामध्ये पुढाकार घेत आहे. चीनला वेळीच वेसण घातली नाही तर जगातील आपले मह‌त्त्व कमी होईल हे अमेरिकेला जाणवले.भारताला तर चीनपासून थेट धोका आहे. भारताचे महत्त्व कमी करण्यासाठी चीन  आता मुजोरी करीत आहे. भारत व अमेरिका या दोन्ही देशांचा मुख्य शत्रू एक झाल्यामुळे हा करार होणे सोपे झाले. तीनच आठवड्यापूर्वी टोकियो येथे क्वाड परिषद झाली, पाठोपाठ फाइव्ह आय गटामध्ये भारताला सहभागी करून घेण्यात आले. या दोन्ही व्यासपीठांवर गुप्त माहितीची देवाणघेवाण हा मुख्य विषय होता. भारताच्या लष्करी सरावामध्ये अमेरिका, जपानपाठोपाठ ऑस्ट्रेलियाही सहभागी होत आहे. गेल्या महिनाभरातील या सर्व घटना पाहता चीनविरोधाच्या आघाडीत भारताला महत्त्वाचे स्थान देण्यास अनेक देश उत्सुक असल्याचे दाखवितात. असे घडू शकले ते दोन कारणांमुळे. अमेरिका व भारत संबंध अधिक दृढ होण्याची पायाभरणी अटलबिहारी वाजपेयी व मनमोहनसिंग यांनी केली. त्याचा हा पुढचा अध्याय आहे. रशियाशी मैत्री व अमेरिका दु:स्वास यावर आपले परराष्ट्र धोरण आधारित होते. मात्र राजीव गांधी, नरसिंह राव, वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांनी गेल्या चार दशकात त्यामध्ये बदल केला. मनमोहनसिंग यांना काँग्रेस पक्षाने अधिक स्वातंत्र्य दिले असते तर असे करार फार पूर्वीच झाले असते.अमेरिकेशी मैत्रीचा उघड पुरस्कार मोदींनी प्रथमपासून केला आणि चीनच्या आक्रमक हालचालींमुळे त्याला प्रतिसाद देणे अमेरिकेला भाग पडले. चीनच्या घुसखोरीविरोधात भारताने घेतलेली कठोर भूमिका आणि सीमेवर दाखविलेला समंजस आत्मविश्वास यामुळेही पाश्चात्त्य जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली. अमेरिकेतील निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता असल्याने या करारांना महत्त्व काय, असा प्रश्न होतो. तथापि, अणुकराराला विरोध करणारे ओबामा हे अध्यक्ष झाल्यावर याच कराराचा पुरस्कार करीत होते. हा इतिहास पाहता ओबामा यांच्यासोबत उपाध्यक्ष असणारे बायडन उद्या अध्यक्ष झाले तरी करार उधळला जाणार नाही. अमेरिकेबरोबरच्या लष्करी करारांचे स्वागत करताना एका बाबीकडे दुर्लक्ष होऊ नये. विविध वस्तूंच्या उत्पादनांचे चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासही अमेरिका उत्सुक आहे. चीनला बाजूला सारून ग्लोबल सप्लाय चेन उभी करण्याची अमेरिकेची धडपड आहे. अमेरिकेची ही गरज पुरी करण्यासाठी इस्रायल, साउथ कोरिया, व्हिएटनाम, न्यूझीलंड व ब्राझील हे देश तयार आहे. त्यांच्यासोबत उत्पादनाच्या क्षेत्रात भारत जोरकसपणे चीनला पर्याय म्हणून उभा राहिला तर अमेरिकेला ते हवेच आहे. मेमध्ये आर्थिक सुधारणा जाहीर करताना मोदींनी ग्लोबल सप्लाय चेन उभी करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. ती साखळी लवकरात लवकर उभी राहिली पाहिजे. भारताने ही संधी सोडू नये. आर्थिक ताकद वाढली तरच यांकी (अमेरिका) बरोबरचा बेका दृढ होईल.

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय