शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

By सीमा महांगडे | Updated: June 16, 2025 07:59 IST

दहावीचा टप्पा पार करून करिअरच्या स्वप्नांकडे झेप घेण्याचा मार्ग म्हणजेच अकरावी प्रवेश.

सीमा महांगडे,प्रतिनिधी: दहावीचा टप्पा पार करून करिअरच्या स्वप्नांकडे झेप घेण्याचा मार्ग म्हणजेच अकरावी प्रवेश. मात्र, प्रवेश प्रक्रिया राबवणारी शिक्षण विभागाची सुस्त आणि नादुरुस्त यंत्रणा पालक-विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप देत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आहेतच. शिवाय अल्पसंख्याक कोटा आणि अंतर्गत कोट्याबाबत शिक्षण संचालनालयाने आयत्यावेळी घेतलेल्या निर्णयांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहे. अल्पसंख्याक संस्थांमध्ये सामाजिक आरक्षण लागू करण्याचा निर्णय यापूर्वीही मागे घ्यावा लागल्याचा अनुभव असताना पुन्हा प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणात अडकली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लवकर लागला असला तरी अकरावी प्रवेश सुकर होतील, अशी परिस्थिती नाही.  

 राज्याचा शिक्षण विभाग दरवर्षी आपल्या नियोजन शून्यतेची प्रचिती देतो. नियोजनात हा विभाग दरवर्षी नापास का होतो, अपयशी का ठरतो, असा प्रश्न आहे. मुळातच यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यभरात ऑनलाईन राबविण्याचा निर्णय आयत्यावेळी घेण्यात आला. मात्र, त्यातील तांत्रिक अडचणींची शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.   

वेबसाइट बंद पडणे, प्रवेशाच्या वेळापत्रकात पुन्हा पुन्हा बदल करणे आदी अडचणींचे विद्यार्थ्यांमागील शुक्लकाष्ट कायम आहे. त्यामुळे याही वर्षी अकरावीचे वर्ग उशिरा सुरू होण्याची लक्षणे आहेत. या उशिरामुळे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार?  प्रवेशात सध्या फक्त तारीख पे तारीख प्रकार सुरू आहे. अर्ज भरण्यापासून ते यादी जाहीर होईपर्यंत फक्त नवीन तारखांचे वेळापत्रक दिले जात आहे. मग राज्यभक एकाच वेळी  ऑनलाइन प्रवेश हा निर्णय घेताना सेवा देणाऱ्या कंपन्यांना तांत्रिक अडचणी किंवा येणाऱ्या भाराची कल्पना नव्हती का?, किंबहुना शिक्षण विभागाने याची चाचपणी आधीच का केली नाही?, जर नियोजन नसताना प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असेल, तर शिक्षण विभागाच्या ‘शिक्षणा’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते.   प्रवेशाच्या अनेक फेऱ्या होऊनही महाविद्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने जागा रिक्त राहणे आणि दुसरीकडे विद्यार्थी महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित राहणे, हा विरोधाभास अनाकलनीय आहे. विशेष म्हणजे असा विरोधाभास का निर्माण होतो ते शोधण्याची तसदीही शिक्षण प्रशासनातला कुणी तज्ज्ञ घेताना दिसत नाही.  

शेवटी काय, दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवूनही येरे माझ्या मागल्या घडत असेल आणि अकरावी प्रवेशासाठी एक फूलप्रूफ, अचूक व्यवस्था शिक्षण विभाग निर्माण करू शकत नसेल तर याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाहीतर सब चलता हैं च्या नावाखाली सुरू झालेली अकरावी प्रवेशाची ही ढकलगाडी पुढे जाऊन वर्षभर चालली आणि विद्यार्थ्यांनी अकरावी ऐवजी इतर वाटा निवडल्या तर नवल वाटायला नको!

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र